Friday, 10 April 2020

पिंपरीत 22 पाॅझिटिव्ह; भोसरी तीन दिवस सील

निजामुद्दीन प्रकरणातील आणखी एक पॉझिटिव्ह
पिंपरी - दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील आणखी एका व्यक्तीचा एनआयव्ही कडील अहवाल गुरुवारी पाॅझिटीव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 22 झाली आहे. दरम्यान, भोसरी गावठाण परिसर शुक्रवारपासून (ता. 10) तीन दिवस सील करण्यात येणार आहे. 

लगतच्या पुण्यात काही तासांत दहा जणांचा बळी; पिंपरी-चिंचवडकरांनो जागृत व्हा, घराबाहेर पडू नका!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकडे पुण्याचे जुळे शहर म्हणून पाहिले जाते. या लगतच्या पुण्यात कोरोनाने हाहा:कार माजविला आहे. काही तासांत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुण्यात कोरोनाने 18 जणांचा बळी घेतला आहे.  त्यामुळे पुण्यापासून धडा घेत आता पिंपरी-चिंचवडकरांनी अधिकची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. पुढील काही दिवस ‘हाय अलर्ट’ आहेत. त्यामुळे शहरवासीयांनो जागृत व्हा, घराबाहेर पडू […]

Doctors and nurses fighting COVID-19 in PCMC hospitals to get Rs 1 crore life insurance


कंत्राटी कामगारांनाही “विमा’ संरक्षण

दुर्देवी घटना घडल्यास एक कोटीचा कवच – उपमहापौर हिंगे
पिंपरी – संपूर्ण देशामध्ये करोना आजाराने धैमान घातले आहे. करोनाच्या प्रतिबंधासाठी अनेक डॉक्‍टर, परिचारिका, वॉर्डबॉय जीवाची बाजी लावून या लढाईमध्ये देशसेवा करत आहेत. महापालिकेच्या वतीने असे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. आता महापालिकेच्या वतीने कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या डॉक्‍टर, परिचारिका व अत्यावश्‍यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना या विम्याचे संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिली.

‘मास्क’ न घालता रस्त्यावर फिरणाऱ्यांवर FIR, राज्यातील पहिली घटना पिंपरी-चिंचवडमध्ये

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकार कठोर पावलं उचलत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि पुण्यामध्ये सरकारी कार्यालयातीतल कर्मचाऱ्यांवर आणि नागरिकांवर मास्क वापरण्याची सक्ती केली आहे. तसे आदेश सरकारने बुधवारी (दि.8) काढले आहेत. मास्कचा वापर न करता फिरणाऱ्या 7 व्यक्तींवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चिखील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अशा प्रकारची कारवाई होण्याची ही पहिलीच घटना आहे. ही कारवाई आज (गुरुवार) करण्यात आली.

मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन द्वारे ‘डॉक्टर आपल्या दारी’; भारतीय जैन संघटनेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. उपक्रमाची संकल्पना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा यांची आहे. या उपक्रमाचे उदघाटन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते  4 एप्रिल रोजी करण्यात आले. या उपक्रमाला […]

Corona Virus : वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगरमध्ये नागरिकांनी अंतर्गत रस्ते स्वयंस्फूर्तीने केले बंद

पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू लागल्याने नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण होऊ लागली आहे. शहरातील वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर या भागातील नागरिकांनी आपल्या परिसरातील अंतर्गत रस्ते स्वयंस्फूर्तीने वाहतुकीसाठी आणि भाजीपाला विक्रेत्यांसाठी बंद केले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात तीन शिवभोजन केंद्रे सुरु


करोना बाधिताचा पोलीस ठाण्यात मुक्त संचार

पिंपरी  – दुकान सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी एकजण शहरातील एका पोलिस ठाण्यात आला होता. त्याने या कामानिमित्त अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या भेटीगाठी घेतल्या. तो व्यावसायिक करोना बाधित असल्याचे बुधवारी (दि. ८) निष्पन्न झाले. यामुळे ‘त्या’ पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांची पाचावर धारण बसली आहे.

स्वस्त धान्य दुकानदार उकळताहेत जास्त पैसे?

संकटकाळातही गोरखधंदे : पुरवठा निरीक्षकांना तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश

पिंपरी – शहरातील काही स्वस्त धान्य दुकानातून जादा दराने नागरिकांना धान्य विकले जात असल्याची तक्रार काही दिवसांपासून नागरिक करत आहेत. “करोना’मुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीतही नागरिकांची लूट चालू आहे. याबाबत जागृत नागरिक महासंघाच्या वतीने परिमंडल अधिकारी (निगडी) दिनेश तावरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. तावरे यांनी संबंधित तक्रारीला अनुसरून पुरवठा निरीक्षकांना याबाबत तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पिंपरी मंडई पुन्हा गजबजली

सोशल डिस्टन्सची ऐशी-तैशी

पिंपरी : मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने महापालिकेने पिंपरी भाजी मंडई बंद केली होती. मात्र राजकीय मध्यस्थीनंतर आज शुक्रवारीपासून (दि. १०) पुन्हा मंडई सुरू झाल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

‘महापालिका कार्यालये, पोलीस आयुक्तालयाचे निर्जंतुकीकरण करा’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय विभागातील डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. महापालिका मुख्यालय , पोलिस आयुक्तालयसह इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यासाठी महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि खासगी रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करावे, अशी मागणी […]

पिंपरी-चिंचवड शहरातील जलाशयाचे प्रदूषण थांबवावे: विकास पाटील

पिंपरी: शहरातील पिण्याच्या पाण्याच्या जलाशयाचे प्रदूषण ह्या मुख्य समस्येला आजपर्यंत सोयीस्करपणे निरनिराळी कारणे समोर करून मोठ्या चतुराईने राजकीय व प्रशासनाकडून चालढकल करून प्रलंबित ठेवण्यात आले आहे. आज जलसंवर्धन दिन आहे आपण आज तरी या बाबत पहिले पाऊल उचलणे पेक्षित असून तातडीने पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयातील पाणी प्रदूषण थांबवावे अशी मागणी इसीएचे चेअरमन पर्यावरण तज्ञ विकास पाटील यांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त यांना याबाबत निवेदन दिले आहे.

आधीच लॉकडाऊन त्यात कडक उन्हाळा; प्राणीमित्रांनो, कुत्र्यांकडे लक्ष द्या!

नवी सांगवी ( पुणे ) : कडक ऊन आणि लॉकडाऊन यासर्वांचा परिणाम पाळीव व भटक्या अशा दोन्हीही कुत्र्यांचे आजार बळाविण्यासाठी झाला आहे. मानवी शरीरावर ऋतु बदलाचा परिणाम होत असतो तसाच तो प्राण्यावरही परिणामकारक ठरतो. मार्च संपुन एप्रिलही अर्ध्यावर आल्याने उष्णतेचा आलेख उंचावत असताना कुत्र्यांना ताप येणे, त्यांच्या नाकातून रक्त येणे प्रसंगी रक्ताच्या उलट्या होणे असे आजार बळावत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे पशुवैदयकीय डॉक्टरांची उपलब्धता त्याप्रमाणात होणेही कठीण झाले आहे. त्यामुळे शासण व आपण रहात असलेल्या सोसायटीतील नियमांमुळे या प्राण्यांना सांभाळणे खूपच अवघड झाले आहे. 

मोफत तांदूळाचे ई-पॉजद्वारे वाटप करा - अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आदेश

पिंपरी - पुणे व पिंपरी चिंचवड शहरामधील प्राधान्य कुटूंब, अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना ई-पॉजद्वारे मोफत तांदळाचे वाटप केले जावे. तत्पूर्वी, लाभार्थ्यांनी नियमित धान्याची उचल केली अथवा नाही याची खात्री करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने केल्या आहेत. 

Coronavirus : पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनाही 'सुरक्षा कवच' पाहिजे

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनासाठी केलेल्या 'सुरक्षा कवच'  या योजनेमध्ये पीएमपीच्या अत्यावश्यक सेवेतील सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांनी सहभागी करून घ्यावे अशी मागणी प्रशासनाने एका पत्राद्वारे गुरुवारी केली. तसेच या योजनेतून पीएमपीला वगळ्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.

शवदाहिनीची निविदा भोवली

तीन अभियंत्यांसह लेखाधिकाऱ्यावर कारवाई

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असताना पाच ठिकाणी पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविणे आणि सांगवीत बसविण्यात आलेल्या शवदाहिनीच्या खऱेदीत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. वैयक्तिक लाभासाठी निविदा राबविल्याचा ठपका ठेवत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कार्यकारी अभियंत्यासह तीन अभियंते आणि एका लेखाधिकाऱ्याला दोषी ठरवले.

भोसरीमध्ये भटक्‍या कुत्र्यांमुळे मनस्ताप

भोसरी – भोसरीत पुणे-नाशिक हायवे जवळील नेलगे पगारीया या सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भटक्‍या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्या मधील बऱ्याच कुत्र्यांना आजार असल्यामुळे त्याचा स्थानिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. सध्याच्या लॉकडाऊनमुळे नागरिक जास्त बाहेर पडत नाहीत. परंतु अत्यंत आवश्‍यक वस्तू खरेदीसाठी ये-जा करताना ही मोकाट असलेली कुत्री अंगावर धावून जात आहेत.