Monday, 19 June 2017

‘मध्यावधी’च्या चर्चेने इच्छुकांच्या हालचाली

पिंपरी - शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तापलेले वातावरण आणि शिवसेनेची ताठर भूमिका, यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता पाहता विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील काही इच्छुकांनी त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

स्मार्ट सिटी कंपनीत सेना, मनसेला संधी

सर्वसाधारण सभेत प्रस्ताव : एसपीव्ही कंपनीच्या संचालक निवड
पिंपरी, (प्रतिनिधी) – स्मार्ट सिटीसाठी एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल) कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कंपनीच्या संचालक मंडळात दोन नगरसेवकांना संधी मिळणार आहे. त्यामुळे शिवसेना व मनसेचे नगरसेवकांना स्मार्ट सिटीच्या कंपनी संचालक मंडळात निवडला जाणार आहे. या निर्णयावर मंगळवारी (दि.20) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणार आहे.

आदिवासी संस्कृतीचे संवर्धन होण्याची गरज!

महापौर काळजे : भोसरीत सांस्कृतिक महोत्सव
पिंपरी, (प्रतिनिधी) – आदिवासी बांधव कला व संस्कृती जोपासत असून, त्या कलेचे त्यांनी संवर्धन करण्यास समाजात जनजागृती करावी, याकरिता आदिवासी सांस्कृतिक महोत्सव भरणे आवश्‍यक आहे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्‍त केले.

बेकायदा बांधकामांना लगाम

‘रेरा’ ठेवणार वॉच; तक्रार केल्यास बांधकाम मालकांना दंड
पुणे - कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी न घेता बांधकाम करणे महागात पडणार आहे. कारण, असे बांधकाम केल्याची तक्रार ‘रेरा’कडे (महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲथॉरिटी) केल्यास अथवा आल्यास संबंधित बांधकाम मालकांना एकूण प्रकल्प खर्चाच्या दहा टक्के दंड ठोठविणार आहे. तसेच, ठराविक मुदतीत ‘रेरा’कडे नोंदणी करण्याचे आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडे अर्ज करून परवानगी घेण्याचे बंधनही घालणार आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

PCMC's tarpaulin gift to warkaris is inferior: Oppn

As part of the palkhi tradition, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) contributes some utilitarian aid towards warkaris, which has been shrouded in corruption allegations since last year. In June, when the ruling Bharatiya Janata Party ...

बस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

पिंपरी : पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीच्या अध्यक्षपदाचा पदभार कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा ...

उद्योगनगरीने केली वारकऱ्यांची सेवा

भोसरी : वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथमहाराज विद्यालयातर्फे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांना अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापक माजी आमदार राम मोझे यांनी पालखीचे ... पिंपरी : संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील ...

पालखी सोहळ्यात स्वच्छता व पर्यावरण जनजागृती

पिंपरी, (प्रतिनिधी) – स्व दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, सजग मंच आणि प्रयास महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांमध्ये स्वच्छता व पर्यावरणाविषयक जनजागृती करीत दोन दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.