पिंपरी-चिंचवडमधील रस्ते खोदाईबाबत महापालिकेने निश्चित केलेल्या धोरणाला स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार महापालिकेच्या विद्युत, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि वाहतूक या विभागांचा 'ना हरकत दाखला' सादर केल्यानंतरच संबंधित एजन्सीला खोदाईला परवानगी दिली जाणार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 10 May 2018
पिंपरीतही ‘पे अँड पार्क’चे धोरण
पुण्याच्या धर्तीवर सशुल्क पे अँड पार्क धोरण निश्चित मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याची शिफारस पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने सर्वसाधारण सभेला केली आहे. जागा, वाहनांचे वर्गीकरण करून दरपत्रक तयार करण्यात आले असून, शुल्क वसुलीसाठी ठेकेदारांची नियुक्ती केली जाणार आहे.
पिंपरी शहरात यंदा पाणीकपात नाही
पिंपरी - पवना धरणात ३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, तो जुलैअखेरपर्यंत पुरेल. गेल्या वर्षी मेमध्ये शहरात दिवसाआड पाणीपुरवठा झाला होता. या वर्षी मात्र शहरातील पाणीपुरवठ्याबाबत सध्यातरी तक्रारी मोठ्या प्रमाणात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा पाणीकपात करण्यात येणार नाही.
धोकादायक इमारतीत रहिवास
पिंपरी - मासुळकर कॉलनी येथील शासकीय कर्मचारी वसाहतीच्या इमारतींची पुरती दुरवस्था झाली असून, दूषित पाणीपुरवठा अन् स्लॅब कोसळणे येथील रहिवाशांसाठी नित्याचेच झाले आहे. त्यामुळे रहिवासी भीतीच्या सावटाखालीच राहत आहेत. तर दुसरीकडे कित्येक वर्षांपासून शासकीय इमारतींच्या देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शासकीय कर्मचाऱ्याचे आरोग्य धोक्यात आल्याने जीवन असुरक्षित झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
टॉयलेट चोरी - एक प्रेमकथा की व्यवसाय
पुणे - किरकोळ भाजीपाल्याची, ड्रेनेजच्या झाकणाची इतकंच काय पण दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांचीही चोरी झाल्याचे आपण ऐकले असेल. पण टॉयलेटचीच (शौचालय) चोरी झाल्याचे कधी ऐकले आहे का? पण खरंच असं घडलं आहे.
नाटय़गृहांचा पडदा खालीच!
चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहाचे तब्बल १८ कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्या
नालेसफाईच्या निविदा बंद
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नालेसफाईच्या निविदा यापुढील काळात काढण्यात येणार नाहीत. ही कामे सीएसआर फंड किंवा लोकसहभागातून केली जातील, अशी माहिती स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांनी दिली.
जलपर्णीसाठी आंदोलन
पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये साठलेली जलपर्णी त्वरित काढावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी (नऊ मे) महापालिकेत आंदोलन केले.
बोपखेल पुलाच्या जागेसाठी लष्काराला 26 कोटी देणार
बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर उड्डाणपूल बांधण्यासाठी खडकीच्या 512 आर्मी बेस वर्कशॉप येथील जागेच्या मोबदल्यात 25 कोटी 81 लाख 51 हजार 200 रुपये निधी देण्यास स्थायी समितीने बुधवारी (दि. 9) मान्यता दिली. त्यामुळे पूल उभारणीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. याप्रकरणी पालिका प्रशासन जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप सदस्यांनी पुराव्यासह केला. त्यामुळे प्रशासनाची आडमुठेपणा उघड झाला.
Pune: Delayed by years, BRTS on Nigdi-Dapodi route to be extended to Khadki
HE MUCH-DELAYED Bus Rapid Transit System (BRTS) on the Nigdi-Dapodi route, along the old Mumbai-Pune Highway, will be extended to Khadki. The Khadki Cantonment Board (KCB) recently gave ‘in-principle’ approval to the Pune Municipal Corporation (PMC) to widen the highway for laying BRTS tracks.
बीआरटी मार्ग ठरतोय डोकेदुखी
- काळेवाडी-रहाटणी ः अवैध पार्किंग, कचरा, मद्यपी-जुगाऱ्यांचा अड्डा
वाकड – सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जलद आणि सुरळीत व्हावी यासाठी शहरात ठिकठिकाणी बीआरटी मार्ग तयार करण्यात आले. त्यापैकी दापोडी-निगडी आणि काळेवाडी फाटा-रहाटणी हे मार्ग तयार तर झाले परंतु त्यावर बीआरटी कधी धावलीच नाही. या मार्गाचा उपयोग आता अवैध वाहन पार्किंग, कचरा टाकण्यासाठी होत आहे तर मद्यपी व जुगाऱ्यांसाठी अड्डा बनला आहे. बीआरटी मार्गाचा असा बहुद्देशीय वापर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
जगताप डेअरी चौकाकडून पिंपळे सौदागरकडील रस्ता खुला; नगरसेवक नाना काटे यांच्या प्रयत्नाला यश
औध-रावेत बीआरटी मार्गावर जगताप डेअरी चौकात उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरचे काम सुरू आहे. त्यासाठी बंद ठवलेला पिंपळे सौदागरकडील रस्ता नगरसेवक नाना काटे यांच्या प्रयत्नाने खुला करण्यात आला आहे.
शहर भाजपला आत्मपरीक्षणाची गरज
देशात, राज्यात भाजपवाल्यांना अच्छे दिन आहेत; परंतु पिंपरी-चिंचवडमधील भारतीय जनता पार्टीतील गटातटामुळे पक्षाच्या प्रतिमेबाबत ‘बुरे दिन’ सुरू असल्याची चर्चा पक्षातच आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणार्या पक्षाच्या विरोधातच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपसलेले उपोषणाचे हत्यार आणि सत्ताधारी नगरसेवकाने पक्षापासून सोडचिठ्ठी घेण्याचा घेतलेला निर्णय याबाबत शहर पक्षसंघटनेला आत्मपरीक्षण करण्याची वेळ असल्याचे पक्षांतर्गतच कुजबूज सुरू झाली आहे.
Complaint under Manual Scavenging Act: Activist moves National Commission, says PCMC not providing safety gear to conservancy workers
SAGAR Charan, vice-president of the Safai Karamchari Grievance Redressal Committee, has alleged that conservancy workers of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) are not provided safety gear, forcing them to clear human excreta released into nullahs with bare hands. Charan has filed a complaint related to manual scavenging with the National Commission for Safai Karamcharis.
Probe launched into ‘harassment of PMPML passenger by cops’
Pune Police Commissioner Rashmi Shukla has ordered an inquiry into allegations that a few police officers had misbehaved with a passenger of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) bus.
कुटुंबाला धमकविणारे चालक - वाहक निलंबित
पुणे - मध्यरात्रीच्या प्रवासात कुटुंबाला धमकाविल्याबद्दल पीएमपीच्या बसचे चालक आणि वाहकाला प्रशासनाने बुधवारी निलंबित केले, तर त्या कुटुंबाची टोलवाटोलवी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत.
पुरंदर विमानतळासाठी 3,515 कोटी
पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २ हजार ३६७ हेक्टर जागा संपादित करण्याच्या सुमारे ३ हजार ५१३ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले.
मोठे वीजबिल आल्यास हप्त्याने भरण्याची सोय
पुणे - महावितरणने थकीत वीजबिलाबाबत 2009 मध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणीच होत नसल्याचे समोर आले आहे. या परिपत्रकानुसार ग्राहकाला दीर्घकाळ बिल दिले गेले नसेल, तर ते मोठ्या रकमेचे बिल हप्त्याने भरण्याची सवलत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून मात्र अशी सवलत ग्राहकाला न देता एकरकमी बिल भरण्यास सांगितले जाते.
उबेर फायद्याचीच, प्रशासनाने रिक्षाचालकांना फटकारले
पुणे- रेल्वे स्टेशन परिसरात सुरू करण्यात आलेली उबेर टॅक्सी सेवा प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. उबेरला विरोध करणाऱ्या रिक्षाचालकांना त्यांच्या पोटावर पाय पडत असल्याची भीती वाटत असून यामुळेच ते विरोध करत आहेत. रिक्षाचालकांविरोधात ज्यादा पैशाची आकारणी, मिटर न वापरणे अशा तक्रारी वाढत असून या तुलनेत उबेर सेवा फायद्याची ठरत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सभागृबाहेर थांबल्यास कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई- महापालिका आयुक्त
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध सभेदरम्यान सभागृहाबाहेर कर्मचा-यांनी थांबू नये. आपल्या विभागात काम करावे, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहेत. तरीही, कुणी कर्मचारी सभागृहाबाहेर आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद दिली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)