Wednesday, 7 August 2013

महावितरणचा वीजग्राहक तक्रार निवारण दिन साजरा

महावितरण कंपनीच्या वतीने पुणे परिमंडळातील सर्व विभागीय कार्यालयात मंगळवारी (दि. 6) सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या तक्रार निवारण दिनात 32 तक्रारी

विद्या निकेतन शाळेत'ई- इंटरॅक्टीव्ह लर्निंग'चे उद्‌घाटन

टाटा मोटर्सच्या विद्या निकेतन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये 'ई- लर्निंग टाटा क्लासेस इंटरॅक्टीव्ह लर्निंग'चे उद्‌घाटन नुकतेच कंपनीचे प्रकल्प प्रमुख अनिल सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले.  

कुत्र्यांच्या संतती नियमनालाही महागाईचा फटका

महापालिका मोजणार कुत्र्यामागे 679 रुपये 
मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण, संतती नियमनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका खासगी संस्थेला एक वर्षासाठी कंत्राट देणार आहे. त्यासाठी प्रत्येक कुत्र्यामागे 679 रुपये खर्च करावे लागणार आहेत. महागाईमुळे वर्षभरातच एका शस्त्रक्रियेमागे 74 रुपये जादा

महिला बालकल्याण समिती सदस्यांचा राजीनाम्याचा इशारा

आयुक्तांना दिले पत्र

महिला व बालकल्याण समितीची कोणतीच कामे होत नसल्याची ओरड करीत समितीच्या सदस्यांनी आज (मंगळवारी) आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची भेट घेत राजीनाम्याचा इशारा दिला. शिवसेनेच्या आक्षेपानंतर महिला प्रशिक्षण योजनेचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये

नळजोड अधिकृत करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2013 पर्यंत मुदतवाढ देण्यास व त्यानंतर नियमित करण्यासाठी येणा-या नळ जोडधारकांचे नळजोड तोडण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत आज (मंगळवारी) मंजूर करण्यात आला. त्यासह विविध विकास कामांसाठी सुमारे सव्वातीन कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

31 construction workers died in twin township in past five years

While the construction boom in the twin township of Pimpri Chinchwad shows no signs of slowing down, the safety of construction workers at the sites is becoming a concern

As Pune set to get water twice a day, plan for 24X7 supply in Pimpri-Chinchwad gains momentum

After the success of Yamunanagar scheme, Pradhikaran and Premlok Park next in line, and finally entire town

कामांकडे दुर्लक्ष कराल, तर कारवाई

पिंपरी -&nbsp प्रभागातील तक्रारींचा निपटारा वेळेवर करावा, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी त्यावर देखरेख करावी, या कामांकडे दुर्लक्ष करून कारवाईस भाग पाडू नका, असा इशारा आयुक्‍त डॉ.

31 बांधकाम मजुरांचा पाच वर्षांत मृत्यू

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये मागील पाच वर्षांत 31 बांधकाम मजुरांना जीव गमवावा लागल्याची आकडेवारी समोर आली आहे.

पे अँड पार्कसाठी मासिक शुल्क

पिंपरी -&nbsp 'पे अँड पार्क'च्या जागेवर रात्रीच्या वेळी स्थानिकांकडून उभ्या करण्यात वाहनांकडून मासिक शुल्क घेण्याच्या निर्णयास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

...अन् पूरपरिस्थितीचे संकट टळले !

पूररेषेतील 73 बांधकामांवर हातोडा, नदीपात्रालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई, नाल्यांची यशस्वीपणे सफाई आणि सांगवी व पिंपरीतील दोन अनावश्यक बंधारे फोडल्याने यंदा गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस होऊनही पूरस्थितीचा सामना पिंपरी-चिंचवडकरांना करावा लागला नाही. विशेष म्हणजे यावेळी दोन आठवडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र, निम्मा

मोरवाडीतील कंपनीला भीषण आग; एक कोटीचे नुकसान

मोरवाडी येथील किशोर पॉवर प्रा. लि. कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे एक कोटीचे नुकसान झाले. ही आग आज (मंगळवारी) सकाळी नऊच्या सुमारास लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे सव्वा तासात ही आग आटोक्यात आणली. यामध्ये दोन जवान किरकोळ जखमी झाले.

इंडस्ट्रीअल 'टास्कफोर्स'चे उद्‌घाटन

तारीख व वेळ- 7 ऑगस्ट संध्याकाळी 5 वा.
स्थळ- क्वॉलिटी सर्कल सभागृह, टेल्को रस्ता, भोसरी
उद्‌घाटक- पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ
संयोजक- एमआयडीसी भोसरी पोलीस आणि पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

विवेकानंद केंद्रातर्फे आंतरशालेय समूहगीत स्पर्धा

विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, चिंचवड शाखेतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आंतरशालेय समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 14 ऑगस्ट रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे.
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या

सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 वर्षात 31 बांधकाम मजुरांचा बळी

पिंपरी-चिंचवड कामगारनगरीत टोलेजंग इमारतींचे साम्राज्य उभे राहत असताना बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे वर्षाकाठी असंख्य बांधकाम मजुरांचा बळी जात आहे. एकट्या सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये मागील पाच वर्षात 31 बांधकाम मजुरांना आपला जीव गमवावा लागल्याची आकडेवारी समोर आली आहे.

एमआयडीसीमधील चोरट्यांवर आता 'टाक्स फोर्स' ची नजर

कारखान्यांमधील चो-या रोखण्यासाठी उद्योजक व पोलिसांचा उपक्रम 
औद्योगिक भागातील कारखान्यांमध्ये रात्री घुसून लाखोंच्या साहित्यांवर चोरट्यांकडून डल्ला मारला जातो. त्यात उद्योजकांनामोठे नुकसान होते. पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने मोठा आवाका असलेल्या  औद्योगिक

'व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमात चॉइस बेस्ड व ग्रेडींग'

शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेली दरी कमी करण्याच्या हेतूने पुणे विद्यापीठाने व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासक्रमात बदल करून श्रेयांक पध्दतीचा (चॉइस बेस्ड व ग्रेडींग)अभ्यासक्रम आणला असल्याची माहिती विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्राचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ खेडकर यांनी दिली. चिंचवड येथील आयबीएमआर कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "इंडक्शन-13"

5 from city group conquer Deotibba peak near Manali

PIMPRI: Five mountaineers from the city-based mountaineering group Sagarmatha Giryarohan Sanstha have successfully conquered Deotibba peak near Manali in Garhwal Himalaya.
5 from city group conquer Deotibba peak near Manali