Senior police inspector (planning), Rajendra Kamire said, “This is a positive move and it will resolve the traffic issue in Hinjewadi area to a great extent as majority of them use private vehicles to commute to their offices.” He added, “However, it ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 15 March 2014
PCMC chief does rounds of D ward
PIMPRI: The Commissioner of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Rajiv Jadhav accompanied by officials in a fleet of 20 vehicles and two police vehicles, inspected D ward, on Thursday, Jadhav found broken chamber covers on Kaspatewasti Kalewadi roadand reprimanded the local PCMC officials.
प्लॅस्टिक कचरा दिसता कामा नये
पिंपरी : शहरातील रस्ते व मोकळया जागांवर प्लॅस्टिकचा कचरा दिसता कामा नये. याबाबत आवश्यक ती कार्यवाही अधिकार्यांनी करावी, अशा सूचना महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिल्या. आगामी महिन्यात प्रभागनिहाय पाहणी करून कामांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपा कर्मचार्यांनी केला ‘लिंगाणा’ सर
पिंपरी : लिंगाणा सुळका जवळपास १000 फुटांचा भेदक सुळका म्हटले की लिंगान्याचे रौद्र रूप समोर येते. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील हजार फूट उंच असलेला लिंगाणा सुळका पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचार्यांनी सर केला.
पुणे जिल्ह्यातून ‘बोराट्याची नाळ’ आणि ‘सिंगापूरची नाळ’ या जुन्या घाटवाटा लिंगाण्याच्या कुशीतून कोकणात उतरतात. त्यासाठी ‘वेल्हा’ तालुक्यातल्या ‘मोहरी’ या गावी जावे लागते. मोहरीतून रायलिंग पठार गाठलं की लिंगाण्याचे दर्शन घडते. या बाजूला लिंगाण्याची चढाई करावी लागते. चढाई करण्यासाठी १८ जणांचे पथक या गावी पोहोचली. मोहिमेचा नेता अनिल वाघ (फायरमन), उपनेता गौतम इंगवले (फायरमन), संदीप केंजळे, महेंद्र शिंदे, राजेश राऊत, गिरीश कुलकर्णी, ईशा कुलकर्णी, शिवकुमार काकडे, स्नेहल शिंगारे, प्रमीत नाईक यांचा त्यात समावेश होता. समवेत अभिषेक वाघ, ओम काकडे, साक्षी जाधव, आदिती डोंगरे हे बालचमूही होते.

भाजपचे संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांना पोलिसांकडून धक्काबुक्की
जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई
शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेश फी वाढीसंदर्भात शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी गेलेले भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याने वादावादी झाली. याचे रुपांतर धक्काबुक्कीत झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार भोसरी येथील इंद्रायणीनगर मधील प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज (शुक्रवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकनाथ पवार यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना सोडून देण्यात आले.
‘दादा, आता तरी चुका सुधारा’
‘बाहेरून पाठिंबा आणि आतून घात’ असे घाणेरडे राजकारण करू नका. दादा, तुम्ही काहींचे खूप लाड केलेत. आता तरी चुका सुधारा, अशा स्पष्ट भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (१४ मार्च) व्यक्त केल्या.
लक्ष्मण जगताप अखेर ‘शेकाप’कडून लढणार
मावळ लोकसभा मतदारसंघातून आमदार लक्ष्मण जगताप उमेदवार राहणार आहेत, परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवतील, असे शुक्रवारी (१४ मार्च) स्पष्ट झाले. याबाबतची घोषणा पेण येथे आयोजित मेळाव्यात करण्यात आली.
जगतापांना माझा पाठिंबा या वावड्याच
पिंपरी : ‘‘अतिशय व्यस्ततेमुळे मला दोनवेळा दौरा रद्द करावा लागला. यातूनच अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा असावा, अशा वावड्या येथे उठल्या. मात्र, पक्षातर्फे लवकरच उमेदवारी जाहीर होईल आणि हा उमेदवार पिंपरी चिंचवडमधीलच असेल, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेरगावातील मेळाव्यात केली.
सांस्कृतिक भवनावर खासगी मालकी?
किवळेतील ग्रामस्थांची तक्रार : आयुक्तांना निवेदन
किवळे : येथील महापालिकेच्या सांस्कृतिक भवनाचा गेल्या काही वर्षांपासून एक व्यक्ती खासगी वापर करीत असून, भाडे वसूल करीत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, संबंधित व्यक्तीने हे सांस्कृतिक भवन कार्यक्रमासाठी नाममात्र भाड्याने किंवा मोफत देत असल्याचे सांगितले.

पाणीपट्टी भरण्यास नागरिकांची गर्दी
रहाटणी : सध्या शहरात पाण्याचे बिल भरण्यासाठी नागरिक धावपळ करताना दिसून येत आहेत. मार्च महिन्यात पाण्याचे बिल भरण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही ठिकाणी बिल भरणा स्वीकारण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने नागरिकांना उन्हात तासंन्तास ताटकळत उभे रहावे लागते.
Subscribe to:
Posts (Atom)