Thursday, 3 January 2019

Nigdi : भक्ती-शक्ती चौकातील तीनमजली उड्डाणपूल वर्षाअखेरीस होणार खुला

 एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात सुरु असलेल्या ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पुलाचे काम सुमारे 50 टक्के पूर्ण झाले आहे. वर्षाच्या अखेरीला प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर हा चौक ‘सिग्नल फ्री’ होईल. त्यामुळे चारही बाजूनी येणारी वाहने वेगाने मार्गस्थ होणार आहेत. चौकातील वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे. 

Pimpri: च-होली, पुनावळे, रावेत मधील विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या च-होली, वडमूखवाडी, रावेत आणि पुनावळे येथील शाळेतील गोरगरिब मुलांना महापालिकेतर्फे मोफत स्कूल बस सुविधा पुरविण्यात येणार आहे. चार महिन्याच्या कालावाधीसाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी चार लाख रुपयांचा खर्च येणार असून याबाबतचा प्रस्वात स्थायी समितीसमोर दाखल करण्यात आला आहे. 

सोसायट्या ‘सहकारी’च हव्यात

पिंपरी - शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिक सोसायट्यांची नोंदणी अपार्टमेंट डीड अशी करत असल्याने सहकारी गृहनिर्माण संस्थेला असलेले फायदे अशा सोसायट्यांना मिळत नाहीत. त्यामुळे दहापेक्षा अधिक फ्लॅट असणाऱ्या इमारतींची नोंदणी सहकारी गृहरचना संस्थेमध्ये करण्यासाठी सरकारनेच दबाव आणावा, अशी आग्रही मागणी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. शहरात साठ टक्के इमारतींची नोंद अपार्टमेंट डीड अशी आहे.

समांतर हॅरिस पुलावर लवकरच स्लॅब

पिंपरी - हॅरिस पुलाला समांतर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या शेवटच्या गर्डरचा स्लॅब टाकण्याची तयारी महापालिकेने सुरू केली असून, महिन्याभरात ते काम पूर्ण होईल. नवीन पुलाच्या पुणे बाजूकडील पोच रस्त्याचे कामही सुरू झाले आहे.

व्यायामशाळा स्थलांतरणास विरोध

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून कार्यान्वयीत करण्यात आलेली व्यायामशाळा इतरत्र स्थलांतरित करु नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

Agency appointed for slum rehabilitation

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has appointed a private agency for carrying out rehabilitation and slum developmen.

Parking lots to come up along PCMC-Swargate Metro route

Pimpri Chinchwad: The Maharashtra Metro Rail Corporation (MahaMetro) will develop parking space at key points along the Pimpri-Swargate Metro route.

Apps of engineer generate over 1 lakh downloads

A college topper from Pimpri Chinchwad College of Engineering, Londhe passed out in May 2018. He is preparing for higher studies and has over eight ap.

Placements in engineering colleges up by 15%

PUNE: Placements in top colleges have increased by at least 15% this year compared to the number of recruitments in the same period last year.

A day after inauguration, gutka stains deface the walls of Sai Chowk flyover

PUNE: Spit-stained walls are what the 300-metre Sai Chowk flyover had to show on Tuesday, just a day after PCNTDA threw it open to public.

To ease traffic, new bridge to come up on Mula river

PUNE: An additional bridge will come up parallel to the existing one at Aundh, easing traffic on the Aundh-Sangvi-Wakad stretch.

पुणे विभागीय आयुक्तपदी डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे आता पुण्याचे नव विभागीय आयुक्त असतील. त्यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.

अनुभवी व अभ्यासू व्यक्तींची संतपीठावर निवड – सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचे राष्ट्रवादीला उत्तर

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीच्या नावलौकीकात भर टाकणारे जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ टाळगाव चिखली येथे पिंपरी-चिंचवड महापालिका उभारत आहेत. वारकरी सांप्रदाय आणि संत साहित्यांचा अभ्यास असलेल्या लायक व्यक्तींचा संतपीठाच्या समितीवर  निवड केली आहे, असे उत्तर पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेस दिले. निव्वळ प्रसिद्धीसाठी विरोधक प्रत्येक गोष्टीस विरोध करीत आहेत, असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

महापालिकेची वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) रोखतात वृक्षांचा श्वास – दिनेश यादव

चिखली (दि. २ जाने.) :-  दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे हवामानात बदल होवून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावण्याचे धोरण पिंपरी चिंचवड मनपाने ठरविले आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात वृक्षारोपनाचा कार्यक्रम हाती घेतला जातो. तसेच लावलेल्या वृक्षाची, रोपट्याची निगा राखता यावी, त्यांचे नागरिकांपासून, जनावरांपासून किवां इतर संभाव्य धोक्यांपासून संरक्षण व्हावे, याकरीता महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून, वृक्ष संरक्षक जाळी (ट्रि गार्ड) खरेदी केली जाते.

पवनाथडी जत्रेत खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने  महापालिकेतर्फे 4 ते 8 जानेवारी दरम्यान पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसाच्या जत्रेत खाद्यपदार्थांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

दोन हजार रोपांचे मोफत वाटप करून नववर्षाचे स्वागत

सांगवी : पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशनच्यावतीने शिवार चौक आणि खेळाचे मैदान याठिकाणी विविध जातीच्या सुमारे दोन हजार रोपांचे मोफत वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे. यावेळी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, अध्यक्षा कुंदा भिसे, पी.के.स्कूलचे संस्थापक जगन्नाथ काटे, शंकर चोंधे, राजेंद्र जयस्वाल, विनोद भल्ला, विकास काटे, सुनीता बच्चे, मोहिनी मेटे, सुवर्णा काटे, कांचन काटे, मीनाक्षी राजू देवतारे, प्रकाशनगरकर, संभाजी कुंजीर, अशोक काटे, सतीश काटे, संजय डांगे, सागर बिरारी, आनंद योगा हास्यक्लब, नवचैतन्य हास्यपरिवार यांच्यासह विविध सोसायटीचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.

स्वच्छ शहराला अधिकाऱ्यांमुळेच खोडा

पिंपरी - शहरात शंभर टक्के स्वच्छ भारत अभियान राबविण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले असताना आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी मात्र अन्य विभागांमध्ये कार्यालयीन कामकाज करीत असल्याचे आयुक्तांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे स्वच्छ शहर संकल्पनेला पालिकेच्याच काही अधिकाऱ्यांमुळे खोडा घातला जात असल्याचे चित्र आहे. परिणामी शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.

काळेवाडीतील समस्यांबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्याला घेराव (व्हिडिओ)

पिंपरी - काळेवाडीतील विविध कारणांसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत न केल्याने; तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सतत होणाऱ्या अपघातांच्या निषेधार्थ मनसे महिला आघाडीने चिंचवड 'ब' क्षेत्रीय अधिकाऱ्याला घेराव घातला. त्या वेळी प्रशासनाने दुरुस्तीचे लेखी आश्‍वासन दिले.

“सारथी’च्या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन फरक

पिंपरी – महापालिकेच्या सारथी हेल्पलाईनसाठी ठेकेदारी पद्धतीने नियुक्त केलेल्या दहा “कॉल ऑपरेटर’ यांना आता अर्धकुशल कामगार म्हणून वेतन मिळणार आहे. त्यांना पूर्वी दिले जाणारे 16 हजार रूपये वेतन आता 23 हजारांवर पोहोचले आहे. याशिवाय या कामगारांना 1 जूनपासूनचा फरकही मिळणार आहे.

जादा दराच्या निविदांचा सपाटा सुरूच

पिंपरी – महापालिकेत विविध कामांसाठी राबविल्या जाणाऱ्या निविदा प्रक्रियेतील घोळ नवीन नाही. मात्र, प्राकलन दरापेक्षा जादा दराच्या निविदा स्वीकारण्याचा सपाटा सुरू झाला आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वायसीएम रुग्णालयात काही नुतनीकरणाची कामे करण्यात येणार असून त्यासाठीही निविदा दरापेक्षा तब्बल 1 कोटी 37 लाख रूपयांची जादा दराची निविदा आल्याने एकूणच महापालिकेच्या कारभारावर संशयाचे मळभ दाटले आहे.

उद्यानाचे “सेफ्टी ऑडीट’ करण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील उद्यानातील घसरगुंडीवर खेळत असताना पत्र्यात पाय अडकल्याने सहा वर्षाच्या मुलाची करंगळी निकामी झाली. यामुळे उद्यानातील निकृष्ट खेळण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिका हद्दीतील सर्व उद्यानांचे “सेफ्टी ऑडीट’ करुन तुटलेल्या खेळण्यांची दुरुस्ती करण्याची मागणी मुलाचे पालक मयूर जोशी यांनी महापालिकेकडे पत्राद्वारे केली आहे.

उद्यानातील निकृष्ट खेळणीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर

चौफेर न्यूज ः महापालिकेच्या हद्दीतील सर्व उद्यानाचे सेफ्टी ऑडीट करुन तुटलेल्या खेळणीची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. संभाजीनगर येथील महापालिकेच्या उद्यानातील घसरगुंडीवर खेळत असताना पत्र्यात पाय अडकल्याने सहा वर्षाच्या मुलाची करंगळी निकाळी झाली. या घटनेवरून मुलाचे पालक मयूर जोशी यांनी महापालिकेकडे उद्यानांचे ऑडीट करण्याची मागणी केली आहे. यामुळे उद्यानातील निकृष्ट खेळणीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.