पिंपरी : केंद्रातील भाजप सरकार व त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे "डिजिटल इंडिया'चे स्वप्न आहे. अधिकाधिक व्यवहार "कॅशलेस' करण्यावर भर आहे. त्याचाच कित्ता भाजपच सत्तेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत गिरवला जात आहे. ऑनलाइनसह डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे पालिका मिळकतकर जमा करून घेत आहे. आता पेटीएमद्वारेही हा कर पालिका आता जमा करून घेणार आहे. त्यामुळे हिंजवडी, तळवडे आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांच्या जोडीने डिजिटल व्यवहार करणाऱ्यांची मोठी सोय झाली आहे. त्यांचा वेळ वाचणार असून फक्त पाच रुपये शुल्कात या सुविधेचा लाभ त्यांना घेता येणार आहे. याद्वारे "स्मार्ट सिटी' आता "डिजिटल सिटी'ही होऊ घातली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 23 January 2018
निगडीपर्यंत मेट्रो: मिस्ड कॉल मोहीमेमुळे 'पिंपरी चिंचवड अस्मिता' जागृत झाली!
2000 मिस्ड कॉल फक्त 2 दिवसांमध्ये! केवळ निगडी, चिंचवड,आकुर्डी मधून नाही तर वाकड, पिंपळे सौदागर, मोशी व भोसरी येथील रहिवासी मिस्ड कॉल मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे कारण मेट्रो जर निगडीला येणार नसेल तर शहराच्या अन्य भागावर अन्याय होणे अटळ आहे... हिंजवडी-चाकण व्हाया आकुर्डी स्टेशन आणि हिंजवडी-मोशी व्हाया वाकड-पिंपळे सौदागर ह्या दोन मार्गांचे भवितव्य अधांतरी राहण्याचा धोका आहे
निगडीपर्यंत मेट्रो: माननीय खासदार श्रीरंग बारणे यांनी मिस्ड कॉल मोहिमेला पाठिंबा दिला
निगडी पर्यत मेट्रो पहिल्या टप्प्यात नेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 29 ऑक्टोबर 2013 ला मंजूरी दिली आहे आणि केंद्र शासनाने 7 डिसेंबर 2016 ला मंजूरी दिली आहे असे असताना पालकमंत्री आणि सत्ताधारी पक्ष निर्णयाची अंमलबजावणी करायला विलंब का करत आहेत? याकडे जनतेच्या माध्यमातून आवाज पोहचवण्यासाठी पिंंपरी चिंचवड सिटीझन फोरम (PCCF) आता अधिक व्यापक मोहीम राबवणार आहे. आम्ही मिस्ड कॉल मोहीम सुरु केली आहे. माननीय खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे यांनी मिस्ड कॉल देऊन मोहिमेला पाठिंबा दिला! त्यांनी नागरिकांना आव्हाहन केले आहे “जास्तीतजास्त लोकांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे”.
सर्वांनी आपल्या मोबाईलवरुन या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सहभाग नोंदवा - 08030636448
सर्वांनी आपल्या मोबाईलवरुन या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सहभाग नोंदवा - 08030636448
अडीच वर्षांत मेट्रो धावणार
- प्रकल्प उभारणीच्या कामाची वर्षपूर्ती
- बालगंधर्वमध्ये विशेष कार्यक्रम
- "महामेट्रो'कडून पिंपरीत आज पाहणी
- पुढील कामाची दिशा ठरविली जाणार
- बालगंधर्वमध्ये विशेष कार्यक्रम
- "महामेट्रो'कडून पिंपरीत आज पाहणी
- पुढील कामाची दिशा ठरविली जाणार
पिंपरी-चिंचवड शहरात 61 मीटर रुंदीच्या रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथील वाहतुकीला अडथळा न येता कामे मोठ्या गतीने सुरू आहेत. या भागातील चार स्थानकांची कामे, तसेच निम्म्यापेक्षा अधिक मार्ग येत्या वर्ष-दीड वर्षात पूर्ण होतील. मेट्रोची पहिली धावही पिंपरी-चिंचवडमध्ये होण्याची शक्यता आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड विभागातील पहिली मेट्रो पिंपरी महापालिका भवन ते शिवाजीनगर धान्यगोदामापर्यंत येत्या अडीच वर्षांत धावणार आहे. त्याच काळात पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठीच्या हालचाली गतिमान होण्याची चिन्हे आहेत.
४४ किलोमीटर वर्तुळाकार मार्गावर मेट्रो धावणार
शहरातील उपनगरांना जोडणारा ४४ किलोमीटर मार्ग मेट्रो मार्गिकेने वर्तुळाकार पद्धतीने जोडण्यात येणार आहे.
Only 7 apply in past 4 months to regularise their unauthorised constructions in PCMC
The PCMC had introduced the scheme for authorising illegal constructions built before December 31, 2015, and to regularise them according to guidelines issued by the state government in September 2017.
शहरप्रमुखांची अडथळय़ांची शर्यत
गजानन बाबर यांनी शिवसेना सोडली तरी त्यांचे बंधू मधुकर व त्यांचा मुलगा योगेश शिवसेनेतच राहिले होते
पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाख घरांची गरज
महापालिकेने स्वत:च्या आणि शासनाच्या जमिनींवर १० हजार घरकुलांच्या बांधणीचे नियोजन केले आहे.
न्यायालयीन शुल्कवाढ कमी करण्याची मागणी
पुणे - राज्य सरकारने न्यायालयीन शुल्कात वाढ केली असून, वकीलपत्रासाठी 10 ऐवजी 30 रुपये, कागदपत्रे मिळविण्यासाठी 50 रुपये आणि जास्तीत जास्त मूल्य असल्याचा दावा दाखल करताना आता तीन लाख रुपयांऐवजी 10 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ही वाढ कमी करावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे.
...तर पेट्रोल सहा रुपयांनी स्वस्त होईल
शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल सर्वांत महाग का आहे? त्याची कारणे काय आहेत?
महाराष्ट्रात देशात सर्वांत महाग पेट्रोल डिझेल मिळते, याला राज्याकडून लावण्यात आलेले विविध कर हेच एकमेव कारण आहे. तेल कंपन्यांकडून विक्रीसाठी बाहेर पडणाऱ्या पेट्रोलचा दर (लॅंडेड कॉस्ट) 29 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा दर हा 19 रुपये प्रतिलिटर आहे. त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून मिळून 48.8 टक्के व्हॅट आणि उत्पादन शुल्क लावले जातो. याशिवाय राज्याकडून पेट्रोलवर 9 टक्के वेगळा सेस आकारला जातो. या नऊ टक्क्यांमध्ये तीन रुपये दुष्काळी कर, तीन रुपये महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन भरून काढण्यासाठी लावलेला कर, एक रुपया शिक्षण, एक रुपया स्वच्छ भारत आणि एक रुपया कृषी कल्याण सेस घेतला जातो. (यातील शिक्षण, स्वच्छ भारत आणि कृषी कल्याणकर हे सध्या तीन वेळा भरत आहोत.) दुष्काळ जाऊन चार वर्षे झाली; तसेच महामार्गावरील दारूबंदीही शिथिल केली, तरीही कर वसूल करून सर्वसामान्यांवर भुर्दंड लादला जात आहे. हे दोन्ही कर तातडीने रद्द करायला हवेत. ते केले तर तत्काळ सहा रुपयांनी पेट्रोल स्वस्त होईल.
महाराष्ट्रात देशात सर्वांत महाग पेट्रोल डिझेल मिळते, याला राज्याकडून लावण्यात आलेले विविध कर हेच एकमेव कारण आहे. तेल कंपन्यांकडून विक्रीसाठी बाहेर पडणाऱ्या पेट्रोलचा दर (लॅंडेड कॉस्ट) 29 रुपये प्रतिलिटर, तर डिझेलचा दर हा 19 रुपये प्रतिलिटर आहे. त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून मिळून 48.8 टक्के व्हॅट आणि उत्पादन शुल्क लावले जातो. याशिवाय राज्याकडून पेट्रोलवर 9 टक्के वेगळा सेस आकारला जातो. या नऊ टक्क्यांमध्ये तीन रुपये दुष्काळी कर, तीन रुपये महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन भरून काढण्यासाठी लावलेला कर, एक रुपया शिक्षण, एक रुपया स्वच्छ भारत आणि एक रुपया कृषी कल्याण सेस घेतला जातो. (यातील शिक्षण, स्वच्छ भारत आणि कृषी कल्याणकर हे सध्या तीन वेळा भरत आहोत.) दुष्काळ जाऊन चार वर्षे झाली; तसेच महामार्गावरील दारूबंदीही शिथिल केली, तरीही कर वसूल करून सर्वसामान्यांवर भुर्दंड लादला जात आहे. हे दोन्ही कर तातडीने रद्द करायला हवेत. ते केले तर तत्काळ सहा रुपयांनी पेट्रोल स्वस्त होईल.
परवडणारी घरे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न
पुणे - ""जाहिरातींद्वारे स्वस्त घरांबद्दल दिलेल्या माहितीवर लोकांचा विश्वास बसणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीमधूनच हा विश्वास संपादन केला जाऊ शकतो. वाढते शहरीकरण आणि घरांची गरज लक्षात घेऊन "पंतप्रधान आवास योजने'द्वारे परवडणारी घरे उपलब्ध करण्यासाठीचे प्रयत्न "पीएमआरडीए'च्या माध्यमातून सरकारकडून केले जात आहे,'' अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.
म्हाळुंगे टीपी स्कीमचा ड्राफ्ट महिनाभरात
पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) म्हाळुंगे -माण येथे सुमारे 719 एकरवर नगर रचना योजना (टीपी स्कीम ) जाहीर केली आहे. या टीपी स्कीमचा ड्राफ्ट येत्या महिनाभरात मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
शास्तीकराच्या नावाखाली चालवलेला ‘सावकारी धंदा’ महापालिकेने बंद करावा – श्रीरंग बारणे
पिंपरी चिंचवड महापालिकेने हद्दीतील अनाधिकृत बाधकामांना शास्तीकर लागू केला आहे. या शास्तीकर दंडाच्या रकमेतून महापालिकेला ५३० कोटी एवढी रक्क्म मिळणार आहे. भाजपने महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता आल्यास शास्तीकर पुर्णत: माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता भाजपची सत्ता येऊन एक वर्ष होत आले. तरी आजपर्यंत शास्तीकर काय माफ होऊ शकला नाही. महापालिका करसंकलन विभागाने नागरीकांना शास्तीकराबरोबरच चक्रवाढ व्याज लाऊन नोटीस दिल्या आहेत. शास्तीकर भरला नाही तर मिळकती जप्त करण्यात येतील अशीही नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिकेने शास्तीकराच्या नावाखाली सावकारी धंदाच सुरु केल्याचा आरोप करत हा धंदा त्वरित बंद करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. चक्रवाढ व्याज लाऊन नोटीसा देणे बंद करावे. तसेच शास्तीकर माफीच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी भाजप नगरसवेकांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे, आवाहनही त्यांनी केले.
पिंपरी-चिंचवडमध्ये १०० टक्के पाणीपट्टी वाढ प्रस्तावित
मागील दहा वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील पाणीपट्टी वाढविण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने थेट १०० टक्के पाणीपट्टी वाढ पिंपरी-चिंचवडकरांसाठी प्रस्तावित केली आहे. यापूर्वी २०० लीटर पाण्यासाठी अडीच रुपये मोजावे लागत होते, परंतु ही वाढ झाल्यानंतर शहरवासीयांना २०० लीटर पाण्यासाठी २५ रुपये मोजावे लागणार आहेत.
व्हॉट्सअॅप बिझनेस या दिवशी होणार लॉन्च….
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपकडून भारतातील यूजर्सना लवकरच नवीन गिफ्ट मिळणार आहे. कारण, गेल्याच आठवड्यात व्हॉट्सअॅपने जगभरातील अनेक देशांमध्ये आपले नवे ‘बिझनेस अॅप’ लॉन्च केले होते. पण आता हे अॅप लवकरच भारतातही लॉन्च होणार आहे.
‘आपले सरकार’ मार्फत पतंजलीच्या उत्पादनांची विक्री
मुंबई : योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांना सरकारी सेवा केंद्रात स्थान देण्यात येणार आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आधार, पॅन, पासपोर्ट सेवेपासून निवडणूक आयोगाच्या सेवांचा समावेश आहे. त्यातच आता रामदेव बाबांच्या पतंजलीला ई-कॉमर्समध्ये खास स्थान देण्यात आले आहे.
रस्त्यावर धावणार ‘भगवी मॅजिक’!
रिक्षा संघटनेचा विरोध : परिवहन मंत्र्यांचा आणखी एक वादग्रस्त निर्णय
पुणे – राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्य सरकारला महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये धोरणात्मक बदल करण्यास लावून सहा आसनी रिक्षा स्क्रॅप करुन त्याबदल्यात टाटा मॅजिक हे वाहन बदली वाहन म्हणून रजिस्टर करण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे, याचा रंगही भगवा असणार असल्याचे समजते. पुण्यातील रिक्षा संघटनेने मात्र याला विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त आणि परिवहन कार्यालयाकडे निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)