Wednesday, 4 June 2014

महापालिकेत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा

केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याअपघाती निधनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतही तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून आलेल्या आदेशानंतर महापालिका भवनावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर घेण्यात आला.

आचारसंहितेतही विकास कामांना जिल्हाधिका-यांचा हिरवा कंदील

पदवीधर व शिक्षकांशी संबधित कामे वगळली
एकापाठोपाठ लागणा-या निवडणुक आचारसंहितांमुळे ठप्प झालेली महापालिकेची विकास कामे आता पुर्ण करता येणार आहेत. आचारसंहितेत कामांच्या निविदा काढण्यासाठी महापालिकेने जिल्हाधिका-यांकडे परवानगी मागितली होती. त्यासाठी जिल्हाधिका-यांनी महापालिकेला हिरवा कंदील दाखवला आहे. पदवीधर व शिक्षकांशी संबधित कामे वगळता इतर कामांच्या निविदा काढण्यास परवानगी दिली आहे.

महापालिका कर्मचा-यांचे काळ्या फिती लावून 'एलबीटी बचाव'

एलबीटी रद्द करण्याच्या संभाव्य निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांनी आज (मंगळवारी) दिवसभर काळ्याफिती लावून कामकाज केले. महापालिका कर्मचारी 8 जूनपर्यत काळ्या फीती लावून काम करणार आहेत. त्यानंतरही शासनाने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास 8 जूनपासून कर्माचा-यांनी बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला.

नगरसेवक प्रशांत शितोळेसह तेरा जणांना अटक

पोलीस ठाण्यासमोरच राष्ट्रवादी पदाधीका-यांचा राडा
पूर्व वैमनस्यातून सांगवीतील नगरसेवक प्रशांत शितोळे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष हर्षल ढोरे या दोन गटामध्ये सोमवारी (दि.2) पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी झाली. सांगवी पोलिसांना धकाबुक्की केल्याप्रकरणी शितोळे, ढोरे यांच्यासह तेरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या सर्वांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

विनोद चांदवाणी यांना पिंपरी -चिंचवड समाजभुषण पुरस्कार

कै. महापौर भिकु वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्यावतीने दिवंगत महापौर भिकु वाघिरे (पाटील) यांच्या 26 व्या स्मृतीदिनानिमित्त चिंचवड येथे शुक्रवारी (दि. 06) उद्योजक विनोद चांदवाणी यांना पिंपरी -चिंचवड समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

माजी सैनिकांनो, उद्योजक बना


'माजी सैनिकांनी आपल्याला केवळ गार्डच व्हायचे आहे, ही मानसिकता सोडून उद्योजक म्हणून पुढे आले पाहिजे. त्यासाठी पुण्यात भोसरी येथे माजी सैनिकांसाठीच्या औद्योगिक वसाहतीचे काम सुरू करण्यात आले आहे. तेथे प्रशिक्षणापासून ...