महापालिकेचे कर्मचारी जागेवर नसतात, बाहेर घुटमळत असतात, यांसारख्या तक्रारी सातत्याने होत असताना, उशिरा का होईना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या तक्रारींची दखल घेतली. आयुक्तांनी गुरुवारी (५ ऑक्टोबर) सकाळी तासभर पालिकेच्या ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 6 October 2017
वीजटंचाईमुळे राज्यभरात लोडशेडिंगचा ‘वणवा’
पुण्यासह पिंपरी आणि जिल्ह्यातही ” बत्ती गुल’, अपुऱ्या कोळशामुळे वीजनिर्मितीत घट
* लोडशेडिंगमुक्त पुण्यालाही भारनियमनाचा फटका
* आगामी काळात भारनियमनाचे ” तास’ वाढण्याचे संकेत
* लोडशेडिंगमुक्त पुण्यालाही भारनियमनाचा फटका
* आगामी काळात भारनियमनाचे ” तास’ वाढण्याचे संकेत
पिंपरी न्यायालयाचा होणार विस्तार, महापालिकेचा ग्रीन सिग्नल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आहे़ मोरवाडी चौकातील इमारतीतील जागा कमी पडत असल्याने न्यायालयाचा विस्तार करणे अवघड झाले होते. मात्र, जागेच्या प्रश्नाबाबत बार असोसिएशन, महापालिकेचे ...
Centre tells PCMC to buy HAL land at market rate
Hindustan antibiotics limited Pimpri Chinchwad: The central government rapped the civic body on its knuckles in connection with its plan of ...
‘एचए’च्या भूखंडासाठी साडेसातशे कोटी भरा
पिंपरी - हिंदुस्तान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेने कंपनीकडील जमीन खरेदीचा प्रस्ताव केला खरा. पण, केंद्र शासनाकडील भूखंड आरक्षित करता येत नसल्याचे सांगत केंद्राने महापालिकेकडे सुमारे साडेसातशे कोटी रुपयांची (भूखंडाच्या मोबदल्यात) मागणी केली. हा मोबदला तातडीने तसेच एकरकमी भरावा, अशी सूचनाही केली.
पिंपरी-चिंचवड महापालिका : जागेसाठी दोनशे सूचना, हरकती दाखल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील गरज पाहता मध्यावर असणारी एच. ए . कंपनीची जागा घेण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. जमीन खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. सुमारे ...
हॅंडमेड आणि स्वदेशी वस्तू खरेदीला पसंती
पुणे - दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. या सणानिमित्त एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. त्यामुळे नागरिकांची पसंती विचारात घेऊन सुंदर, आकर्षक व उपयोगी वस्तू सध्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. हॅंडमेड वस्तूंमध्ये पेशवाई, करंजी, लोटस, किस्टल्स, चमकी, गोल्डन आणि पतंगाचा कागद वापरून बनविलेले कंदील, विविध प्रकारचे तोरण, पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्या, सुगंधी मेणबत्त्या यांकडे ग्राहकांची मागणी वाढत आहे.
तीन हजार सातशे वाहने मालकांना परत
पिंपरी - वाहन चोरीला गेले की त्याचा शोध लागणे मुश्कील असते. वारंवार पोलिस ठाण्यात खेपा मारूनही ते परत मिळत नाही. मात्र ‘गंगामाता वाहन शोध संस्थे’ने दीड वर्षात तब्बल तीन हजार ७०० वाहनांचा शोध लावला आणि ती मालकांकडे सुपूर्त केली आहेत.
“उपद्व्यापीं’मुळे खऱ्या सर्प मित्रांना “बाधा’
ओळखपत्राअभावी नागरीक संभ्रमात : वन विभागाकडून चालढकल सुरुच
पिंपरी – सध्या सोशल मीडियावर शहरातील सर्प मित्रांना ओळखपत्र मिळावे अशी एक “व्होटिंग पोस्ट’ फिरत आहे. बरेचजण यावर सर्प मित्रांना वन विभागाकडून ओळखपत्र देण्यात यावे यासाठी मत ही देत आहेत. गेल्या वर्षी वन विभागाने सर्पमित्रांना ओळखपत्रे दिली होती. परंतु, यावर्षी अद्याप देण्यात आलेली नाहीत. शहरातील काही स्वयंघोषित आणि उपद्व्यापी सर्प मित्रांमुळे चांगल्या सर्प मित्रांना त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी काही सर्प मित्रांनी बोलून दाखवली.
पिंपळे सौदागरमध्ये आढळला दुर्मिळ ‘वॉल्स सिंध क्रेट’
पिंपरी (प्रतिनिधी):- दुर्मिळ व रागीट जातीचा वॉल्स सिंध नावाचा विषारी साप पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात आढळला आहे. हा साप महाराष्ट्रात क्वचित ठिकाणी आढळतो. हा साप पुणे व पिंपरी चिंचवड तसेच कात्रज येथे देखील यापूर्वी आढळला होता. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा त्याचे दर्शन झाले आहे.
महापालिकेच्या वर्धापन दिनासाठी 13 लाखांचा खर्च
पिंपरी – महापालिकेचा 35 वा वर्धापन दिन बुधवारी (दि.11) साजरा होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यास येणा-या 13 लाख 30 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने बुधवारी मान्यता दिली.
'सनबर्नविरोधात थेट मोहन भागवतांकडे साकडे
तर, दुसऱ्या बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, गणेश भक्त मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी-चिंचवडच्या पुण्यभूमीत पाश्चिमात्य संस्कृतीने व्यापलेल्या 'सनबर्न म्युझिक ...
खासदार आढळरावांचा “चौकार’?
ऑनलाईन कल चाचणी : “शिरुर’मध्ये राजकीय चर्चेला उधाण
– निशा पिसे
पिंपरी – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींना सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे भाजप सलग्न आमदार महेश लांडगे यांच्या गोटातून यापूर्वीच जाहीर झाले आहे. असे असताना शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुरचा खासदार कोण? या प्रश्नावर ऑनलाईन कल चाचणी घेतल्याने मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या कलचाचणीत तब्बल 75 टक्के नेटीझन्सनी आढळराव पाटील यांना पसंती दिल्याचे दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांच्यासह आढळरावांच्या सर्वपक्षीय विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पिंपरी – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हलचालींना सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे भाजप सलग्न आमदार महेश लांडगे यांच्या गोटातून यापूर्वीच जाहीर झाले आहे. असे असताना शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुरचा खासदार कोण? या प्रश्नावर ऑनलाईन कल चाचणी घेतल्याने मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या कलचाचणीत तब्बल 75 टक्के नेटीझन्सनी आढळराव पाटील यांना पसंती दिल्याचे दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांच्यासह आढळरावांच्या सर्वपक्षीय विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)