Tuesday, 3 October 2017

अधिकाऱ्यांवर कारवाईला भाजपचे हात धजेना

पदाधिकाऱ्यांचा पोकळ दम: व्यावहारिक दृष्टीकोनाची आडकाठी 

पालिकेला जमेना अन ओला-सुका कचरा येईना

कचऱ्याच्या परीक्षेत पालिका पुन्हा नापास: विलगीकरण मोहीम ठरली निष्फळ 

People need some initiatives from PMC, PCMC, says Roseland Residency chairman

Would you plan to replicate your model in Pune and Pimpri Chinchwad? We as an individual cannot do this activity on a large scale alone, so we have started involving civic authorities as well as local corporators. We have seen a lot of enthusiasm from ...

Roseland residents teach Pune the sustainable green lifestyle

After looking at multiple solid waste management (SWM) initiatives at the society, Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) adopted the three- way waste segregation model against a standard two-way (dry and wet) and also launched the waste ...

निर्धार स्वच्छतेचा...

पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य केले.
 

सराईत गुन्हेगाराकडून 40 तोळे सोने हस्तगत

पिंपरी - निगडी पोलिसांनी अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराकडून 40 तोळे चोरीचे सोने हस्तगत केले आहे. त्याच्याकडून घरफोडीचे 16 गुन्हे उघड झाले आहेत.                                      
निखिल ऊर्फ मॉन्टी दत्तात्रेय कंगणे (वय 23, रा. एकता सोसायटी, विजय म्हेत्रे बिल्डिंग, चिखली) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखलीतील संजय तापकीर यांचे कुटुंब मंगळवारी (ता. 26) रात्री साडेआठ ते साडेदहाच्या दरम्यान घराला कुलूप लावून दांडिया खेळण्यासाठी गेले होते. त्या वेळी कंगणे याने तापकीर यांच्या घराचे व कपाटाचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने व मोबाईल असा साडेबारा लाखांचा ऐवज चोरून नेला. याबाबत तापकीर यांनी पोलिसांना कळवताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, कंगणे घटनास्थळी आल्याचे निदर्शनास आले. मात्र, त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. कंगणे हा सराईत चोर असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून इतरही पंधरा गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 40 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.                                                   

पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी, वाहन चोरी आणि जबरी चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. यांच्याकडून तब्बल १२ लाख २ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यात सोनं आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. घरफोडी ...