Tuesday, 17 October 2017

भूमिपुत्राच्या विजयाने मोशीकरांची “दिवाळी’

पिंपरी – अस्सल ग्रामीण मातीचा बाज असलेला रांगडा खेळ म्हणजे कुस्ती. ग्रामीण भागातील पैलवान व राष्ट्रीय पदक विजेता प्रसाद सस्ते याने लढतीत इराणच्या सईद महम्मद याला सहाव्या मिनिटातच निकाल डाव टाकून आस्मान दाखविले. यावर प्रेक्षकांनी अक्षरश: मैदान डोक्‍यावर घेतले. मोशी गावच्या सुपूत्राने मिळविलेल्या या विजयाने आकाशाला गवसणी घातली. दिवाळीच्या सुरुवातीलाच हे यश मिळविल्याने मोशीकरांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.

अर्थसंकल्पाची तयारी, पिंपरी चिंचवड महापालिका, सुधारित, मूळ अर्थसंकल्पाच्या आकडेवारीस आजची मुदत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०१७-१८ चा सुधारित आणि सन २०१८-१९ चा मूळ अर्थसंकल्प तयार करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्या दृष्टीने सर्व विभागांनी सुधारित आणि मूळ अर्थसंकल्पाची आकडेवारी १६ आॅक्टोबर २०१७ पूर्वी लेखा ...

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचा घाट, महापालिका प्रशासनाचे गौडबंगाल : काळ्या यादीतील ठेकेदाराला काम

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याच्या गंभीर प्रश्नाचे पडसाद उमटले. भाजपाच्या नगरसेवकांनीही कचराप्रश्नी सत्ताधाºयांना घरचा आहेर दिला. कचरा प्रश्न सुटला नाही, तर प्रभाग कार्यालय, तसेच आयुक्त कार्यालयात कचरा टाकण्यात येईल, असा ...

'पीएमपी'साठी ८०० बस खरेदी करण्याचा निर्णय, मुख्य सभेची मान्यता : पिंपरी महापालिका १६० कोटींचा उचलणार भार

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) ८०० नवीन बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणाºया निधीपैकी ४० टक्के इतका म्हणजेच १६० कोटींचा निधी पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहे. या विषयावर वादळी चर्चा झाली. पीएमपी ...

बंदी असूनही महामार्गावर जड वाहनांची वाहतूक, निगडी-देहूरोड : अरुंद रस्त्यावर अपघाताचा धोका

किवळे : मुंबई-पुणे महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानचे चौपदरीकरण व देहूरोड येथील उड्डाणपुलाचे काम दहा महिन्यांपूर्वी सुरू झाले असून, मे महिन्याच्या अखेरीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी ...

कचरा प्रश्नावरून सत्ताधारी भाजपच्या विरोधात सभागृहात ‘फटाके’

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात चांगलेच फटाके वाजलेत. सत्तेत आलेले भाजप पहिल्या सहामाहीत सपशेल नापास झाले आहेत. त्यांच्यात आणि प्रशासनात नियोजनाचा अभाव आहे, पदाधिकार्यांना कचर्याचे गांभिर्य नाही असे सांगत कचर्याच्या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलेत धारेवर धरले. त्यात भाजपच्याच नगरसेवक राहूल जाधव आणि अभिषेक बारणे यांनी कचरा प्रश्नी आवाज उठवल्यामुळे सत्ताधार्यांना घरचा आहेर मिळाला.

कामचुकार कर्मचाऱ्यांना प्रशासनाचे पाठबळ?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पालिका सेवेते कार्यरत असताना काही कर्मचारी कार्यालयात सकाळी हजेरी लावल्यानंतर आपले खासगी उद्योग चालविण्यासाठी निघून जात असल्याचे निदर्शनास येऊनही प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही. अशा नियमबाह्य पध्दतीने नोकरी करून गलेलठ्ठ पगार लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठिशी घालण्याचा उद्योग प्रशासन करत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपध्दतीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजकारण २४ तास पाण्याचे , यमुनानगर प्राधिकरण, प्रकल्प बंद केल्याने पाणीटंचाई

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. यमुनानगर परिसराचा २४ तास पाण्याचा प्रकल्प सुरू केला होता. भारतीय जनता पक्षाने हा प्रकल्प बंद केला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. याबाबत ...

दिवाळीमुळे फुलांना वाढली मागणी

पिंपरी – पावसामुळे फुलांची तोड होऊ न शकल्याने फुल बाजारात आवक कमी झाली. भाव मात्र गडगडले आहेत. मात्र, तरी देखील दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर राजा शेवंती व झेंडूला मागणी वाढली आहे.
येत्या दोन दिवसांत फुलांचे भाव वधारण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. फुलांचे दर प्रतिकिलो व बंडलनुसार पुढील प्रमाणे – झेंडू (साधा, पिवळा व कोलकत्ता) – 30 ते 40 रुपये किलो, कापरी 40 ते 50 रुपये, गुलछडी – 80 ते 100 रुपये किलो, लिली बंडल – 8 ते 10 रुपये, जरबेरा बंडल – 50 ते 60 रुपये, गुलाब गड्डी (साधा) – 15 ते 20 रुपये, गुलाब गड्डी (डच) – 60 ते 80 रुपये, अष्टर गड्डी (चार नग) – 10 रुपये, किरकोळ बाजारात कागडा गजऱ्याचा भाव प्रति नग 10 रुपये असून, डझनचा भाव 100 रुपये आहे, अशी माहिती सप्तश्रुंगी पुष्प भांडारचे गणेश आहेर यांनी दिली.

वृत्तपत्र विक्रेत्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

पिंपरी – चिंचवड वृत्तपत्र विक्रेत्या मंडळीचा कौटुंबिक दिवाळी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. वाचन संस्कृती वाढीस लागावी, या हेतूने या कार्यक्रमात उपस्थितांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून या विक्रेत्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.

निळूभाऊंच्या आठवणींना उजाळा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि निळू फुले कला अकादमी यांच्या वतीने १३ ते १५ ऑक्टोबरच्या कालावधीत पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले यांच्या नाट्यगृहात आयोजित केलेल्या महोत्सवाचा समारोप ...

दिवाळी पहाट कार्यक्रमातून कलाकारांना व्यासपीठ

पिंपरी – शहराच्या गलबल्यात आणि घड्याळ्याच्या काट्यावर जागे होणारे शहर सनईच्या सुराने आणि शास्त्रीय संगीताच्या मधूर आस्वादाने जागे होते. पिंपरी-चिंचवड शहरात दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंतच्या या पाच दिवसांत जवळपास 200 ते 250 दिवाळी पहाट शहरात साजऱ्या होत आहेत. याच दिवाळी पहाटने मात्र शहरातील छोट्या-कलाकारांना व्यासपीठ मोकळे करून दिले आहे आणि त्यातूनच पुढे नामाकिंत कलाकार उदयास आले आहेत. यंदाची दिवाळीची पहाट देखील शहरवासियांसाठी नक्कीच सुरेल होणार आहे.

हिंद केसरी जोगिंदर कुमार सिंगने केले इराणच्या रेझा हैदरीला चीतपट

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताच्या जोगिंदर कुमारने इराणच्या पैलवानाला अस्मान दाखवले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत हिंद केसरी जोगिंदर कुमारने ...