Tuesday, 26 September 2017

निगडी-दापोडी बीआरटीला प्रतीक्षाच

पिंपरी - पिंपरी चिंचवडकरांना निगडी ते दापोडी दरम्यानचा बीआरटी मार्ग सुरू होण्यासाठी आणखी एक महिना वाट पाहावी लागणार आहे. या मार्गावरील अनेक कामे अजूनही अपूर्ण असल्यामुळे ही ‘डेडलाइन’ महिन्याभराने वाढली आहे. 

जादा ट्रॅकचे सर्वेक्षण चार महिन्यांत - श्रीरंग बारणे

पिंपरी/कामशेत - पुणे-लोणावळादरम्यानच्या प्रस्तावित तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकच्या कामाचे सर्वेक्षण येत्या चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून निविदा प्रकिया काढण्यात येईल, अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कामशेत येथे पत्रकारांना दिली; तसेच पुणे ते लोणावळादरम्यान धावणाऱ्या उपनगरीय रेल्वेसाठी (लोकल) स्वतंत्र कॉरिडॉर करण्याचे नियोजन रेल्वे मंत्रालयाने केलेले आहे. येत्या दोन वर्षांत या कामाला प्रत्यक्षात सुरवात होण्याची शक्‍यता आहे.

नव्या गृहबांधणी प्रकल्पांमध्ये भरीव वाढ

पुणे - परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांना पायाभूत सुविधांचा दर्जा मिळाल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना भांडवल उभारणे सोपे झाले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूक बिल्डरांकडून वाढली असल्याचे आढळून आले आहे. परिणामी बांधकाम व्यावसायिकांनी आता अशा सदनिकांचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती –अंत्योद्य दिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिका भवनात फिल्टरमध्ये सापडल्या आळ्या

पिंपरी-चिंचवड पालिका भवनातील तिस-या मजल्यावर पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये आळ्या आढळून आल्या आहेत. नगरसेवकांनीच हा प्रकार निदर्शनास आणून दिल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही दखल घेतली.

प्रत्येक किलोमिटरवर अँटोमॅटीक टॉयलेट बसवावेत – लक्ष्मण जगताप

शहरवासीयांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शहरात स्वच्छता गरजेची आहे. शहरात प्रत्येक किलोमिटरवर अशा प्रकारचे अँटोमॅटीक टॉयलेट बसविण्यात यावेत. त्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडेल, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

‘सिमॅसेस’ अभ्यासक्रमातून मिळणार नवी दिशा

पिंपरी - येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि रिसर्च महाविद्यालयात ‘सिमॅसेस लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ अभ्यासक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. याद्वारे नवी दिशा मिळणार असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

अपहरण झालेल्या ओम खरातची सुखरूप सुटका

पुणे - निगडी येथून दोन दिवसांपूर्वी खंडणीसाठी अपहरण झालेल्या ओम मोहन खरात (वय, ९, रा. पूर्णानगर, चिखली) याची सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास सुखरूप सुटका करण्यात आली. 

पांरपरिक वाद्यांचा तालघोष व ढोल-ताशाच्या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी (प्रतिनिधी):- चिंचवड नवरात्र महोत्सवाअंतर्गत आयोजित केलेल्या ढोल-ताशा आणि पांरपरिक वाद्यांचा तालघोष या तबला समूहवादनाच्या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक कलाकरांनी एकाचवेळी एकत्र अगदी सुरात ढोल-ताशाचे वादन केले. ढोलताशाची पाच पथके सहभागी झाले होती. ढोल-ताशा पथकांनी सादर केलेल्या वादनाने उपस्थितांची मने जिंकली.

स्वप्नातून ‘ध्येय’ ठरते, ध्येयातून ‘दिशा’ सापडते – तुकाराम मुंढे

पिंपरी (प्रतिनिधी):- स्वप्नातून ध्येय ठरतात आणि ध्येयातून दिशा सापडत असते, असे प्रतिपादन पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी येथे केले. आपण निर्धारित केलेले लक्ष्य गाठण्यासाठी चांगल्या सवयी आवश्यक असतात. असे सांगून स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी जीवनातील कोणत्याही परीक्षेत निश्चितपणे यशस्वी होतोच असेही ते म्हणाले.

खेळाचे मैदान झाले गायरान; नगरसेवक विक्रांत लांडे यांचे अनोखे आंदोलन

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्या इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक ८ मधील श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे. या मैदानात मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. वारंवार प्रशासनाला पत्र व्यवहार करून त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात क्रीडा संकुलात म्‍हशी सोडून राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत लांडे यांनी अनोखे आंदोलन करून सत्ताधारी भाजप व प्रशासनाचा निषेध केला.