Wednesday, 11 October 2017

‘गाव ते महानगर’ पिंपरी चिंचवड महापालिकेचा ३५ वर्षाचा प्रवास

पिंपरी (प्रतिनिधी):- आशिया खंडातील ‘श्रीमंत’ महापालिका म्हणून लौकिक मिळवलेले पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या ३५ वर्षात ‘गाव ते महानगर’ असा प्रवास आहे. उद्योगनगरी म्हणून नावारूपाला आलेले हे शहर ‘आयटी हब’ म्हणून ओळखू लागले आहे. देश पातळीवरील ‘बेस्ट सिटी’च्या पुरस्काराने तर शहराच्या शिररेचात ‘मानाचा तुरा’ रोवला गेला आहे. आता या शहराने स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

'गाव ते महानगर' पिंपरी चिंचवड महापालिकेचा ३५ वर्षाचा प्रवास

पिंपरी चिंचवड शहराचा 35 वा वर्धापनदिन! #पिंपरीचिंचवडफर्स्ट म्हणजे काय जाणून घ्या

11 Oct, पिंपरी चिंचवड शहराचा 35 वा वर्धापनदिन!! एकच ध्येय, एकच निश्चय #पिंपरीचिंचवडफर्स्ट #PimpriChinchwadFirst

BMC may help PCMC in drafting revised Development Plan

AFTER submitting its revised draft Development Plan 2034, the Brihanmumbai Municipal Corporation has been approached by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) to help them revise their Development Plan. After the BMC's urban planners ...

वाढत्या उधळपट्टीला चाप लावा, उत्पन्नाचे स्रोत वाढवा!

पर्यायाने जकातीच्या माध्यमातून पिंपरी पालिकेचे उत्पन्न वाढले. पिंपरी-चिंचवड ही 'श्रीमंत' महापालिका ठरली. भरपूर निधी असल्याने विकासाची कामे सुरू झाली. पायाभूत सुविधा वेगाने उपलब्ध झाल्याने देशभरातील विकसित शहरांमध्ये ...

महापालिका अधिकाऱ्यांकडून वृक्षाची कत्तल

पिंपरी – वृक्ष संवर्धन नियमांचे उल्लंघन करत परवानगी शिवाय 10 ते 15 वर्ष जुने फायकस प्रजातीचे वृक्ष महापालिका अधिकाऱ्यांनी बुडापासून तोडले आहे. या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक विलास मडिगेरी यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

हक्‍कासाठी लढणाऱ्याची आश्‍वासनांवर बोळवण

पिंपरी - महापालिकेच्या सर्व नियमांमध्ये बसूनही वशिल्याच्या उमेदवारासाठी एका प्रामाणिक तरुणास महापालिकेने नोकरीतून डावलले. पुराव्यासह हा प्रकार त्या तरुणाने उघडकीस आणला. नोकरीसाठी तो दररोज महापालिकेत चकरा मारत असून, आयुक्‍तांपासून ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण त्याची फक्‍त आश्‍वासनांवर बोळवण करीत आहेत. 

‘बेटी बचाओ’ला डॉक्‍टरांची साथ!

बेटी बचाओ, बेटी पढाओ
भोसरी येथील लेखा हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्मल्यास नैसर्गिक प्रसूती आणि रुग्णालयाचे बिल पूर्ण माफ करण्याची अभिनव योजना तीन महिन्यांपासून सुरू केली आहे. त्यात सिझेरियन झाल्यास ५० टक्के बिल आकारले जात असल्याचेही लेखा हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय साळवे आणि डॉ. पूजा साळवे यांनी सांगितले.

एमआयडीसीसाठी स्वतंत्र अतिक्रमण विरोधी पथक - सुभाष देसाई

पिंपरी - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागांवर होणारी अतिक्रमणे मोकळी करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. अनेकदा ही अतिक्रमणे मोकळी होत नाहीत आणि महामंडळाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. आतापर्यंत सहन करावी लागणारी ही कटकट कायमची मिटणार आहे. ज्या औद्योगिक पट्ट्यात एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत, ती काढण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये पिंपरी-चिंचवड, ठाणे यांचा समावेश करण्यात येणार आहे. अतिक्रमण पथके स्थापन करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाकडून तयार करण्यात येणार आहे. तो मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी "सकाळ'ला सांगितले. 

बांधकाम नियमितीकरणाचा मोजक्‍याच लोकांना फायदा

– माजी नगरसेवक मारुती भापकर यांचा आरोप
पिंपरी – अवैध बांधकामे नियमित करण्याची अधिसूचना राज्य सरकारने जाहीर केली असली तरी यातील कोणती बांधकामे नियमित होणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. नियमितीकरणाच्या नियमांनुसार शहरातील 65 हजार 320 अवैध बांधकामांपैकी मोजकीच बांधकामे नियमित होणार आहेत. त्यासाठी शासनाने किचकट अटी-शर्ती लावल्याने त्याची पुर्तता करताना बांधकाम मालकांना नकी नऊ येणार आहे. हा निर्णय शासनाने नांदेड महापालिका निवडणूक आणि ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

फटाका विक्री स्टॉल नियमावलीकडे दुर्लक्ष

पिंपरी - दिवाळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल विनापरवानगी व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. शहरात 2016 मध्ये फक्त 93 तर या वर्षी आतापर्यंत 66 जणांनी फटाका विक्रीसाठी परवानगी घेतलेली असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली आहे. 

महागड्या वीजेमुळे राज्यातील वीजग्राहक हैराण

इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात वीज महाग ; अतिरिक्त आकारांतूनही ” भार" पुणे – राज्यातील ग्राहक भारनियमनाला सामोरे जात असतानाच मिळणारी वीज देखील इतर राज्यांच्या तुलनेत महाग मिळत असून ग्राहकांना इतर राज्यांच्या तुलनेत प्रतियुनिट तब्बल दोन ते अडीच रुपये जादा मोजावे लागत आहेत. या ग्राहकांवर अतिरिक्त आकारांच्या माध्यमातून अतिरिक्त भार टाकला जात आहे. यामुळे त्यांच्या खिशाला विनाकारण भुर्दंड सोसावा लागत आहे. एकप्रकारे महावितरण राज्यभरातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना चक्क ” टोपी’ घालत असल्याचे चित्र यामुळे उघड झाले आहे. महाराष्ट्रातील ग्राहकांवर हा भार कशासाठी असा सवाल सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत.

पिंपरी चिंचवडकरांनी अनुभवली अद्भूत दुर्गापूजा

पिंपरी (प्रतिनिधी) :-  पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्व असते..! त्याचमुळे दुर्गा पूजेला बंगालमध्ये एकच उत्साह पहायला मिळतो. तोच उत्साह पिंपरी चिंचवडमध्येही अनुभवायला मिळाला. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगाल मधील नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या दुर्गापूजेला मोठी गर्दी पहायला मिळाली. यंदाचे हे सहावे वर्ष होते. विशेष म्हणजे रावणाचा वध करताना दुर्गा रावणाचे संवरक्षण करत होती तेंव्हा रामाने दुर्गा पूजा केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे त्याला मोठी गर्दी होती.

दिल्लीनंतर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी शक्य?

सु्प्रीम कोर्टाच्या दिल्लीबद्दलच्या निर्णयानंतर राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका करणार असल्याचं असीम सरोदे यांनी सांगितलं.

दिवाळीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी (प्रतिनिधी):- दिवाळीनिमित्त निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे आकाशकंदील बनवा कार्यशाळा, किल्ले बनवा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी, प्राधिकरणातील, स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात या स्पर्धा होणार आहेत.

पुणेकर अखेर भारनियमनमुक्त

राज्यातील विजेची मागणी आणि उपलब्धता यांचा मेळ जुळल्याने सोमवारी कोठेही भारनियमन झाले नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरे भारनियमनमुक्त करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. राज्यात सोमवारी १४ हजार ८०० मेगावॉट ...