Thursday, 7 June 2018

पिंपरी मेट्रोमुळे नागरिकांचा मनस्ताप टळेल

मेट्रो सुरू झाल्यावर सध्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा नागरिकांना होणारा मनस्ताप कमी होईल, असे मत पुणे मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये, मेट्रो कमिटी सदस्य रमेश राव यांनी व्यक्त केले. पुणे मेट्रोबाबत माहिती देण्यासाठी चिंचवड येथील विलो मॅथर प्लॉट कंपनीत पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) आणि कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मेट्रोसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

[Video] महाश्रमदान @ दत्तगड, दिघी... तुफान आलंया

A small video of MahaShramdan held on 1st may 2018 @ Dattgad, Dighi. People from all the sectors have attended this event, even all the school kids enjoying working for Mother Earth. It's a small step towords for our future generation.

[Video] पिंपरी-चिंचवडचा 'बॅटमॅन'

निपाहची भिती न बाळगता वटवाघुळांच्या रक्षणासाठी धडपडतोय पिंपरी-चिंचवडचा 'बॅटमॅन' डाॅ. महेश गायकवाड

[Video] पिंपरी चिंचवड दर्शनसाठी 10 एसी बस खरेदी होणार!

पिंपरी चिंचवड शहरवासीयसाठी पिंपरी महानगरपालिका 10 एसी बस खरेदी करणार असल्याची माहिती सभापती मा ममता गायकवाड यांनी दिली.

एमआयडीसीतील माफियाराज मोडण्याची गरज

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील १८०० लहान-मोठ्या कंपन्या एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या परिसरात येतात. एक मे २०१२ मध्ये भोसरी पोलिस ठाण्याचे विभाजन करून एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रस्तावित औद्योगिक प्रदर्शन केंद्र, नव्या विकसित होत असलेल्या मोशी स्पाईनरोड तसेच मोशीगावठाण आणि पाच झोपडपट्ट्या, मध्यमवर्गीयांची घरे असलेल्या शाहूनगरचा काही परिसर आणि पिंपरी एमआयडीसीतील एच ब्लॉक, मोशी टोलनाका, मोशी आळंदी रस्ता, नाशिकरोडचा काही भाग, देशातील 'नारी' ही एकमेव संशोधन संस्था आदींचा समावेश असलेले एमआयडीसी पोलिस ठाणे १२ ऑगस्ट २०१७ पासून स्वतःच्या नव्या प्रशस्त इमारतीत स्पाईनरोडवर सुरू झाले आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेची ओला व सुका कचरा वर्गीकरण मोहिम

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, मोठया प्रमाणात कचरा निर्माण होणा-या  ठिकाणी जागेवरच ओल्या कच-यापासुन खतनिर्मिती करणे व प्लास्टीक बंदी, जलपर्णी काढणे, प्रभातफेरी आदी कार्यक्रम घेण्यात आले.

प्लॅस्टिक बंदी केल्यास राज्य सरकारकडून लाखोंचे बक्षीस

मुंबई : राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर आता स्थानिक स्तरावर याची अंमलबजावणी व्हावी यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींनी शंभर टक्के प्लॅस्टिक बंदी केल्यास लाखोंचं बक्षीस देण्यात येणार आहे.

पिंपरी – स्थायी समितीची साडेसहा कोटींच्या विकासकामांना मंजुरी

शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे ६ कोटी ६८ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

‘कचरा उचलण्यासाठी गाड्या वाढवा’

पिंपरी - प्राधिकरण, तसेच शहराच्या अन्य भागांत कचरा मोठ्या प्रमाणात साठू लागला असून, पावसाळ्यात ही समस्या तीव्र होईल. त्यामुळे प्रशासनाने कचरा उचलण्यासाठी गाड्या वाढवून रोजच्या रोज कचरा हलविण्याची तयारी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी केली.

रेल्वे रूळ ओलांडण्यावर प्रवाशांचा भर; प्रशासनाचा काणाडोळा

पिंपरी : शहरातील सर्व रेल्वे स्थानकांवर पादचारी मार्ग असताना देखील सर्रास धोकादायकरीत्या रेल्वे रूळ ओलांडण्याकडे प्रवाशांचा कल असल्याचे चित्र बुधवारी पाहण्यास मिळाले. रेल्वे स्थानकांशिवाय अन्य ठिकाणी असलेल्या रेल्वे पादचारी पुलाचा देखील वापर अल्प प्रमाणात होत आहे. रेल्वे फाटक बंद असताना देखील नागरिक रेल्वे रूळ ओलांडत होते. त्याकडे रेल्वे प्रशासन काणाडोळा करीत आहे. 

पिंपरी रोजगार कार्यालयाला मिळेना पूर्णवेळ अधिकारी

पिंपरीतील रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयातील मार्गदर्शन अधिकारी हे पद दोन वर्षांपासून रिक्‍त आहे. सध्या विजय कानिटकर यांच्याकडे अतिरिक्‍त कार्यभार आहे; मात्र ते पुण्यातील रास्ता पेठ येथील कार्यालयात असतात. त्यामुळे पिंपरीतील कार्यालयात येणार्‍या विद्यार्थ्यांना लिपिकांद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचा कारभार कारभार्‍याविनाच सुरु असून शासनाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

सार्वजनिक वाहतूक सेवेतील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे मेट्रो दक्ष

शशिकांत लिमये, रमेश राव यांचे मत; विलो मॅथर प्लॉट कंपनीत मेट्रोसंवाद उत्साहात
निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे मेट्रोचा पहिला टप्पा सुरु झाला असून पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी असा मेट्रोमार्ग असणार आहे. या दोन्ही मार्गांचे काम सुरू असताना तसेच काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोतून प्रवास करताना नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही, याबाबत महामेट्रो सातत्याने सजग आहे. काम सुरू असताना त्याबाबत नागरिकांना अडथळा येणार नाही आणि पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रवास सुरक्षित होईल. तसेच सध्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा नागरिकांना जो मनस्ताप सहन करावा लागत आहे, तो मेट्रोच्या येण्याने होणार नाही, असे मत पुणे मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये, मेट्रो कमिटी सदस्य रमेश राव यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाहतूक सेवेतील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे मेट्रो दक्ष

मेट्रोचे डबे महामेट्रोच करणार

पुणे - पुणे मेट्रो रेल्वेसाठी डबे तयार करण्याचे काम आता महामेट्रोच करणार आहे. डबे तयार करणाऱ्या चीनमधील कंत्राटदार कंपनीने नागपुरातील कारखाना बंद केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. 

RTO admits checks of 100% vehicles carrying school children not possible

PUNE: The Regional Transport Office (RTO) has admitted that there’s no provision in the Motor Vehicle Act that allows it to take legal action against school transporters failing to bring vehicles for the annual fitness tests.

World food Safety Day: FSSAI to start rating eateries on quality, hygiene

As part of a pilot project covering Pune, Mumbai and Nagpur, the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) is set to launch a hygiene plus rating system for quick service restaurants, food chains and joints. The restaurants will essentially be assessed on parametres such as disposal of excess food, hygiene practices, water management and work towards promoting healthy eating habits.

pune eateries, world food safety day, indian express, pune restaurants, pune eateries, FSSAI rating

‘वायसीएम’च्या चार डॉक्टरांचे राजीनामे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील चार डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. विनाकारण फैलावर घेतल्याचा आरोप करीत या डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. अद्याप हे राजीनामे मंजूर करण्यात आले नसल्याचे रुग्णालयीन प्रशासनाकडून करण्यात आले. 

अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया आजपासून

पुणे -अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया सात जूनपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना 19 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज भरावयाचा आहे. या कालावधीत ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढून आवश्‍यक कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह सुुविधा केंद्रावर (फॅसिलिटी सेंटर) जायचे आहे. तेथे कागदपत्रांची पडताळणी होईल, ती अपलोड केली जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांचा अर्ज निश्‍चित केला जाईल. अर्जनिश्‍चितीनंतर त्याची पोच विद्यार्थ्यांनी न विसरता घ्यायची आहे. 

उत्पन्नाची अट शिथिल केल्याने आरटीई प्रवेशास पुन्हा संधी

पिंपरी - राज्य सरकारने आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करीत उत्पन्नाची अट शिथिल केल्यामुळे यापूर्वी अर्ज न भरलेल्या पालकांना नव्याने अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. मात्र पहिल्या फेरीनंतर जे पालक दुसऱ्या फेरीच्या प्रतीक्षेत आहेत, ते आता अडचणीत सापडले आहेत. शाळा दहा दिवसांत सुरू होणार असताना पहिलीत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांसाठी पालकांची आता धावपळ सुरू झाली आहे.

विद्यार्थ्यांना दाखले वेळेत देण्याची मागणी

जुनी सांगवी - सध्या दहावी व बारावी परिक्षेच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणा-या विविध दाखले प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू आहे.स्थानिक पातळीवरील तलाठी कार्यालय, महाई सेवा केंद्र, ईत्यादी ठिकाणी विविध दाखल्यांसाठी गर्दी होत आहे. तलाठी कार्यालयातुन लागणारे दाखले विद्यार्थी पालकांना वेळेत द्यावेत याबाबत भाजपा विद्यार्थी आघाडीचे ललित म्हसेकर यांनी जुनी सांगवी येथील तलाठी कार्यालयास निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की सध्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखल्यांची गरज असते.स्थानिक कार्यालयामधुन विद्यार्थ्यांना संबंधित प्रमाणपत्रे दाखले वेळेत मिळाल्यास विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रकियेसाठी वेळ मिळेल. अनेकदा दाखले व कागदपत्रांची जुळवा जुळव करताना केवळ स्थानिक कार्यालयांमधुन वेळेत दाखले न मिळाल्याने विद्यार्थी व पालकांची दमछाक होते.सर्वच स्थानिक कार्यालयामधुन विद्यार्थ्यांना लागणारे दाखले वेळेत देण्यात यावे. याबाबत जुनी सांगवी,पिंपळे गुरव,नवी सांगवी भागातील कार्यालयामधुन भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने  निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. 

काळेवाडीत शाळेसह नागरिकांचा केला रस्ता बंद; मच्छिंद्र तापकीर यांचा आत्मदहनाचा इशारा

पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील शिवतेज क्रीडा मंडळ व शिक्षण संस्थेच्या कै.भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदीरसह येथील नागरिकांचा रस्ता बंद करण्यात आला आहे. हा रस्ता बंद करण्यात अाल्याने हजारो विद्यार्थ्यांसह, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणार्यांवर कारवाई करून तातडीने हा रस्ता खुला करण्यात यावा, अन्यथा पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे.

एमआयएमची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी बरखास्त; शहराध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पिंपरी (Pclive7.com):- गेल्या दोन वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असलेल्या एमआयएम पक्षाला सुरूंग लागला आहे. वरिष्ठ नेत्यांचे होत असलेले दुर्लक्ष, कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा यामुळेच नाराज होत शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलीय. शहराध्यक्ष अकील मुजावर यांच्यासह सर्वच पदाधिकार्यांनी थेट पक्षाचेच राजीनामे दिले आहेत.