Saturday, 17 February 2018

हिंजवडीत टपरीधारकांवर कारवाईचा फार्स?

एमआयडीसीकडून छोट्या व्यवसायिकांवरच बडगा : मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयश
हिंजवडी – हिंजवडी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी पथारी धारकांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. एमआयडीसी परिसर पथारी व टपरीमुक्त करताना संबंधित टपरी व सामानाची जेसीबीद्वारे मोडतोड करून कठोर कारवाई करण्यात आली.

Nashik Phata Chowk a step closer to going signal-free

Pimpri Chinchwad: The Nashik Phata Chowk on busy Pune-Mumbai highway may soon become signal-free as the work on the fifth ramp of the flyover here has finally resumed.

निगडीपर्यंतचे काम पुर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

चौफेर न्यूज – पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. मेट्रोचे पिंपरीपर्यंत वेगात काम सुरु आहे. त्याच वेगात निगडीपर्यंतच्या मेट्रोचे काम पुर्ण केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. याबाबतची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

क्रिकेट स्टेडियममुळे गहुंजे गावचे ‘अर्थकारण’ बदलले

गावाचे स्वतंत्र अस्तित्व राहावे ही ग्रामस्थांची इच्छा

उद्योगनगरीत होणार पाचपट पाणी महाग

पिंपरी - देशातील प्रमुख शहरांत सर्वांत कमी पाणीपट्टी आकारणाऱ्या पिंपरी- चिंचवड महापालिकेने सोमवारी (ता. 20) सर्वसाधारण सभेत दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर देशात सर्वाधिक पाणीपट्टी आकारणारी ठरणार आहे. स्थायी समितीचा प्रस्ताव आहे तसा मान्य झाल्यास सध्याच्या पाणीपट्टीच्या तुलनेत चौपट ते पाचपट वाढ होईल. 

टवाळखोरांचा उच्छाद वाढला

पिंपरी – शाळा-कॉलेजातील विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे, बडीकॉप, पोलीस काका, विद्यार्थिनी तक्रारपेटी अशा अनेक उपाययोजना करुनही शहरातील टवाळखोरांना अटकाव करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यामुळे कठोर कारवाईच आता या त्रासातून मुक्तता करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाईपलाइनच्या दुरुस्तीदरम्यान लाखो लिटर पाणी वाया

पिंपरी – पिण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीकरिता व्हॉल्व उघडल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. यामुळे पादचाऱ्यांना याठिकाणाहून चालणेदेखील मुश्‍किल झाले होते.

Open gutter in Nigdi Pradhikaran fixed

Mirror had reported the uncovered manhole above a water hose just days ago, which was creating risks along a busy route
The residential zone of Nigdi Pradhikaran under Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has had a problematic open gutter over a water hose in their area plugged, providing relief for thousands of commuters and pedestrians. The issue had been reported by Pune Mirror on February 12, 2018, highlighting the hazard located near the fire brigade office at Kashgar Chowk, which was endangering several lives on a daily basis. According to area residents, PCMC was turning a blind eye to the uncovered manhole, and they wished for it to be shut immediately before a tragedy took place.

पिंपरी आयुक्तांचे कंट्रोल बजेट

नवीन योजनांचा मोह मुद्दामहून टाळून शहरात चालू असलेले प्रकल्प शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देणारे यंदाचे 'कंट्रोल बजेट' असल्याचा दावा महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी केला. प्रथेप्रमाणे टोकन तरतुदी मात्र कटाक्षाने टाळल्या असून, त्यामुळे पालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१८-१९ चे तीन हजार ५०७ कोटी रुपये खर्चाचे, केंद्र सरकारच्या योजनांसह पाच हजार २३५ कोटी रुपयांचे बजेट आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला गुरुवारी सादर केले 

Eye on polls, BJP-ruled PCMC names schemes after prominent personalities

Pimpri Chinchwad: The BJP-ruled PCMC has named about 20 existing as well as new welfare projects after prominent leaders of various communities and prominent RSS figures “to appease voters ahead of the 2019 Lok Sabha elections”.

At Pune railway station: Rs 5 for train fare, but Rs 20 for platform ticket


खासदारकीसाठी शिवसेना पक्षप्रमुखांचा बारणे व आढळरावांना ‘हिरवा कंदील’ – अनंत गीते

पिंपरी (Pclive7.com):- राज्यातील निवडणूका कधी होतील हे सांगता येणार नाही. मात्र खासदरकीसाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी खासदार श्रीरंग बारणे व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हिरवा कंदील दिला आहे, असे शिवसेना नेते, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सांगितले. तसेच त्यांनी खासदार बारणे यांना देशातील कोट्यवधी शिवसैनिक आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून वाढदिवसाच्या व पुढील खासदरकीसाठी शुभेच्छा दिल्या. 

भाजप सरकारचा पिंपरीत राष्ट्रवादीकडून निषेध; ‘गाजर डे’ केला साजरा

केंद्र आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपने आश्वासनांची खैरात केली होती. आता त्यांना त्यांचा विसर पडलायं. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांनी जनतेला केवळ आश्वासनांची ‘गाजरं’ दिली होती. त्याचाच निषेध म्हणून पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज ‘गाजर डे’ साजरा केला असल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले.

श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तींना ‘जिवन गौरव पुरस्कार’

पिंपरी (Pclive7.com):- मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधुन पनवेल, उरण, खालापुर कर्जत भागातील सामाजिक श्रेत्रातील क्रिडा, वारकरी संप्रदाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा जिवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पनवेल येथे आद्यक्रांतीकार वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मनोहरशेठ भोईर, किशोरी पेडणेकर, बबन पाटील, रेखा ठाकरे आदी उपस्थित होते.

आ. लक्ष्मण जगतापांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे भूमिपुजन

चिंचवड विधानसभेचे आमदार तथा पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आ.लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त जुनी सांगवी प्रभाग क्र. 32 मधे विविध विकासकामांचे भुमिपुजन करण्यात आले. येथील माहेश्वरी चौक ते साई चौक जाँगिंग ट्रँक, मुळानगर रोडचे काँक्रीटीकरण, अभिनवनगर रोड काँक्रीटीकरण या सोबत जुन्या सेवा वाहिन्या, पावसाळी गटारांची पाईपलाईन, नविन पदपथ करण्यात येणार असून सुमारे एक हजार मीटर अंतराच्या या विकास कामांचे विद्यमान नगरसेवकांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले.