निगडी-दापोडी मार्ग : सत्ताधारी व प्रशासनाकडून नागरिक वेठीस
पिंपरी : निगडी ते दापोडी बीआरटी मार्ग महापालिका प्रशासनासाठी सतत गळ्याचा फास बनत चालला आहे. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. तर, सत्ताधारी भाजप एकीकडे बीआरटी मार्गाला विरोध करत असून दुसरीकडे याच मार्गासाठीच्या कामांना मंजुरी देत आहेत. ही दुहेरी भूमिका पेचात टाकणारी आहे. नागरिकांना वेठीस धरण्याऐवजी लवकरच बीआरटी चालू करावी, अन्यथा बीआरटी कॉरिडॉर उखडून तरी टाका, असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.