All areas in Pimpri Chinchwad will face water cuts once a week in the evening to ensure equitable supply.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 21 April 2014
Commuters want FOB, subway to cross Nashik Phata chowk
Pedestrians and commuters using the Nashik Phata chowk on the Pune-Mumbai highway have demanded facilities that will help them cross the busy chowk safely.
क्षेत्रीय अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक
प्रशासकीय प्रभाग रचना रद्द करून अस्तित्वात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या अध्यक्षपदासाठी येत्या शुक्रवारी (दि. 25) निवडणूक घेण्यात येणार आहे. 'मिनी महापौर' म्हणून ओळखल्या जाणा-या क्षेत्रीय अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
सुरक्षा उपाययोजनांअभावी बीआरटीएस मार्गिका धोक्याची
झेब्रा क्रॉसिंग, रिफ्लेक्टर, वाहतुकीचे सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे आदींअभावी बीआरटीएस मार्गिका (लेन) धोकायदायक ठरत आहे. पिंपरीतील एच.ए. कंपनीसमोर एक कार बीआरटीएस 'लेन'ला धडकून नुकताच अपघात झाला. महापालिकेने त्याची वेळीच दखल घेवून सुरक्षा विषयक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.
विशेष स्वच्छता मोहिमेसाठी आयुक्तांचा पाहणी दौरा
स्वच्छ-सुंदर शहर ठेवण्यासाठी महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याकरिता महापालिका आयुक्त आणि संबधित अधिकारी 21 ते 26 एप्रिल या कालावधीत मोकळी जागा, पुलाखालचा परिसर, नदीच्या कडेचा परिसर, रल्वे परिसर आणि नियमितपणे स्वच्छता होत नसलेल्या परिसराची पाहणी केवी जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिली आहे.
आठवड्यातून एक वेळ शहराचा पाणीपुरवठा बंद
पिंपरी : पाणी समस्येबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून त्यावर उपाययोजना म्हणून आठवड्यातून एकदा काही भागातील सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन केले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी समस्या आणखी गंभीर होऊ नये, यासाठी पाणीपुरवठा वेळापत्रकात महापालिकेने बदल केले आहेत. त्यामुळे काही भागात दोनऐवजी एकचवेळ पाणीपुरवठा होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार २१ एप्रिलपासून पाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.
वाहतूक पोलिसाला धमकवणा-या दोघांना अटक
वाहतूक पोलीस कर्मचा-याला शिविगाळ करून त्याची नोकरी घालविण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. वाकड पोलीस चौकीसमोर शनिवारी (दि. 19) दुपारी हा प्रकार घडला.
भोसरी उत्सवाला रंगतदार कुस्त्यांची जोड
भोसरीत सुरू असलेल्या श्री भैरवनाथ उत्सवाला आज (रविवारी) तळ्याकाठी झालेल्या कुस्त्यांनी रंगत आणली. राज्यातील विविध आलेल्या मल्लांच्या रंगतदार लढतींचा भोसरीकरांनी आनंद घेतला. भोसरीत झालेल्या या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आंबा पिकविण्यासाठी ‘कार्बाईड’ वापरल्यास कारवाई
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड येथून पुण्यात येणारा कच्चा आंबा कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईडचा वापर केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाने (एफडीए) दिला आहे.
नंबरप्लेटवर अक्षरांचा खेळ
रहाटणी : वाहनांवरील आरटीओ नोंदणीच्या ‘नंबरप्लेट’वरील आकडे अक्षरांसारखे रेखाटण्याची क्रेझ वाढत आहे. आकड्यांमधून कुणी नावाची जुळणी करतोय, तर कुणी आडनावाचा रूबाब दाखवतोय. आकडे ‘फॅन्सी’ पद्धतीने रेखाटत काहींनी ‘लव्ह’ साकारलंय, तर देवतांची नावं टाकून काही श्रद्धेचे प्रदर्शन घडविण्याचा प्रयत्नकरीत आहेत. त्यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटवर आकड्याऐवजी अक्षरांचा खेळ दिसून येत आहे. हे नियमबाह्य असूनही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
‘डेटा एंट्री’चे काम करणाऱ्या एजन्सीला काळ्या यादीत टाका
सदोष मतदारयादीबाबत संबंधित अधिकारी आणि डेटा एंट्री करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
भोसरीच्या काळभैरवनाथाची यात्रा उत्साहात सुरु
पिंपरी-चिंचवड शहराची ओळख ही मेट्रोसिटी म्हणून होत आहे. परंतु मेट्रोसिटी होत असली तरी येथील परंपरा टिकून आहे. भोसरीतील काळभैरवनाथाची जत्रा देखील याला अपवाद नाही. यंदा ही जत्रा 17 व 18 एप्रिल रोजी होती. परंतु 17 तारखेला लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने ग्रामस्थांनी ही जत्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आज (शनिवारी) सकाळी या जत्रेस सुरूवात झाली.
चापेकर बंधु स्मृतिदिनानिमित्त अभिवादन फेरी
क्रांतिवीर चापेकर बंधुंच्या 115 व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी (दि. 18) चिंचवड येथे अभिवादन फेरी काढण्यात आली. या अभिवादन फेरीमध्ये विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
चापेकर बंधूंच्या अभिवादन फेरीची सुरूवात क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिरापासून करण्यात आली तर फेरीचा समारोप क्रांतीवीर चापेकर वाडा येथे झाला. अभिवादन फेरीमध्ये क्रांतिवीर चापेकर बंधुंची वेशभूषा केलेली मुले उभी करण्यात आली होती. प्रामुख्याने क्रांतिवीर बाळकृष्ण चोपेकर बालक मंदीर, क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर, क्रांतिवीर चापेकर विद्यालय, खिंवसरा पाटील विद्या मंदिर, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, पुनरूत्थान समरसता गुरूकुलम्, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय, राजर्षी शाहू महाराज अभ्यासिका आदी शाळांनी सहभाग घेतला होता
Subscribe to:
Posts (Atom)