Friday, 20 September 2013

वल्लभनगर बस स्थानकावर सोळा सीसीटीव्ही कॅमेरे

कौशल ग्रुपचे अध्यक्ष अनिल भांगडीया यांच्या पुढाकाराने, लायन्स क्लब ऑफ़ पुणे आकुर्डी आणि लायन्स क्लब ऑफ़ पिंपरी-प्लॅटिनियम यांच्या सहकार्याने वल्लभनगर एसटी आगारामध्ये सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या उपक्रमाचे उदघाटन पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या हस्ते करण्यात आले.

पिंपरी महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी विनोद नढे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा खांदेपालट करीत काँग्रेसकडून भोईरगटाच्या विनोद नढे यांची वर्णी लागली आहे. महापौर मोहिनी लांडे यांनी याबाबतची औपचारिक घोषणा केली. मावळते विरोधी पक्षनेते कैलास कदम यांच्या गैरहजेरीतच नढे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. आपले राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर व्यक्तीगत चांगले संबंध असले तरी राष्ट्रवादी हाच आपला महापालिकेतील

पीएमपीची 'पुष्पक' शववाहिनी आता पिंपरीतही

पुणे शहरापाठोपाठ पीएमपीएमएलची 'पुष्पक' शववाहिनी पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेतही दाखल झाली आहे. स्वस्तात मिळणा-या सेवेमुळे खासगी रुग्णवाहिका मालकांकडून होणारी पिळवणूक आता थांबणार आहे. पुणे शहरामध्ये ब-याच वर्षांपासून पीएमपीएमएलच्या वतीने ही सुविधा पुरविण्यात येत आहे. याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडकरांसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

Elected members want PMPML to be disbanded

A group of elected members have demanded that the Pune Parivahan Mahanagar Mahamandal Limited (PMPML) should be dissolved and separated into two different transport utilities.

कासारवाडी रेल्वे पुलाखाली ड्रेनेजचे पाणी

ड्रेनेजलाईन चोकअप झाल्याने कासारवाडीतील रेल्वे पुलाखाली ड्रेनेजचे पाणी शिरले आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून दुचाकी पाण्यात पडून अपघात होत आहेत.
थोड्याच पावसात शंकरवाडी येथील रेल्वे पूलाखालील रस्त्यावर पाणी

दोन युवतींचा विनयभंग करणारे दोघे ...

शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन युवतींचा विनयभंग झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. रहाटणीतील नखाते वस्तीमध्ये मंगळवारी (दि. 17) आणि निगडी प्राधिकरणात सोमवारी (दि. 16) ही घटना घडली. या प्रकरणी सांगवी आणि निगडी पोलीस ठाण्यात युवतींच्या तक्रारवरून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

काळ आला होता, पण.....!

वेळ संध्याकाळी साडेसातची....लोणावळ्याहून पुण्याकडे जाणारी लोकल कासारवाडी स्थानकावरून सुटली....रेल्वे फाटकावरील नियंत्रकाने फाटक खाली घेतले......परंतु, रेल्वे मार्गावर अजून काही वाहने अडकलेली.....सुदैवाने स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे लोकलला पुढे जाण्यास सिग्नल मिळाला नाही आणि ती फाटकापासून काही अंतरावर येऊन थांबली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेवरून कासारवाडी रेल्वे

मारुतीकारवर सुमो आदळून कारमधील दोन ...

'फास्टट्रॅक'मध्ये गाडी थांबविल्याचा परिणाम
पिंपरी-चिंचवडमधून जाणारा पुणे-मुंबई महामार्गाचा मुख्य रस्ता हा 'फास्टट्रॅक' म्हणजे विना अडथळा वाहन चालविण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. मात्र, वाहनचालक सर्रासपणे या मार्गावर वाहन उभे करून अपघाताला आमंत्रण देण्याचे काम करतात. आज

पिंपरीत महापौर, आयुक्तांच्या मोटारीचे दिवे काढले - शासन आदेशानुसार कार्यवाही

पिं-चिं. महापौर मोहिनी लांडे यांच्या मोटारीवरील लाल दिवा, तसेच पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या मोटारीवरील अंबर दिवा काढून टाकण्याचे आदेश पालिका प्रशासनास प्राप्त झाले आहेत.

आळंदीकरांकडून ‘स्थायी’चा निषेध

पिंपरी : संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे संजीवन समाधिस्थळ असलेले आळंदी हे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे श्रद्धास्थान आहे. वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक पंढरी असलेल्या या आळंदीला देवाची आळंदी संबोधले जाते. त्या आळंदीबद्दल चोरांची आळंदी असे अनुद्गार महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी काढले. त्यामुळे आळंदी नगर परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी महापालिकेत येऊन स्थायी समिती पदाधिकारी, सदस्यांचा निषेध नोंदवला. माफी मागावी, अशी मागणीही केली. 

नागरिकांकडून नऊ हजार मूर्तींचे दान

पिंपरी -&nbsp गणेश विसर्जनाच्या दिवशी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले.

खंडित वीजपुरवठ्यामुळे संगणक यंत्रणा कोलमडली

पिंपरी -&nbsp बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेची संगणकीय यंत्रणा कोलमडली.