Friday, 2 May 2014

ऊर्जा बचतीसाठी पिंपरी महापालिकेचा 'इक्ले'शी करार

अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर व ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका व आयसीएलईआय (इक्ले) या संयुक्त राष्ट्राच्या मान्यताप्राप्त संघटना यांच्यात करार झाला आहे. या कराराचा पहिला भाग म्हणून या संस्थेमार्फत महापालिकेच्या कार्यालयांचे 'एनर्जी ऑडीट' करण्यात येत आहे. 

सिटीझन फोरमने उचलली झाडांच्या संगोपनाची जबाबदारी

वृक्षरोपणासाठी अनेकजण पुढाकार घेतात. मात्र, त्यांचे संगोपन करायला कोणीही तयार होत नाही. त्यामुळे वृक्षरोपण निष्फळ ठरत असतानाच पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने (पीसीसीएफ) झाडांच्या संगोपनाचा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज (गुरुवारी) या उपक्रमाला सुरुवात झाली.

पिंपरी-काळेवाडी पुलावर 'पीसीसीएफ'च्या मागणीनुसार महापालिकेने शोभेच्या कुंड्या लावल्या आहेत. त्यात सायकस, पाम ट्री, बोगनवेल आदी झाडांचा समावेश आहे. या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी, त्यांच्या रोजच्या देखभालीची, पाणी घालण्याची जबाबदारी 'पीसीसीएफ'ने उचलली आहे. महापालिकेच्या सहकार्याने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमासाठी तानाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला.

आयुक्तांची विशेष स्वच्छता मोहीम निव्वळ स्टंट - बारणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची विशेष स्वच्छता मोहीम म्हणजे केवळ 'स्टंटबाजी' व प्रसिध्दीसाठी चालविलेली खटपट असल्याची टीका शिवसेना गटनेते श्रीरंग बारणे यांनी केली.
आयुक्तांच्या विशेष स्वच्छता मोहिमेचा बारणे यांनी चांगलाच समाचार घेतला. बारणे म्हणाले की, आयुक्त दर्जाच्या अधिका-याने कामांचे आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करून घेतली पाहिजे. केवळ फोटोसेशन पुरती साफसफाई नको. आज शहराच्या ब-याचशा भागात वेळेवर कचरा उचलला जात नाही. कच-याच्या गाड्या दोन-तीन दिवसांनी कचरा उचलण्यासाठी येतात. घरोघरी जाऊन कचरा उचलण्यासाठी दिरंगाई होत असल्याने नागरिक नेहमीच स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार करीत असतात. त्याचीही दखल संबंधित कर्मचारी घेत नाही.

मोकळ्या भूखंडांवरील कचराकुंडय़ांची ३१ मेपर्यंत स्वच्छता करा - आयुक्त

पिंपरी-चिंचवड शहरातील ज्या मोकळ्या भूखंडांवर कचराकुंडय़ा तयार झाल्या आहेत, त्यांची येत्या ३१ मेपर्यंत स्वच्छता करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी दिले.

20 teachers face EC wrath for negligent attitude at Maval LS seat

Pimpri: Altogether 20 school teachers have faced the wrath of the Election Commission for their alleged negligent attitude during poll duty at Maval Lok Sabha constituency on polling day on April 17.

PCMC pool staff turn away swimmers to avoid overcrowding

Pimpri: The staff of various swimming pools managed by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) turned back a large number of swimmers on Wednesday to prevent overcrowding in the swimming pools.

जलतरण तलावांची शूल्कवाढ रद्द करा

महापालिकेने जलतरण तलावांच्या तिकीट दरात केलेली अवाजवी दरवाढ रद्द करावी, अशी मागणी शिक्षण मंडळ सदस्य श्याम आगरवाल यांनी केली आहे.
यासंदर्भात आगरवाल यांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या जलतरण तलावांसाठी 14 एप्रिलपासून तिकीट दरामध्ये वाढ केली आहे. नवीन दरवाढीनुसार जलतरण तलावाचे तिकीट दर दुप्पट केले आहेत. तर पासच्या किमतींमध्ये तिप्पट ते पाचपट वाढ करण्यात आली आहे. एका बॅचच्या तिकीट दरात दुप्पट वाढ करीत ते 20 रुपये, त्रैमासिक पाससाठी दीड हजार रुपये भरावे लागणार आहेत. 6 महिन्यांसाठी अडीच हजार, तर वार्षिक पाससाठी तब्बल साडेचार हजार रुपये जमा करावे लागतील. अपंग, राष्ट्रीय खेळाडू, ज्येष्ठ नागरिक व पत्रकारांना सवलतीमध्ये वार्षिक पास 3 हजार 200 रुपये इतका केला आहे. पूर्वी तो 500 रुपये इतका अल्प होता.

क्रीडा सुविधांच्या शुल्कवाढीवरून खेळाडू व संघटनांचा संताप

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जलतरण तलावासह विविध खेळांच्या सोयीसुविधांच्या बाबतीत केलेल्या भरमसाठ शुल्कवाढीच्या मुद्दय़ावरून खेळाडू व क्रीडा संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रदिनाचा इतिहास

(सुनील ओजाळे)
1 मे हा दिवस दरवर्षी ‘महाराष्ट्रदिन’ म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 या दिवसापासून बहुसंख्येने मराठी भाषिक रहातात असे, ‘महाराष्ट्र’ हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. ही स्वतंत्रता सहजासहजी मिळाली नाही. त्यासाठी अनेक दशके प्रयत्न चालू होते. त्या अनुषंगाने झालेल्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींविषयी थोडेसे.....

उमेदवाराच्या 'हेल्पलाईन'चा संदर्भ देणाऱ्या २० अधिकाऱ्यांवर कारवाई

मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या 'हेल्पलाइन'चा क्रमांक दिल्याचा ठपका ठेवून निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांनी पिंपळे गुरव केंद्रातील दोन नोडल ऑफिसर व 18 बीएलओंवर दंडात्मक कारवाई केली. सेवा पुस्तकातही लाल शेरा मारण्यात आला आहे. बसपा उमेदवाराच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

‘उद्योगनगरी’ नावापुरती - कंपन्या बंद, कामगार हद्दपार,गृहप्रकल्पांचा सुळसुळाट

शहरातील कामगार हळूहळू हद्दपार होत चालला असल्याने एकेकाळची कष्टकऱ्यांची व उद्योगांची नगरी आता नावापुरतीच राहिली आहे.

एसटीच्या 'ट्रॅक'वर 'आरटीओ'ची चाचणी ...

पुणे व पिंपरी-चिंचवड 'आरटीओ'कडून अवजड वाहनांसाठी एस. टी. महामंडळाच्या भोसरी येथील संगणकीय ट्रॅकवरील चाचणी सक्तीची केली आहे. एसटीच्या चालकांचे कौशल्य तपासण्यासाठीच्या या ट्रॅकवर खासगी चालकांना थेट 'प्रॅक्टीकल' करावे लागत आहे. ट्रक, टेम्पो, ट्रेलरचा परवाना घ्यायचा असला तरीही एसटी बस चालवून दाखवावी लागते. ही बस कधी बंद पडेल याचाही नेम नाही. त्यामुळे ही चाचणी शिकाऊ वाहनचालकांसाठी दिव्य ठरत आहे.