Tuesday, 9 January 2018

Metro To Run From Nigdi To Katraj: DPR Process Under Way

The MAHA-Metro is planning to extend the Metro line from Pimpri to Nigdi, in the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) jurisdiction, and Swargate to Katraj in the Pune Municipal Corporation (PMC) jurisdiction. Process of preparing a Detailed Project Report in this regard has started, said officials. Brijesh Dixit, managing director of MAHA-Metro, said on Sunday that PCMC Commissioner Shravan Hardikar sought a project report to extend the Metro line from Nigdi to Pimpri. “We have started the process for preparing the DPR,” he said. The DPR will cost about Rs 50-60 lakh, which the PCMC has agreed to pay.

एलबीटी, जीएसटीपोटी बाराशे कोटींचा गल्ला

पिंपरी – राज्य शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद करून वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला आहे. त्याचा सर्वाधिक फटका महापालिकांना बसणार असून त्यांचे उत्पन्न घटण्याची भिती व्यक्त होत होती. मात्र, अडथळ्यांची मोठी शर्यत असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात बाराशे कोटी रुपये जमा झाले आहेत.

Pune-Mumbai Hyperloop route most feasible: Study


पुणे-मुंबई हायपरलूप शक्‍य

पुणे मुंबई प्रवास अवघ्या 14 मिनिटांत
कंपनीने सुचविले तीन मार्ग

पुणे – जगातील सर्वांत वेगवान वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखल्या जाणारा “हायपरलूप’ हा प्रकल्प पुणे-मुंबई दरम्यान राबविणे शक्‍य आहे, असा अहवाल वर्जिन हायपरलूप वन (लॉस एजेंलिस) कंपनीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर केला आहे. यासंदर्भात पीएमआरडीए अभिप्राय देऊन हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणार आहे. हायपरलूप च्या माध्यमातून पुणे-मुंबई प्रवास हा अवघ्या 14 मिनिटात करणे शक्‍य आहे. तसेच या प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली, तर 2026 पर्यंत हा प्रकल्प साकार होऊ शकतो.

रणधीर, ऋषी कपूर यांच्या हस्ते पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे चिंचवडला शुक्रवारी उद्घाटन

जेष्ठ सिने अभिनेते ऋषी कपूर व अभिनेते रणधीर कपूर यांच्या हस्ते १६ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या विस्तारित चित्रपट महोत्सवाचे चिंचवड येथे शुक्रवार दि.१२ जानेवारी सायंकाळी ६.३० वाजता होणार असल्याची माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भोसरीत शुक्रवार पासून ‘सुखी जीवनाचे गुपित’ या विषयावर व्याख्यान

जीवन जगणे ही कला आहे. ती आत्मसात केल्याशिवाय जीवन सुखी, समृध्द व यशस्वी होणे शक्य नाही. व्यसनाधीन व्यक्ती स्वत:च्या हाताने स्वत:च्या संसाराला आग लावून आपल्या बायका पोरांना दु:खाच्या घाईत लोटतात, हे प्रत्यक्ष पाहुण देखील अनेक युवक युवती व्यसनाकडे आकर्षित होत आहेत. त्यांना यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली सद्‌गुरु श्री वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या जीवनविद्या मिशनच्या प्रबोधन चळवळीतून मिळावी व अवघा समाज सुखी व समृध्दी व्हावा. या उद्देशाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली ५१ वा पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रबोधनपर व्याख्यान भोसरीत आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दि.१२ जानेवारी ते रविवार दि. १४ जानेवारी २०१८ पर्यंत ‘सुखी जीवनाचे गुपित’या विषयावर भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाशेजारील गाव जत्रा मैदानावर हा कार्यक्रम होईल. अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रण आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

नाशिकफाटा उड्डाणपुलावरील रॅम्पचा खर्च वसूल करण्याची रमेश वाघेरे यांची मागणी

न्यायालयात दावा दाखल करण्याचा दिला इशारा
महापालिकेने नाशिक फाटा उड्डाणपुलावर 14 कोटी रूपये खर्च करून बांधलेला रॅम्प वाहतुक विभागाची परवानगी न घेतल्याने गेल्या तीन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि सल्लागारांकडून हा खर्च वसुल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे. खर्च वसूल न केल्यास न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सांगवीतील पवनाथडी जत्रेसाठी एक दिवस वाढ – पक्षनेते एकनाथ पवार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रेसाठी मंगळवारी (दि.९)  आणखी एक दिवस वाढविण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली आहे. 

हिंजवडी मार्गासाठी ‘सीएम’चा पुढाकार

प्रस्तावमान्यतेसाठी अरुण जेटलींसमोर शिष्टाई

पुण्यातील पिंपरी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी या दोन मार्गांसह हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गालाही गती मिळावी, यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.

टपाल खात्याकडून नागरिकांना ‘आधार’!

शासनाच्या विविध योजना आणि सेवा- सुविधांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे.

अवैध धंद्यावर कारवाई

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी, संततुकारामनगरमधील लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या मटका धंद्यावर पिंपरी पोलिसानी सोमवारी (दि.8) कारवाई केली. रिपाइंचे अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष खाजाभाई शेख यांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले. याबाबत संततुकाराम नगर पोलिस चौकीत अभिनंदनाचे पत्र दिले. संत तुकारामनगर येथे अग्निशामक केंद्रानजीक लॉटरी सेंटर सुरु आहे. या लॉटरी सेंटरच्या नावाखाली अवैधरित्या मटका सुरु असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. याची दखल घेत पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली.

भाटनगर प्रकल्पाचे “स्ट्रक्‍चरल ऑडीट’ कागदावरच

पिंपरी – भाटनगर पुनर्वसन प्रकल्पाला 27 वर्ष पूर्ण झाल्याने इमारतींना अक्षरशः तडे गेले आहेत. सर्वच इमारतींचे बांधकाम जीर्ण झाल्याने भींतीचा व छताचा काही भाग खाली कोसळत आहे. त्यामुळे अपत्ती घडण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी या पुनर्वसन प्रकल्पातील 17 इमारतींचे “स्ट्रक्‍चरल ऑडीट’ करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. याला दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी हा निर्णय कागदावरच लटकला आहे. प्रत्यक्षात “स्ट्रक्‍चरल ऑडीट’ला सुरूवात केली नसल्यामुळे प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहते की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

महावितरण, महापालिकेत “खोदाई’चे सामंजस्य?

पिंपरी – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला (महावितरण) विद्युत केबल भूमिगत करण्यासाठी प्रति मीटर 2 हजार 350 खोदाई शूल्क आकारून सवलत दरात परवानगी देण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महावितरण कंपनी यांच्यात शहरामध्ये विद्युत विषयक कामे करण्यासाठी सामंजस्य करार होणार आहे.

बाधित नागरिकांना मोफत मिळाव्यात सदनिका

 राहुल कलाटे यांची प्राधिकरणाकडे मागणी
वाकड – वाल्हेकरवाडी येथील बाधित नागरिकांना प्राधिकरणाच्या आगामी गृह योजनेत मोफत सदनिका मिळाव्यात, अशी मागणी पालिकेचे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

विद्यार्थ्याने बनविले टाकाऊ पासून जेसीबी यंत्र

वाल्हेकरवाडी - विद्यार्थ्यांमध्ये सुप्तगुण असतात. त्या गुणांना एक वैचारिक आणि बौद्धिक व्यासपीठ मिळणे गरजेचे असते. दैनंदिन जीवनात आपण भरपूर वस्तू बिनकामी म्हणून फेकून देतो. पण त्याच उपयोगात आणून त्यापासून टिकाऊ वस्तू बनविता येतात. अशीच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ जेसीबी यंत्र रावेत येथील महानगरपालिकेच्या शाळेतील इ. ७ वी. मध्ये शिकणाऱ्या विक्रम छत्ररामजी सोलंकी या विद्यार्थ्याने बनविले आहे. 

शंखानादाने जलपर्णी मुक्‍त “इंद्रायणी’चा प्रारंभ

आळंदी- तीर्थक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीतील जलपर्णी मुक्‍त अभियानाचा शंखनाद आणि हरिनामाच्या गजरात नुकताच शुभारंभ करण्यात आला.

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड

पिंपरी : गेल्यावर्षी पिंपरी चिंचवड सुरू असलेले तोडफोडीचे सत्र यावर्षीही कायम आहे. पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरात टोळक्याने येथील वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (ता.८) पहाटे उघडकिस आली.

मोशी स्पाईन रस्त्याला अतिक्रमणाचे ग्रहण

पिंपरी – चकाचक आणि प्रशस्त मोशी स्पाईन रस्त्याला बेकायदा वाहनतळाचे ग्रहण लागले आहे. अंतर्गत भागात प्रवेश करण्यासाठी असलेल्या साईड रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. वाहतूक पोलिसांचे याकडे होत असलेले दुर्लक्ष आणि वाहनतळाचे धोरण ठरवण्यास होत असलेली चालढकल यामुळे स्पाईन रस्त्याची रया गेली आहे.