MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 2 December 2017
PMRDA to start Hyperloop study
Pune: The Pune Metropolitan Regional Development Authority, in collaboration with Virgin Hyperloop One, is all set to start a pre-feasibility study of the proposed Hyperloop route project between Pune and Mumbai. The report is to be submitted to the state government by mid-January.
Civic officials plan structural audit of 25-year-old railway overbridge in Pimpri
Pimpri Chinchwad: The civic body will conduct a structural audit of Indira Gandhi railway overbridge in Pimpri constructed 25 years ago.
Shirish Poredi, spokesperson from the engineering department said, "The standing committee approved the structural audit. A private agency will be appointed and a report will be prepared in six months. We will conduct strengthening measures as suggested." It was a proactive measure, he added.
[Video] ‘बापट साहेब पिंपरी चिंचवडकरांना न्याय द्या! मेट्रो निगडी पर्यंत न्या’; विविध संघटनांची मानवी साखळीव्दारे मागणी
पहिल्याच फेजमध्ये पुणे मेट्रो निगडीपर्यंत आणण्याची मागणी करीत आज सामाजिक संस्था कनेक्टीयन यांच्या बॅनरखाली पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमच्या (पीसीसीएफ) सदस्य, तसेच शहरातील विविध संघटनांनी पिंपरी चौकात मानवी साखळी केली. ‘बापट साहेब पिंपरी चिंचवडकरांना न्याय द्या, पहिल्याच फेजमध्ये मेट्रो निगडी पर्यंत न्या’ असे फलक हातात धरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मेट्रो निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी पिंपरीत मानवी साखळी
पिंपरी – पुण्यात व पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे आगमन होत आहे. पिंपरी-चिंचवडसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. तसेच शहराकरीता सोयीची देखील आहे. परंतु प्रथम फेजमध्ये मेट्रो पिंपरी पर्यंतच येत आहे. निगडी बसस्थानकावरून पुणे शहराकडे जाण्यासाठी बसेस 150 टक्के भरुन जातात. तसेच या भागात शैक्षणिक संकुले, शासकीय कार्यालये, कामगार निवासस्थाने, शहरातील पर्यटनस्थळे, वाहतूक नगरी व अन्य महत्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत होणे आवश्यक आहे. पुणे मेट्रो पहिल्याच फेजमध्ये निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टींग एनजीओच्या अंतर्गत आज (शुक्रवार) पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले.
महाकाली, काळभोर टोळीला मोका लावणार - गणेश शिंदे
पिंपरी - रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव याच्या खून प्रकरणात महाकाली आणि सोन्या काळभोर टोळीचा हात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपींना मोका लावण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगवी येथील पत्रकार परिषदेत दिली.
२४ दिवसांत ६५०० किलोमीटर
नवी सांगवी - सुजलाम् सुफलाम् देशाच्या संस्कृतीचा तसेच लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी सांगवीतील पाच बुलेटवीरांनी सांगवी-सिक्कीम व्हाया नेपाळ अशी बुलेटवारी केली. या वारीत चोवीस दिवसांत तब्बल साडेसहा हजार किलोमीटरची ईशान्य भारताची भ्रमंती केली. आजवर निम्म्या देश हिंडलेल्या या वीरांचा सबंध देशच या निमित्ताने अनुभवण्याचा मानस आहे.
प्लॅस्टिकपासून पाईप
पुणे - प्लॅस्टिकच्या बाटल्या, कॅन, पिशव्या, कप अशा विविध प्रकारच्या वापरात नसलेल्या वस्तूंचे संकलन करुन त्याच्यावर पुर्नप्रक्रिया केली जाते. यात प्लॅस्टिकचे मोठे-मोठे गठ्ठे बनवून ते इंदौर, मालेगाव अशा विविध ठिकाणी असणाऱ्या कंपन्यांना पाठविला जातात. यापासून मजबूत आणि टिकाऊ पाईप बनविण्यात येतात. याप्रकारे शहरातून दररोज संकलित होणाऱ्या ६० टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे, असे कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील सल्लागार ललित राठी यांनी सांगितले.
भाजपमध्ये राजीनामानाट्य?
पिंपरी - महापालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य माउली थोरात, मोरेश्वर शेडगे आणि बाबू नायर हे पक्षाच्या शहर जिल्हा कार्यकारिणीत अनुक्रमे संघटन सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि सरचिटणीस असून, या तिघांनाही पक्षाच्या धोरणानुसार पदाचे राजीनामे द्यावे लागणार आहेत. या तिघांकडे एकापेक्षा जास्त पदे असल्याने त्यांच्यावरही राजीनामा देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पाच डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनीच या पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिल्याने पक्षांतर्गत वातावरण ढवळून निघाले असून, कार्यकर्त्यांत चलबिचल वाढली आहे.
मोशीत वाहनांची ब्रेक चाचणी ट्रॅक सुरू
मोशी - वाहनांची ब्रेक चाचणी करणारा ट्रॅक मोशीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुरू करण्यात आला असून, जिल्ह्यातील वाहनचालकांना त्याचा फायदा होणार आहे.
वन्यजीव स्पर्धेचे बक्षीस वितरण
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयात जागतिक वन्यजीव सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले.
मोशीत देशी गायींचे प्रदर्शन
भोसरी – कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे व गोसेवा समितीच्या वतीने 2 व 3 डिसेंबर रोजी देशी गोवंश प्रदर्शन, स्पर्धा व तांदूळ महोत्सवाचे आयोजन मोशीतील संत नागेश्वर उपबाजार आवारात करण्यात आले आहे.
आंतरशालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
पिंपरी – बजाज ऑटोच्या सीएसआर प्रकल्पाअंतर्गत स्थापन झालेल्या बजाज एज्युकेशन इनिशिएटिव्ह मार्फत पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील शाळांच्या गुणवत्ता विकासासाठी आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली.
काळेवाडी परिसरात सर्दी आणि खोकल्याच्या रूग्णांमध्ये वाढ
काळेवाडी – रात्री पारा घसरत असून थंडीचा जोर चांगलाच वाढत आहे तर दुपारी मात्र वातावरण दमट होत असल्यामुळे काळेवाडी परिसरात सर्दी, खोकला व विषाणुजन्य तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
औंधमध्ये आयुर्वेदावर रविवारी परिसंवाद
पिंपरी – केरळ येथील आर्य वैद्य शाळा, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन पिंपरी-चिंचवड व आयुर्विश्व औषधालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय आयुर्वेद परिसंवाद होणार आहे. हा परिसंवाद रविवारी (दि. 3) औंध येथील पं. भीमसेन जोशी सभागृह येथे होणार आहे.
महापालिका शाळेतील शिक्षकांसाठी लोकचेतना संवाद
आकुर्डी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सोनवणेवस्ती येथील विठ्ठलराव सखाराम सोनवणे प्राथमिक शाळेत शिक्षकांसाठी लोकचेतना संवाद कार्यक्रम घेण्यात आला.
Overall crime up 1.14% in Pune, Delhi remains most unsafe
PUNE: The city witnessed a marginal rise of 1.14% in overall crime during 2016, according to the National Crime Records Bureau's (NCRB) 2016 report which was released on Thursday. The number of overall crimes went up from 19,332 cases in 2015 to 19,554 cases in 2016.
मोरवाडीत पथनाट्यातून एड्सबाबत जनजागृती
जागतिक एड्स दिनानिमित्त मोरवाडी, लालटोपीनगर परिसरात आज पथनाट्यातून एड्सबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच परिसरात एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली. मोरवाडी प्रभागाच्या भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पथनाट्य आणि एड्सबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मुळा नदीपात्रालगत अस्वच्छता
पिंपरी – सांगवी फाटा येथील श्रीमंत महादजी शिंदे पुलाशेजारील मुळा नदीपात्रालगत प्लॅस्टिकयुक्त कचरा, भंगार आणि टाकाऊ वस्तू कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. या कचऱ्यामुळे नदीपात्र धोक्यात येवू लागले आहे संबंधित कचरा फेकणाऱ्यावर नागरिकांवर कारवाई करावी करुन नदीपात्रास मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी मागणी शिवशक्ती व्यायाम मंडळाने ह क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
पीएमपी दरवाढीसंदर्भातील स्वाक्षरी मोहिमेची सांगता तीन डिसेंबरला
पुणे – पीएमपीएमएलने केलेल्या दरवाढीच्या विरोधात सजग नागरिक मंच ने केलेल्या स्वाक्षरी मोहिमेची सांगता तीन डिसेंबरला होणार असून, मंच ने 15 हजार स्वाक्षरी मिळवल्या आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)