Friday, 30 November 2018

‘सीएम’ साहेबांनी दिलेला ‘शब्द’ पाळला – महेश लांडगे

पिंपरी (Pclive7.com):- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधयेक विधानसभेत सादर करण्यात आले. त्याद्वारे मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केला. यावर ‘सीएम’ साहेबांनी दिलेला शब्द पाळला आहे. आज आनंद साजरा करण्याचा दिवस आहे, अशी प्रतिक्रीया आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

जानेवारीपासून एटीएम कार्ड बंद होणार : आरबीआय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज प्रत्येक माणसाचे बँकेत खाते आहे. इतकेच नाही तर सर्वांकडे एटीएम कार्डदेखील आहे. बऱ्याच लोकांना हे माहीत असेल किंवा नसेलही की आपण वापरत असलेल्या प्रत्येक एटीएम कार्डला मॅग्नेटिक स्ट्राईप असते. जर तुम्ही जुने मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड 31 डिसेंबरपर्यंत EMV कार्डमध्ये बदलून घेतले नाही तर 1 जानेवारीपासून एटीएम कार्ड बंद होणार आहे. 

सर्व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करा

राज्यातील सर्व शासकीय कार्यालये  ‘तंबाखूमुक्त क्षेत्र’ करण्याचे परिपत्रक केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव प्रीती सूदन यांनी गुरूवारी जारी केले. हे परिपत्रक सर्व राज्याच्या सचिवांना जारी केले आहे.  यामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात तंबाखूमुक्त क्षेत्र असल्याची सूचना लिहीने आणि उल्लंघन करणा-यांकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्याच्या सूचना केल्या आहेत.

‘बीआरटी’ थांब्यावर आता स्वच्छतागृह, पाणपोई

पिंपरी-चिंचवड महापालिकेने बीआरटी मार्गावर लोखंडी बॅरीकेटस लावणे, अद्ययावत बस थांब्यांची उभारणी, सिग्नल यंत्रणा, सुरक्षारक्षक व ट्रॉफीक वॉर्डनची नियुक्ती तसेच, सातत्याने दुरूस्ती कामावर कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. आता या थांब्यांवर सुलभ स्वच्छतागृह व पाणपोईची सोय उपलब्ध करून देऊन या उधळपट्टीस प्रोत्साहन देण्याचा ऐनवेळीचा निर्णय शहर सुधारणा समितीने घेतला आहे. 

स्मार्ट सिटीच्या निविदेत ‘रिंग’? भाजप नगरसेवकाच्या तक्रारीवर आयुक्त म्हणतात….

एमपीसी न्यूज – ”स्मार्ट सिटीच्या कामात ‘रिंग’ झाल्याचा संशय व्यक्त करणारे भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचे पत्र प्राप्त झाले. त्याअनुषंगाने त्यांना माहिती देण्यात येत आहे. निविदेमध्ये काहीही चुकीचे झाले नाही. चुकीचे झाल्यास मी स्वत: निविदा रद्द करेन ” असे स्पष्ट करत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, महापालिकेत तक्रारी तर कायमच येत असतात. 

पाणी कपातीचे संकेत; पदाधिकारी, अधिका-यांची बैठक

एमपीसी न्यूज – पवना धरणातून दिवसाला 480 एमएलडीऐवजी 440 एमएलडीच पाणी उचलण्याचे सक्त आदेश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. आजमितीला धरणात 79.93 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा 30 जून 2019 पर्यंत पुरु शकेल. तथापि, पावसाने ओढ दिल्यास पुढे काय करायचे? असा प्रश्न आहे.

आमदार महेशदादा लांडगे अभिष्टचिंतन सोहळा!


जेव्हा बाळासाहेब शरद पवारांची खिचाई करतात | भारताचे दिग्गज एकाच मंचावर बघाच

‘पीएमआरडीए’च्या बीआरटी संदर्भात विजय पाटील यांनी घेतली आयुक्तांची भेट

पिंपरी-चिंचवड-पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) भविष्यात १४८ कि.मी. क्षेत्रात आठ मार्गांचे बीआरटीचे जाळे उभारणार आहे. ह्या आठ रस्त्यांमध्ये चार क्रमांकावर सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील वादग्रस्त असलेला “एचसीएमटीआर रिंग रोड” आहे. ह्या प्रस्तावित रिंग रोडमुळे गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी ह्या उपनगरातील ३५०० पेक्षा जास्त घरे बाधित होत आहेत. ह्या घरांकरिता तसेच ६५००० अनधिकृत घरांच्या नियमितीकरण प्रश्नांकरिता प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती सोसायटी- महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते यांची प्राधिकरण येथील मुख्य कार्यालयात भेट घेत निवेदन दिले.

भोसरी पोलिसांकडून चोरीची 33 वाहने जप्त

पिंपरी (पुणे) : मौज मजेसाठी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे 33 वाहने हस्तगत केली.

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी तीन बीआरटी रोड

पिंपरी - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तीन बीआरटी मार्गांचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये कस्पटे वस्ती-काळेवाडी फाटा, हाय कपॅसिटी मास ट्रांझिस्ट रोड (एचसीएमटीआर) आणि चिंचवड ते तळवडे या रस्त्यांचा समावेश आहे. महापालिकेने उभारलेल्या बीआरटी रस्त्यांना पीएमआरडीएचे बीआरटी रोड जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. 

तळवडे आयटी कर्मचारी धास्तावले

पिंपरी - रात्री घरी परतणाऱ्या तळवडे आयटी पार्कमधील नोकरदारांना लुटण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे कर्मचारी धास्तावले असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 
मागील आठवड्यात तळवड्यातील कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या तीन ते चार घटना घडल्या. चार ते पाच जण काठ्या घेऊन कर्मचाऱ्यांवर धावून गेले होते. मात्र, या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर संबंधित आयटी कंपनीच्या व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रारही नोंदविल्याचे फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (फाइट)चे अध्यक्ष पवनजित माने यांनी सांगितले. 

शहरात स्केटिंगचा सराव करणे शक्‍य

पिंपरी - महापालिकेच्या इंद्रायणीनगर येथील (प्रभाग क्र.८) २.४७ एकर जागेवरील सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्चाच्या कै. पै. मारुती (नाना) सहादू कंद स्केटिंग रिंकचे (पहिला टप्पा) नुकतेच उद्‌घाटन झाले. यापूर्वी, शहरातील खेळाडूंना विमाननगर (पुणे) अथवा कासारसाई (हिंजवडी) येथे सराव, स्पर्धा आणि प्रशिक्षणासाठी जावे लागत असे. आता, खेळाडूंना शहरातच सराव करणे शक्‍य होणार आहे.

चऱ्होली फाट्यावर रखडलेले पालखी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण

पिंपरी - आळंदी-पंढरपूर पालखी मार्गाचे चऱ्होली फाटा येथे भूसंपादनाअभावी रखडलेले सुमारे पाचशे मीटर लांब रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. कार्तिक वारीच्या पार्श्‍वभूमीवर रुंदीकरण केलेल्या रस्त्याचे डांबरीकरण वेगात सुरू आहे. 

मगर स्टेडियम पीपीपी तत्त्वावर होणार विकसित

पिंपरी - नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत तेथील जलतरण तलाव तसाच ठेवून स्टेडियमच्या आवारात विविध खेळांची मैदाने आणि संकुले विकसित करण्यात येणार आहेत.

दापोडीतील समांतर पुलाला मार्चचा मुहूर्त

पिंपरी – दापोडी येथे असलेल्या हॅरिस पुलाला समांतर असणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. दुसऱ्या बाजूला खांब उभारणीचे काम सुरु असून मार्च महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्‍यता आहे. या पुलामुळे पुणे व पिंपरीकडे जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीमुक्त प्रवास करता येणार आहे.

वायसीएम’च्या वैद्यकीय अधिक्षकांना सक्‍त ताकीद

पिंपरी – लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडीत बालिकेवर योग्य उपचार न करता तिला ससून रूग्णालयात पाठविण्याबाबत निष्काळजीपणा करणारे महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच भविष्यात कर्तव्यपालनात कसूर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी ताकीद महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

…तर कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतो!

पिंपरी – महापालिकेच्या कर संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांना ठरवून दिलेले वसुलीचे महसूल उद्दीष्ट पूर्ण केल्यास प्रशासकीय कारवाई मागे घेण्याचे आश्‍वासन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले. त्याकरिता 31 मार्च 2019 ची “डेडलाईन’ दिली आहे.