Saturday, 24 March 2018

‘वाय जंक्‍शन’ एप्रिलमध्ये खुला

पिंपरी - वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वाकड फाट्याजवळ विकसित करण्यात आलेला भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत महापालिकेने दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता पाच महिन्यानंतरही झालेली नाही. त्यामुळे ‘भुयारी मार्गाला मुहूर्त कधी मिळणार?, असा प्रश्‍न रोजच्या वाहतूक कोंडीला वैतागलेले नोकरदार विचारत आहेत. दरम्यान, प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.

India’s biggest electronic cluster project set to take off at Bhosari, Pune

The project is part of the central government’s electronic manufacturing clusters scheme of 2012 to enable India become a global player in electronics and also to support creation of world-class infrastructure in electronics system and design manufacturing.

Of the three Brownfield electronic cluster projects approved by the central government, MECF in Pune is the largest with Rs 50 crores central aid. The other two Brownfield clusters are at Mysore (Rs 21 crores) and Aurangabad (Rs 20.5 crores) ‘grant in aid’ by the Centre.

PCMC to prepare plan for non-motorised transport

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is looking to prepare a non-motorised transport plan to reduce traffic congestion and air pollution.

No space for Sangvi cops

Staff have been working out of nine shop spaces since 2008 without power backup or clean drinking water

दोन वर्षांत शहरात १६ हजार परवडणारी घरे

पिंपरी - शहरात आगामी दोन वर्षांत वेगवेगळ्या संस्थांमार्फत सुमारे १६ हजार परवडणारी घरे (ऑफर्डेबल हाउस) उपलब्ध होणार आहेत.

Maharashtra: Ban comes into force, dispose of all plastic materials in a month

MUMBAI: You have just one month to dispose of all the plastic bags and cutlery and thermocol that you have at home as the state-wide ban on plastics came into effect on Friday.

आम्ही करू प्लॅस्टिकचा पुनर्वापर...!

पुणे - प्लॅस्टिक व थर्माकॉलपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या व इतर वस्तूंवर बंदी घालणे हा पर्यावरणासाठी उपाय नाही. प्रत्येक प्रकारच्या प्लॅस्टिकचा फेरवापर होऊ शकतो. राज्य सरकारने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. 

हातगाडी, टपरीधारकांचा कापडी पिशव्या वापरण्याचा निर्णय

चौफेर न्यूज – प्लास्टीक पिशव्यांचा वापरामुळे होत असलेली पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे सभासदांनी एकत्र येऊन ग्राहकांना कापडी पिशव्या देण्याचा व नेहमीचे ग्राहकांना बाजारातुन वस्तू खरेदी करताना कापडी पिशव्या जवळ बाळगण्याचे आवाहन केले आहे. यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

चिखलीत रविवारी मोफत सामुदायिक विवाह सोहळा

पिंपरी – नगरसेवक राहुलदादा जाधव स्पोर्टस्‌ फाउंडेशनतर्फे नगरसेवक राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 25) चिखली येथे सर्वजातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये सोळा जोडपी विधीवत विवाहबद्ध होणार आहेत.

रोज 85,500 लिटर पाणीबचत

वाल्हेकरवाडी - रावेत येथील सेलेस्टियल सिटी सोसायटीतील नागरिकांनी सदनिकांमधील ९५० नळांना स्वखर्चातून एरेटर बसविले. यामुळे दररोज साधारणतः ८५ हजार ५०० लिटर पाणीबचत होत आहे. 

[Video] पिंपरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना फ्रान्सच्या कमर्चाऱ्यांसारखा युनिफॉर्म?

फ्रांस येथील साफसफाई कर्मचाऱ्यांना अनेक सुविधायुक्त युनिफॉर्म दिला जातो तसाच युनिफॉर्म पिंपरी चिंचवडच्या तेजस्वी शिंदे यांनी बनविला असून त्याचे प्रात्यक्षिक पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले असून आयुक्तांनी प्रपोजल सादर करण्यास सांगितले असून आयुक्तांनी ठरविल्यास हा युनिफॉर्म पिंपरी महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले जाऊ शकतो 

चिखलीतील लाकडाच्या गोदामाला आग; बेकायदा दुकानांवर कारवाईची मागणी

चिखलीतील भंगाराच्या दुकानाला व गोदामाला शुक्रवारी (दि.23) दुपारी अचानक आग लागली. या आगीने तत्काळ रौद्र रुप घेतले. ही माहिती समजताच अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले.आग विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या आगीचे कारण समजू शकले नाही. या घटनेत नेमके किती नुकसान झाले, हे समजू शकले नाही. चिखली परिसरात शेकडो भंगार मालाची दुकाने आहेत. याठिकाणी वारंवार आगीच्या घटना घडत असतात. मात्र, महापालिका प्रशासनाने वेळोवेळी बोटचेपी भूमिका घेतल्याने या बेकायदा दुकानांवर कारवाई होत नाही. परिणामी, सर्व कायदेकानू धाब्यावर बसवून सुरु असलेली ही भंगार मालाची दुकाने चिखलीसाठी ज्वलंत प्रश्न बनली आहे.

‘महावितरण’कडून सुटीतही कारवाई

पुणे - वीजबिल मुदतीत न भरणाऱ्या थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम साप्ताहिक सुटीच्या दिवशी (ता. २४ आणि २५) या दोनही दिवस केले जाणार आहे. तसेच महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र यादिवशी सुरू राहणार आहेत. 

सुरक्षा रक्षकांच्या पैशांवर पदाधिकाऱ्यांचा डल्ला

पिंपरी – तास न तास उभे राहून आपली ड्युटी चोख बजावणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या हक्‍काच्या पगारावर देखील संस्थांचे पदाधिकारी डल्ला मारत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी सुजाण नागरीक संघाने सुरक्षा रक्षकांच्या हक्‍कासाठी आवाज उठवला आहे.

शहरात हल्ल्याच्या दोन घटना

पिंपरी – पुर्ववैमनस्यातून शहराच्या दोन घटनांमध्ये दोन तरुणांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. चिंचवड व पिंपळे निलखमध्ये या घटना घडल्या.

प्रमोशन के प्रस्ताव में ‘डील’ का आरोप; मुख्यमंत्री से की जांच की मांग

पिंपरी। पुणे समाचार ऑनलाइनहालिया सम्पन्न हुई पिम्परी चिंचवड़ मनपा की सर्व साधारण सभा मे मुख्य स्वास्थ्य व चिकिसीय अधिकारी पद के प्रमोशन के प्रस्ताव नौ उप अभियंताओं को कार्यकारी अभियंता पद पर प्रमोशन देने के उपसुझाव के साथ पारित किया गया। इस प्रस्ताव में बड़ी ‘डील’ होने का आरोप लगाते हुए सामाजिक कार्यकर्ता व पूर्व नगरसेवक मारुति भापकर ने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस से शिकायत की है और इस पूरे मामले की जांच की मांग की है।

मुलाचे शव हातात घेऊन वडील मागत होते न्याय; वायसीएमम रुग्णालयाचा निष्काळजीपणाचा कळस

पिंपरी (Pclive7.com):- बाळंतपणात पहिले अपत्य गमावल्याचे दुःख उराशी होते. अनेक वर्षांनी पत्नी गर्भवती राहिली अन खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्याने वायसीएम रुग्णालयात नोंदणी केली. अचानक पत्नीच्या पोटात दुखू लागल्याने चाकणहून थेट वायसीएम गाठले. मात्र डॉटरांनी बिना तपासताच दिलेल्या तारखेलाच या असे सांगत खडसावले. तर दुसरीकडे अर्जंट लिहले असतानाही रुग्णालयाने गर्दी असल्याचे सांगत सोनोग्राफी टाळली. पोटात कळा घेऊनच तिने पुन्हा चाकण गाठले. वेदना सहन करत रात्र गेली अन सकाळी ती घरातच बाळंतीण झाली. रुग्णालयात आणेपर्यंत त्या पोटच्या गोळ्याने जीव सोडला होता अन आईसुद्धा अर्धमेली झाली होती. अन ‘गरिबाला वाली नसतो’ असे म्हणत ते वडील हातात मुलाचे शव घेऊन न्यायासाठी फिरत होते.

मतदार-आधार कार्ड लिंक करण्याचा आमचा प्रयत्न – निवडणूक आयोग

नवी दिल्ली :  सरकारकडून विविध ओळखपत्रे आणि शासकीय योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्याचाही पुढे जावून आता निवडणूक आयोगही मतदार कार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समोर आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी मतदार कार्ड आधार कार्डसोबत जोडण्याचा आमचा विचार आहे. परंतु, आधार कार्ड अनिवार्य करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

रेल्वेच्या मालमत्तांवर देखरेखीसाठी उपग्रहाची मदत घेणार

जीपीएस आधारित नकाशे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार
नवी दिल्ली – भारतीय रेल्वेच्या अनेक मालमत्ता, ज्यात प्रामुख्याने जमीनींचा, त्यांची देखरेख, व्यवस्थापन आणि जपणूक करण्याची गरज आहे. देशभर पसरलेल्या या मालमत्तांचे जीआयएस नकाशांच्या मदतीने संरक्षण आणि व्यवस्थापन करण्याचा निर्णय, रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या पद्धतीने नकाशे तयार करून त्यानुसार रेल्वेचे पोर्टल तयार केले जाणार आहे.

गॅस सिलेंडरप्रमाणे डिझेलचीही आता ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’

पुणे – गॅस सिलेंडरप्रमाणे डिझेलसुद्धा आता आपल्याला घरपोच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तेल कंपन्यांनी खास वाहन तयार केले आहे. याची सुरूवात पुण्यातून होणार आहे. तेल कंपन्याच्या या उपक्रमाला ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशननेही पाठिंबा दर्शविला आहे.