Tuesday, 21 March 2017

Race heats up for PCMC committee nominations

With just two days left for election to the standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation, the race among corporators to bag nomination for ...

[Video] पाणीपुरवठा सुरळीत करा, सर्व पक्षीय नगरसेवकांची मागणी

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील नागरिकांना दोन महिन्यापासून पाणी समस्येला सामोरे जावे लागत असून महापालिका प्रशासनाने सुरळीत पाणी पुरवठा करण्याची गरज असून दोन वेळा पाणीपुरवठा करणे शक्य नसल्यास किमान एक वेळा ज्यादा दाबाने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आज पुणे महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी महापौर आणि प्रशासनाकडे केली.

[Video] पिंपरीच्या शिक्षणाधिकारी व क्रीडा प्रबोधिनीच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक

लाचलुचपत खात्याकडून पिंपरीच्या शिक्षणाधिकारी अल्का कांबळे व क्रीडा प्रबेधिनीचे मुख्याध्यापक बाबसाहेब राठोड यांना आज (मंगळवारी) लाच घेताना रंगेहाथ पकडले. पिंपरीतील उद्यमगर येथील क्रीडा प्रबोधिनीचे मुख्याध्यापक बाबासाहेब आंबादास राठोड (वय 34) व पिंपरी-चिंचवडच्या शिक्षणाधिकारी अल्का ज्ञानेश्वर कांबळे (वय 54) यांना अटक करण्यात आली आहे. 

बीआरटीएस मार्ग दुचाकींसाठी खुला

पिंपरी - मुंबई-पुणे महामार्गावरील निगडी ते दापोडी दरम्यानचा बीआरटीएस मार्ग फक्‍त दुचाकी वाहनांसाठी सोमवारपासून (ता.20) खुला करण्यात आला.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी निगडी ते दापोडी हा बीआरटीएस मार्ग दुचाकीसाठी खुला करण्याची मागणी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली होती. त्यानुसार, आयुक्त वाघमारे यांनी हा मार्ग दुचाकींसाठी खुला करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. वाहनचालकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बीआरटी बससेवा सुरू होईपर्यंत हा मार्ग दुचाकी वाहनांसाठी खुला राहणार आहे.

लोहमार्ग दुरुस्तीमुळे वेळापत्रकामध्ये बदल

देहूरोड ते चिंचवडदरम्यान आजपासून काम
पुणे, - देहूरोड ते आकुर्डी आणि आकुर्डी ते चिंचवड दरम्यानच्या मार्गावर मंगळवारी (ता. 21) रेल्वे प्रशासन दुरुस्तीचे काम हाती घेणार आहे. हे काम पुढील मंगळवार (ता. 28) पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या एक्‍स्प्रेस गाड्या देहूरोड स्टेशनवर जादा वेळ थांबणार आहे. तर पुण्यातून लोणावळ्याला जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये बदल केला असून, या गाड्या चिंचवडपर्यंतच जाणार आहेत.

टाटा मोटर्स कामगारांचे आंदोलन मागे

वेतनवाढी कराराचा प्रश्‍न 15 दिवसांत सोडविण्याचे आश्‍वासन
पिंपरी - अठरा महिन्यांपासून रखडलेल्या वेतनकरारावर येत्या पंधरा दिवसांत तोडगा काढण्यात येईल. तथापि, उपोषण मागे घ्यावे, या टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत टाटा मोटर्सच्या कामगारांनी सोमवारी (ता. 20) आंदोलन मागे घेतले.