Wednesday 17 October 2018

‘पीएफ’वर मिळणार ८ टक्के व्याज; लाखो नोकरदारांची ‘दिन दिन दिवाळी’

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पीएफ शी संबंधीत एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचं भविष्य सुकर आणि सुखावह करणाऱ्या जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) आणि अन्य बचत योजनांवरील व्याजाचा दर ८ टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय वित्त विभागानं या संदर्भातील परिपत्रक काढलं. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कर्मचाऱ्यांना जीपीएफवर ८ टक्क्याने व्याज मिळेल. हा दर गेल्या सहा महिन्यांपासून ७.६ टक्के होता.

Pune: After initial hiccups, Nigdi-Dapodi BRTS gets on track, brings down travel time

Nearly two months after the Nigdi-Dapodi BRTS was started on the Pune-Mumbai Highway, it seems to be gaining acceptance among commuters. The BRTS has cut down the travel time on the stretch, where traffic jams had been a major issue for a long period. “After initial hiccups, all is well on the dedicated BRTS lane now,” said Vijay Bhojane, who heads the PCMC’s BRTS department. “There has been no mishap on the route. Initially, there were some breakdowns of buses but now we hardly receive such reports,” he said.

कचऱ्याच्या ‘त्या’ निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार; आयुक्तांना बेड्या ठोकणार – दत्ता साने

पिंपरी (Pclive7.com):- कचऱ्याची निविदा प्रक्रिया रद्द केल्यानंतर दर कमी केल्याने पुन्हा त्याच कंपन्यांना काम देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यात आयुक्तांसह पदाधिका-यांचे हात ओले झाले असून मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणी न्यायालयात सर्व कागदपत्र सादर करणार असून यात दोषी आढळणा-या आयुक्तांना बेड्या ठोकल्याशिवाय शांत राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला आहे.

रविवारी चिंचवड मध्ये ‘डॉग शो’; देश, विदेशातील नामांकित जातीचे श्वान पाहण्याची शहरवासियांना पर्वणी

पिंपरी (Pclive7.com):- पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने रविवारी (दि. २१ ऑक्टोबर) ‘ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे सचिव एन. एस. पटवर्धन यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.        

बी.व्ही.जी. व ए.जी.इनव्हायरो इन्फ्रा कंपनीला थेट पद्धतीने दिलेला ठेका रद्द करून फेरनिविदा काढा – रमेश वाघेरे

एमपीसी न्यूज  –  बी.व्ही.जी. व ए.जी.इनव्हायरो इन्फ्रा कंपनीला थेट पद्धतीने दिलेला ठेका रद्द करून फेरनिविदा काढा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी केली आहे.  घरोघरी कचरा गोळा करण्याकरिता निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये बी.व्ही.जी.कंपनी व ए.जी. इनव्हायरो इन्फ्रा कंपनीने टेंडर भरले होते.

पालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी होणार गोड!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीसाठी 8.33 टक्के बोनस व 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. कर्मचा-यांबरोबरच शिक्षक व बालवाडी शिक्षकांना देखील हा लाभ दिला जाणार आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी सर्व कर्मचा-यांना मिळेल, याची तजवीज करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) लेखा विभागाला दिले.

‘चर्‍होलीतील कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न सोडवा; अन्यथा हंडा मोर्चा काढणार’

एमपीसी न्यूज – चर्‍होली, वडमुखवाडी, लक्ष्मी नारायणनगर कॉलनी या भागांत कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कृत्रिम पाणी टंचाईमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहे. ही समस्या तातडीने न सोडविल्यास पालिका भवनावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका विनया तापकीर यांनी दिला आहे. 

उद्योगनगरीतील शक्तिपीठे

नवरात्रोत्सवात देवीच्या मंदिरांकडे भाविकांची पावले वळू लागली आहेत. अगदी सातारा, सांगली, पुणे, सोलापूर येथील भाविक शहरात येतात. पिंपरी-चिंचवडच्या चारी बाजूंच्या तटबंदीवर देवीने संरक्षक म्हणून असावे, या मोरया गोसावींच्या सुप्त इच्छेपायी त्यांनी शहरात चारही दिशांना देवीची मंदिरे स्थापली आहे. या देवी शहराचे संरक्षण करतात. अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.

संपूर्ण शहरासाठी एकच आराखडा

राज्यातील सर्व शहरांच्या मूळ आणि विस्तारित हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) सुधारणा करताना यापुढील काळात सर्व क्षेत्रासाठी एकत्रितच आराखडा तयार केला जावा, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सर्व महापालिका आणि नियोजन प्राधिकरणांना दिले आहेत. त्यामुळे, मूळ हद्द किंवा सुधारित हद्दीचा आराखडा सुधारित करण्याची प्रक्रिया सुरू करताना संपूर्ण हद्दीच्या नियोजनाच्या दृष्टीने दोन्ही भागांची प्रक्रिया एकत्र राबविण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मतदार याद्यांच्या कामात सहकारी गृहसंस्थांची मदत

पुणे : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्य़ात मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि नावे वगळणे ही कामे करण्यात येत आहेत. या कामासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

पुणे शहर ठरले भारतातील पहिले लाईटहाउस शहर

पुणे- अर्बन मोबिलिटी लॅबसाठी पुण्याला भारतातील पहिले लाइटहाउस शहर म्हणून निवडले गेले आहे. रॉकी माऊंटन इंस्टिट्यूट (आरएमआय) आणि एनआयटीआय या आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुण्याला अर्बन मोबिलिटी लॅबसाठी भारतातील पहिले लाइटहाउस सिटी म्हणून निवडले गेले आहे.

केंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान

पिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांसमोर बेरोजगारीचे संकट उभे ठाकणार आहे. ऑनलाइन औषध विक्रीमुळे कोणतीही औषधे सहजगत्या एका फोनवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या, नार्कोटिक औषधे ऑनलाइन मिळाल्यास त्याचा युवा पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

एसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'

पिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम पहिल्यांदाच सोहम सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्यातर्फे हाती घेण्यात आला आहे. 

ऐतिहासिक पत्रांतून साक्षीदारांची ओळख

पिंपरी - ""कैलासवासी थोरल्या महाराज साहेबांनी न्यायनिवाडे केले. त्याप्रमाणे गोतसभा बोलावून न्यायनिवाडे करावेत,'' अशा आदेशाचा उल्लेख असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडातील "महजर'पासून पेशवेकालीन, आदिलशाही, इंग्रज-मराठे यांच्या काळातील जवळपास साडेतीनशेहून अधिक ऐतिहासिक पत्रव्यवहार इतिहास संशोधक ब. हि. चिंचवडे यांनी जतन केले आहेत. इतिहासाच्या शेकडो वर्षांपूर्वीच्या या साक्षीदारांची खरी ओळख ते नव्या पिढीलादेखील घडवत आहेत. 

उद्यान अधीक्षक साळुंकेंची महापौरांकडून कानउघाडणी

पिंपरी, दि.16 (प्रतिनिधी)- महिला नगरसेवकांशी फोनवर उद्धटपणे बोलणारे महापालिकेचे उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांची महापौर राहूल जाधव यांनी कानउघाडणी केली. पुन्हा असला प्रकार खपवून घेतला जाणार नाही, आता निघा अशा शब्दांत तंबी दिली. नगरसेविका कमल घोलप यांच्या तक्रारीवरून साळुंके यांना चांगलेच सुनावले.

पोलीस-महापालिका प्रशासनाची आज संयुक्‍त बैठक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी सोमवारी(दि.15) आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. वेळ नसल्याचे पत्र पोलीस आयुक्तांनी थेट महापौरांना पाठविलेआहे. वेळेचे नियोजन करून बैठक घेऊ असेही त्या पत्रात म्हटले आहे. आता ही बैठक बुधवारी (दि.17) आयोजित करण्यात आली आहे.

शहरावर घोंघावतेय पाणी कपातीचे संकट

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले असतानादेखील जलसंपदा विभागाने पाणीकपात करण्याविषयीची माहिती महापालिका प्रशासनाला उपलब्ध झाली आहे. त्यावरून पाणी कपात करण्याचे धोरण तयार केले आहे. याबाबतचा धोरणात्मक निर्णय आगामी दोन दिवसांत घेतला जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणी कपातीला समोर जावे लागण्याची दाट शक्‍यता आहे. मात्र. या कपातीला सर्वच राजकीय पक्षांचा विरोध आहे.

चाकण बसस्थानक झाले पार्किंग “हब’

चाकण- येथील एसटी बसस्थानक म्हणजे अनधिकृत वाहनाचे अधिकृत वाहनतळ झाले आहे. अनेक बेकायदेशीर वाहनांच्या पार्किंगमुळे तसेच स्थानकाच्या आवारातील व्यवसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांमुळे बसस्थानकाच्या आवारात एक-दोन स्थानिक वाहतूक करणाऱ्या एसटी बस वगळता दुसऱ्या एसटी बस दिसत नाहीत. खासगी वाहनांच्या अतिक्रमणामुळे हे वाहनतळ आहे की बसस्थानक अशी शंका येऊ लागली आहे.

कौमार्य चाचणी केली नाही; दांडियासाठी “बहिष्कार’

पिंपरी – अमेरिकेमध्ये नुकत्याच एका भारतीय युवा शास्त्रज्ञाला केवळ त्याचे आडनाव हिंदू वाटत नाही म्हणून तेथील एका हिंदू मंदिरातील दांडीया उत्सवात भाग घेण्यास नाकारले होते. या गोष्टीची चीड त्याने त्याच्या ट्‌वीटर अकाऊंटवरुन व्यक्त केली. असाच प्रकार पिंपरी येथेही घडला असून केवळ ल्गानपूर्वी कौमार्य चाचणी केली नाही म्हणून विवोहितेला दांडीया खेळण्यास मज्जाव करत तिच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. याप्रकरणी विवोहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत आठ जणांविरोधात मंगळवारी (दि.16) गुन्हा दाखल केला आहे.