Tuesday, 8 May 2018

वाकड फाट्यावरील भुयारी मार्ग वाहतुकीस खुला

नवी सांगवी - औंध-रावेत बीआरटीएस रस्त्यावर वाकड फाट्यावर (पिंपळे निलख) वाय जंक्‍शन येथे बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. ७) आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले. 

नाशिकफाटा उड्डाण पूल रॅम्प, पिंपळे निलखमधील वाय जंक्शन अंडरपास वाहतूकीस खुला; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापलिकेच्या वतीने नाशिकफाटा उड्डाण पूलावरील रॅम्प तसेच पिंपरी निलखमधील वाय जंक्शन अंडरपास वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या दोन्ही मार्गाचे उद्घाटन संपन्न झाले.

नाशिकफाटा उड्डाण पूल रॅम्प, पिंपळे निलखमधील वाय जंक्शन अंडरपास वाहतूकीस खुला; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

Respite for techies travelling to Hinjewadi, as subway at Wakad Phata opens

IT professionals travelling from Pune to Rajiv Gandhi Infotech Park in Hinjewadi will be able to save time on their way with the subway at Wakad Phata, along Aundh-Kiwale Bus Rapid Transit Route (BRTS), opening on Monday. Over one lakh IT professionals travel to the IT park everyday, a majority of them use their private two-wheelers or four-wheelers.

pune, pune news, Wakad Phata, Wakad Phata subway, Indian express news

[Video] PMRDA Pune Ring Road (Pune Connectivity Hub) Official Video

A brief concept video of the 128KM long upcoming ring-road project to be constructed by PMRDA. The ring-road would have service lanes on either side and a provision for metro lanes. This ring-road would also be surrounded by various townships.

तापकीर चौकाला विळखा

पिंपरी - काळेवाडी येथील तापकीर चौकात विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, फळविक्रेते, दुकानदार व पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याचा रहदारीस अडथळा होत असून, चौकातील कोंडी नित्याचीच झाली आहे. हप्ते वसुली, त्यातून मिळालेले अभय यामुळे महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांनी तक्रार आहे. 

शहरातील स्वयंसेवक मदतीस सदैव तत्पर

गरीब रुग्णांना मोफत औषधे, जेवण
‘‘महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या गरीब व असहाय्य रुग्णांना मोफत औषधे, जेवण आणि उपचारादरम्यान गरजेनुसार रक्त उपलब्ध करून देण्याचे काम ‘रिअल लाइफ, रिअल पीपल’ संस्था करते. उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांचा शोध घेणे, ज्यांचे नातेवाईक नसतील त्यांचे उपचारानंतर पुनर्वसन करणे, एड्‌स, क्षयरोग पीडित रुग्णांना सुविधा देणे आदी कामे संस्थेमार्फत २०१० पासून केली जातात,’’ अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते महंमद हुसेन यांनी दिली.

वाहतूक कोंडीत अडकल्या रुग्णवाहिका

पुणे - शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह राबवीत वाहनचालकांकडून दंडाच्या पावत्या फाडणाऱ्या वाहतूक शाखेला दापोडी ते बोपोडीदरम्यान दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यास मात्र वेळ मिळत नसल्याचे वास्तव आहे. दररोज लाखो वाहनचालकांना या रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असताना सोमवारी सायंकाळी दोन रुग्णवाहिकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसला. 

बोपखेल पुलासंदर्भात पालिकेचा चालढकलपणा

बोपखेल व खडकी जोडण्यासाठी मुळा नदीवर उभारण्यात येणार्‍या पुलासाठी लागणार्‍या जागेच्या बदल्यास संरक्षण विभागाने 26 कोटींची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केली आहे. मात्र, ही रक्कम भरण्यास पालिका प्रशासन उत्सुक नाही. सदर रक्कम माफ करण्याबाबतचे विनंती पत्र पालिकेने संरक्षण विभागास पाठविले आहे. मात्र, संरक्षण विभागाने त्यास अनुकूल नाही. त्यामुळे पुल उभारणीस विलंब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

भाजप नगरसेविकेमुळेउड्डाणपूल रखडला

बोपोडी येथे हॅरिस पुलाशेजारी उभारण्यात येणाऱ्या नवीन उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. हा पूल ‌उभारताना अडथळा ठरलेल्या झोपडपट्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेऊन पालिकेने नागरिकांकडून रक्कमही भरून घेतली. मात्र या भागातील नगरसेविका अर्चना मुस‌‌ळे यांनी विरोध केल्याने काम रखडले आहे. नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने आपली भूमिका बदलून विरोध सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संत तुकारामनगरमध्ये रंगले ‘टपर्‍यां’चे राजकारण

पिंपरीतील संत तुकारामनगर मध्ये अनधिकृत टपर्‍यांवरील कारवाईवरुन राजकरण तापले असून महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाम लांडे यांनी महपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीवर सत्तेचा गैरवापर करून विरोधक व गोरगरिबांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँगे्रस यांच्या टपर्‍यांच्या कारवाईवरून राजकारण रंगले आहे. 

गिरीश बापटांना पिंपरी चिंचवडची अॅलर्जी – संजोग वाघेरे

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तेत येण्यापूर्वी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शहरवासियांना विविध आश्वासने दिली होती. शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, बोपखेल, संरक्षण विभागाचे प्रलंबित प्रश्न सोडू अशा वल्गना केल्या होत्या. महिन्यातून एखदा शहरात येऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेणार असे सांगितले होते. तथापि, वर्षभराच्या राजवटीत पालकमंत्र्यांनी शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शहराचा एकही प्रश्न मार्गी लागला नाही. शहराच्या प्रश्नांसाठी बैठका होत नाहीत. महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी बापटांचे पत्रिकेत नाव असते. मात्र, ते हजर राहात नाहीत. त्यामुळे बापटांना पिंपरी चिंचवडची अॅलर्जी आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. माजी उपमुख्यमंत्री व पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार महिन्यातून एक ते दोन वेळा शहरात येत होते. समस्या जाणून घेत होते. प्रश्न त्वरित मार्गी लागले जात होते. परंतु, आता तसे होताना दिसत नाही, असेही ते म्हणाले.

आंद्रा, भामा आसखेडच्या पाण्यासाठी महापालिकेचा फेरप्रस्ताव

जलसंपदा खात्याकडे 267 एमएलडी पाण्याची मागणी

निर्भीडसत्ता – पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणात पाणी धरणात पुनःआरक्षित ठेवण्यात यावे, याकरिता राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या सुचनेनूसार पिंपरी-चिंचवड महापालिकेनेे फेर प्रस्ताव दाखल केला आहे. प्रतिदिन भामा-आसखेड धरणातील 167 एमएलडी आणि आंध्रा धरणातील 100 एमएलडी असे एकूण 267 एमएलडी पाण्याची मागणी केली आहे.

अत्रे नाट्यगृहाचे काम संथ गतीने

पिंपरी – भूताटकी प्रकरणामुळे गाजलेल्या महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या नुतनीकरणाचे काम अतिशय संत गतीने सुरु आहे. विशेष म्हणजे कामाची मुदत उलटूनही काम अपुर्णावस्थेत असून काम पुर्ण होण्यासाठी दिवाळी उजाडणार आहे. त्यामुळे नाट्य रसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वंचितांसाठी समाजकलश

ग्रामीण भागातील वंचित आणि अभावग्रस्तांच्या मदतीसाठी समाजातून संकलित केलेला निधी 'समाज कलश' उपक्रमाच्या माध्यमातून खर्च करण्यासाठी निगडी-प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी केंद्राने पुढाकार घेतला आहे.

म्हाळुंगे आराखड्यातलवकरच होणार बदल

'पीएमआरडीए'च्या पहिल्या टीपी स्कीमवरील हरकतींची सुनावणी पूर्ण

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील म्हाळुंगे-माण येथील पहिल्या नगररचना योजनेवर (टीपी स्कीम) दाखल झालेल्या दीडशे हरकतींची सुनावणी पूर्ण झाली असून, काही बदल करून सुधारित नकाशे जूनमध्ये जाहीर केले जाणार आहेत. त्यानंतर, सरकारकडून लवादाची (आर्बिट्रेटर) नेमणूक केली जाणार असून, टीपी स्कीमच्या मान्यतेच्या पुढील प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे.

मेट्रो शाफ्टचे काम ‘जे. कुमार इन्फ्रा’कडे

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भुयारी मार्गाच्या पूर्वतयारीसाठी मोठे खड्डे (शाफ्ट) तयार करण्यासह स्वारगेट मेट्रो स्टेशन आणि मल्टिमोडल हबच्या कामासाठी 'जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स'ची निविदा पात्र ठरली आहे. 'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन'ने (महामेट्रो) संबंधित कंपनीला कार्यादेश दिले असून, लवकरच बॅरिकेडिंगचे काम सुरू होण्याचे संकेत आहेत. 'शाफ्ट' तयार करण्यासह मेट्रो स्टेशन आणि मल्टिमोडल हबच्या कामासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.

३६२ आधार केंद्रे सुरू असल्याचा दावा, प्रत्यक्षात मात्र २४७ केंद्रे

देशातील प्रत्येक जिल्ह्य़ासाठी केंद्र शासनाकडून १२९ आधार यंत्रे पुरविण्यात आली आहेत.

अनधिकृत हॉटेल्सवर कारवाईची मागणी

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत हॉटेल्स वाढले आहेत. नुकतीच मुंबई येथे एका हॉटेलमध्ये आगीची घटना घडली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक हक्‍क संघर्ष समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली.

ई-कचऱ्याचे जीवघेणे डोंगर (भाग- २ )

संपूर्ण जग आज विकास या एकाच शब्दाच्या मागे धावत सुटले आहे. संगणक आणि मोबाइल फोनसारख्या उपकरणांनी आपले जीवन बरेच सुविधाजनक बनविले आहे. फॅक्‍स मशीन, झेरॉक्‍स मशीन, डिजिटल कॅमेरे, लॅपटॉप, इलेक्‍ट्रॉनिक खेळणी आणि गॅजेट्‌स, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, इलेक्‍ट्रॉनिक थर्मोमीटर अशा वस्तूंनी आपले आयुष्य घेरले गेले आहे. ही यादी आणखीही बरीच मोठी आहे. परंतु या सर्व वस्तूंचा सुखसोयी म्हणून वापर करताना त्यापासून निर्माण होऊ घातलेल्या धोक्‍याबद्दल संभ्रम कायम आहे. ही उपकरणे जेव्हा जुनी होतील आणि वापरातून बाद होतील, तेव्हा ई-कचऱ्याची समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करेल, यात बिलकूल शंका नाही. ही समस्या भारत, चीन यांसारख्या तिसऱ्या जगातील देशांसाठी अधिक गंभीर आहे, कारण अमेरिका, ब्रिटन यांसारख्या विकसित देशांवर या कचऱ्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही.

ई-कचऱ्याचे जीवघेणे डोंगर (भाग- १ )

मोबाइल फोनमुळे संचार क्रांती झाली हे खरे; परंतु जगाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक मोबाइलची संख्या असेल, तर ते मात्र अत्यंत घातक लक्षण मानायला हवे. नवीन मॉडेल आल्यानंतर जुने मोबाइल कचऱ्यात जातात. याखेरीज संगणक आणि अन्य इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचा कचरा आपल्याकडे वाढतोच आहे. प्रगत देश असा कचरा तिसऱ्या जगातील देशांमध्ये निर्यात करून मोकळे होतात, तर आपल्याकडे त्या कचऱ्यातून सोने-चांदी वेगळे करण्याचे घातक व्यवसाय चालविले जातात. ही प्रक्रिया आपल्याला अत्यंत घातक अशा भविष्याकडे घेऊन जात आहे.