Thursday, 12 May 2016

[Video] PCNTDA issued notice to 129 temple

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणतर्फे प्राधिकरणातील 129 अनधिकृत धार्मिकस्थळांना जाहीर नोटीसा बजावल्या असून एक महिन्याच्या कालावधीत त्या-त्या धार्मिकस्थळाच्या प्रशासनाने त्यांच्या काही हरकती असतील तर संबंधित क्षेत्रीय कार्यालयात नोंदवाव्यात. त्या हरकतींचा विचार करून शासननिर्देशाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, नवनगर विकास प्रधिकरणचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश आहिरराव यांनी दिली. याविषयी माहिती देताना आहिरराव म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशाप्रमाणे याविषयी वर्तमानपत्रातूनही जाहीर प्रकटन दिले होते व तीच नोटीस जी धार्मिकस्थळे प्राधिकरणाच्या आरक्षित जागेत बांधली आहेत, अशा 129 मंदिरावर लावली आहे. यानुसार धार्मिकस्थळांच्या काही हरकती असतील तर त्यांनी 23 एप्रिल ते 24 मे या 30 दिवसाच्या कालावधीत त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयात द्याव्यात. त्या हरकतींचा अहवाल बनवून तो प्राधिकरण समिती समोर मांडला जाईल. तसाच तो पुढे शासनासमोरही सादर केला जाईल व शासन निर्देशाप्रमाणे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्या बांधकामासाठी सांडपाणी व पुनर्वापर प्रक्रियेच्या शासन नियमावली बंधनकारक ?

शासनाचे महापलिकेला नियमावली राबवण्याचे आदेश एमपीसी न्यूज - महाराष्ट्र शासनाने राज्यातील बृहन्मुंबई व नागपूर महापालिका वगळता इतर सर्व महापालिकांना 15…

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच 'यार्डात'

पुणे : अनेक वर्षांपासून रेगाळलेली हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच यार्डात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मेट्रो प्रकल्पाचा अहवाल येत्या १५ जुलैपर्यंत सादर करा, असे आदेश पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे ...

पिंपरी शहरात पाणी टंचाई असताना उद्यानासाठी रोज आठ तास पाणी

लॉन कोरडे पडू नये म्हणून पाणी, प्रशासनाचे अजब उत्तर एमपीसी न्यूज - पिंपरीतील डेअरी फार्म येथील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाजवळ मिलीट्री व…

तहानलेल्या लातूरसाठी आकुर्डीच्या कंपनीचे 'जलयुक्त लातूर सोशल अॅप'

एमपीसी न्यूज - लातूरचा दुष्काळ सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारा. तहानलेल्या लातूरसाठी रेल्वे सरसावली. त्याचप्रमाणे इतर अनेक सामाजिक संस्थांनी हा दुष्काळ…

वळवाच्या पावसाची जोरदार हजेरी!


पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बुधवारी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आणि हमरस्त्यांवरील वाहनचालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. दुपारीच संध्याकाळसारखे अंधारुन आल्यामुळे वाहनचालकांना गाडीचे दिवे लावूनच प्रवास करावा ...