Monday, 15 May 2017

Thyssenkrupp to consolidate elevator manufacturing at Chakan plant

Pune: Jagtap, Landge on the back foot after CM 'snub'

JUST two months after it assumed power in Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), the BJP is already finding it tough to grapple with the internal dissension. The 'discord' became quite apparent in the protest by 'disgruntled' party workers and ...

सुट्ट्या मंजूर करण्यासाठी दारूची बाटली मागणारा अधिकारी गजाआड, पिंपरी चिंचवड येथील प्रकार

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आरोग्य निरीक्षक तानाजी दाते (50) याला लाचपुचपत प्रतिबंधक पथक एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. महापालिकेतील एका कर्मचाऱ्याला सुट्ट्या मंजूर करण्यासाठी त्याने लाच मागितल्याचा आरोप आहे.

नगरसेविका सविता खुळे यांच्या प्रयत्नांना यश

रहाटणी : महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध योजना दिल्या जातात. मागील महिन्यात पालिकेच्या वतीने गटांना प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदान देण्यात आले. त्यामध्ये रहाटणी येथील सहा महिला बचत गटांना अनुदानाचा लाभ मिळाला. नगरसेविका सविता खुळे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे रहाटणीतील या बचत गटांना अनुदान मिळाले असल्याचे महिलांनी सांगितले.

शेखर चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘वही-पेन संकलन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचा’ उपक्रम

चिंचवड : सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे युवा नेतृत्व शेखर बबनराव चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात गरजू, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ‘वही-पेन संकलन उपक्रम’तसेच पर्यावरणच्या संवर्धनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उपक्रम राबविण्यात आला.

महामार्ग ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पालिका राजी!

  • पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची तयारी
  • 850 दुकानांतून दारू विक्री पुन्हा सुरू होणार
पुणे – पुणे शहरातून जाणारे मात्र राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग असलेले रस्ते महापालिकेच्या ताब्यात घेण्याची तयारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने दर्शविली आहे. त्यामुळे हे रस्ते महापालिकेच्या ताब्यात आल्यास या महामार्गाच्या 500 मीटर परिसरात असलेल्या दारू विक्रेत्यांची दीड महिन्यापासूनचे शटर पुन्हा उघण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, दारू विक्रेत्यांची बार लॉबी आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या दबावाने झिंग चढल्याने महापालिकेने हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

महापालिकेत ‘आगाऊ’पणा नकोच!

आयुक्‍त हर्डीकर : कार्यालयीन वेळेनंतर पालिकेत “प्रवेश बंद’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील विविध दालनांत कार्यालयीन वेळेनंतरही काही “कर्तव्यतत्पर’ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसह ठेकदार प्रतिनिधींचे कामकाज सुरु असते. त्यामुळे कार्यालयीन वेळेव्यतिरिक्‍त “आगाऊ’ काम करुन प्रशासनावर “उपकाराचे ओझे’ नकोच, अशी भूमिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी घेतली आहे. त्यामुळे सायंकाळी उशीरापर्यंत चालणारा “आगाऊ’पणा आता बंद होणार आहे.

"स्वीकृत'ची निवड लांबण्याची शक्‍यता

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नियोजित स्वीकृत सदस्यांच्या नावांत फेरबदल करता येणे शक्‍य असल्याने येत्या 19 तारखेला होणारी स्वीकृत सदस्यांची निवड लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. नियोजित नावांत बदल करता येणे शक्‍य असल्याचे रविवारी पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नियोजित बाबू नायर व माऊली थोरात यांची नावे बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

भाजपच्या “त्या’ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेत स्वीकृत नगरसेवक नियुक्तीच्या पार्श्‍वभूमीवर खासदार अमर साबळे आणि लेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन यांचे पुतळे जाळल्या प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. 13) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथील पक्ष कार्यालयासमोर हा प्रकार घडला.

पिंपरी चिंचवडमध्ये १३ गाड्यांची तोडफोड

पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलखमध्ये अज्ञात व्यक्तींनी १३ गाड्यांची तोडफोड केल्याची घटना रविवारी रात्री घडली. पोलीस अशा समाजकंटकांवर लगाम कधी लावणार असा सवाल आता परिसरातील ...

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपतील 'संघर्ष' पेटला; खासदार साबळेंचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीवेळी झालेला गोंधळ ताजा असतानाच आता पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप कार्यकर्त्यांनी तीच री ओढली आहे. स्वीकृत नगरसेवकपदी डावलल्याने नाराज इच्छुकांनी खासदार अमर साबळे आणि ...

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपात राडा, खासदार, मंत्र्यांच्या पुतळ्यांचे दहन

पिंपरी, दि. 13 - पिंपरी-चिंचवड महापालिका स्विकृत सदस्य निवडीवरून भारतीय जनता पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी पिंपरीतील मोरवाडीतील भाजपा कार्यालयात राडा केला. पक्षविरोधी काम करणाºयांना स्विकृतची बक्षीसी दिल्याबद्दल खासदार ...