Saturday, 31 March 2018

मोशी कचरा डेपोला मोठी आग; बारा तासानंतरही आग आटोक्यात नाही पिंपरी :

पिंपरी :  मोशी येथील कचरा डेपोला गुरुवारी (ता.२९) रात्री लागलेली आग बारा तासानंतरही आटोक्यात आलेली नाही.
 मोशी येथील कचरा डेपोला आग लागल्याची वर्दी गुरुवारी (ता.२९) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार सुरुवातीला भोसरी येथील अग्निशामक उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे स्वरूप पाहता आणखी चार बंब घटनास्थळी दाखल झाले. 

More delay as work on Nigdi-Kiwale BRTS road runs into space obstacles

Pimpri Chinchwad: A delay in land acquisition may have a domino effect on the under-construction Bhakti-Shakti Chowk-Kiwale Bus Rapid Transit System (BRTS) road.The key road is being developed by Pimpri Chinchwad Municipal Corporation to improve the city’s north-south connectivity.

Bus halt on highway leads to traffic jams, poses risk to passengers

PIMPRI CHINCHWAD: State transport buses frequently halt at Nigdi, Akurdi, Chinchwad and Pimpri on the central lanes of 12.5 km stretch of Mumbai-Pune highway, between Nigdi and Dapodi, leading to traffic jams and posing a risk for passengers who have to cross from central lanes to service roads.

३३ वर्षांत वाहतुकीचे २३ आराखडे पिंपरी

पार्किंग धोरणामुळे शहरातील वाहतुकीच्या प्रश्नांबाबत आणि वाहतूक सुधारणेबाबत चर्चा सुरू असली तरी वाहतूक सुधारणेसाठी गेल्या ३३ वर्षांत तब्बल २३ आराखडे करण्यात आले आहेत. मात्र या आराखडय़ांची प्रभावी अंमलबजावणी होण्याऐवजी ते कागदावरच राहिल्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न तसाच असून आराखडय़ांच्या निमित्ताने सल्लागारांवर केलेला कोटय़वधी रुपयांचा खर्चही त्यामुळे वाया गेला आहे. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी नवनवीन आराखडे करण्याऐवजी आहेत त्या आराखडय़ांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

दोन ट्यूबमधून धावणार भूमिगत मेट्रो

पुणे - मेट्रोच्या शिवाजीनगर - स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत मार्गाची नेमकी अलाइनमेंट निश्‍चित झाली आहे. या मार्गावर पाच स्थानके असतील. मेट्रो मार्गात दोन वर्तुळाकार ट्यूब असून त्यातून मेट्रोची वाहतूक होणार आहे. या मार्गाच्या निविदा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोचली आहे. त्यामुळे भूमिगत मेट्रोसाठी येत्या दोन महिन्यांत कामाला सुरवात होणार आहे. 

प्लॅस्टिक बंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांची हतबलता; ३० टक्के व्यवसाय ‘पार्सल’वर

पुणे - आज घरी स्वयंपाक करायचा कंटाळा आलाय.. हॉटेलमधून पार्सल घेऊन जाऊया का, असे जर तुमच्या बायकोने विचारले, तर सर्वप्रथम तुमच्याकडे स्टीलचे डबे आहेत का हे तपासा. होय, कारण प्लॅस्टिक बंदीमुळे आता तुम्हाला हॉटेलमध्ये प्लॅस्टिकची पिशवी किंवा डब्यात काहीही दिले जाणार नाही. शहरात चालणाऱ्या हॉटेल्समध्ये तब्बल ३० टक्के व्यवसाय हा ‘पार्सल’वर अवलंबून आहे. होम डिलिव्हरीची सुविधा सर्वांना सोयीची वाटते, पण त्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि डब्यांचा वापर अधिक असल्यामुळे आता त्यावरही मर्यादा येण्याची शक्‍यता आहे. 

प्राधिकरण हद्दीतील 40 हजार बांधकामे अनधिकृत

सध्या पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकाम प्रश्‍न ऐरणीवर आहे. 1 लाख,20 हजार पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात उभी आहेत. त्यामध्ये 40 हजारपेक्षा जास्त बांधकामे नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील आहे. त्यास पहिल्यापासून प्राधिकरण प्रशासनाची मुकसंमती आहे. घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी माहिती अधिकार 2005 अन्वये सदर महत्वाची बाब उघड केलेली आहे.

नव्याने ‘शेअर रिक्षा’ राबवण्याच्या हालचाली

प्रशासनाने याबाबतही लक्ष घालून कारवाईमध्ये सातत्य ठेवावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात नाही

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये ४८ टक्के पाणीसाठा आहे.

PCNTDA in merger dilemma as state, corporators differ on plan

PIMPRI CHINCHWAD: Local leaders have demanded that the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) be merged with Pimpri Chinchwad Municipal Corporation instead of the Pune Metropolitan Regional Development Authority, as planned by the state government.

Mosquito menace casts shadow on Old Sangvi


संत तुकारामांच्या गाथेची हिंदी आवृत्ती राष्ट्रपतींना भेट

पिंपरी - खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बुधवारी (ता. २८) भेट घेऊन त्यांना संत तुकाराम महाराजांच्या गाथेची हिंदी आवृत्ती भेट म्हणून दिली. बारणे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही गाथा भेट दिली होती.

संत तुकारामांच्या गाथेची हिंदी आवृत्ती राष्ट्रपतींना भेट

पिंपरी - खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची बुधवारी (ता. २८) भेट घेऊन त्यांना संत तुकाराम महाराजांच्या गाथेची हिंदी आवृत्ती भेट म्हणून दिली. बारणे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही गाथा भेट दिली होती.

कुंकूमार्चन, लक्ष्मी होमला पिंपरीत प्रतिसाद

चौफेर न्यूज – आर्ट ऑफ लिव्हिंग, वेदिका धर्म संस्थानतर्फे चैत्र नवरात्री अष्टमीनिमित्त पिंपरीत कुंकूमार्चन व लक्ष्मी होमचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 1800 नागरिक उपस्थित होते.

पुणे - जुनी सांगवी शिवसृष्टी उद्यानाबाहेर कचऱ्याचे ढीग

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीतील महापालिकेच्या शिवसृष्टी उद्यानाच्या सिमा भिंतीलगतचा कचरा दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे या परिसराला बकालपणा आला आहे. मुळा नदीपात्रातील जलपर्णी व अस्वच्छतेमुळे सांगवीत डासांचे प्रमाण वाढले आहे.