Friday, 29 September 2017

'रोझलॅंड'ला केंद्राचा स्वच्छतेचा पुरस्कार

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील रोझलॅंड हाउसिंग सोसायटीला स्वच्छ भारत दिवस आणि राष्ट्रीय स्वच्छ भारत पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर हा पुरस्कार सुरू केला आहे. गांधी जयंतीदिनी (ता. 2 ऑक्‍टोबर) दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे.

PCMC plans insectarium, pheasant unit at Akurdi zoo

The zoo advisory committee of PCMC has approved a resolution for starting insectarium at the Akurdi zoo at its meeting held on Friday. We will soon prepare the plan for it and send it to the Central Zoo Authority of India (CZAI) for its approval. If ...

Patient's relatives go on the rampage in civic-run hospital

He was a resident of Walhekarwadi in Chinchwad. He got a heart attack due to which the family members took him to a private hospital in Chinchwad. Later he was brought to YCM hospital at 9.45 am. He was admitted to the ICU but died around 12.45 pm."

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला अखेर गती; आमदार महेश लांडगे यांची ‘वचनपूर्ती’

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात दररोज संकलित होणा-या घनकच-यावर रासायनिक प्रक्रिया करून विद्युत निर्मिती करण्यासाठी (वेस्ट टू एनर्जी) महापालिका प्रशासनाने अखेर निविदा काढली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कार्यवाहीला सुरूवात झाली असून, लवकरच कचरामुक्त शहराचे स्वप्न साकार होणार आहे.

‘सीएनजी’चे शहरात आणखी पाच पंप

पिंपरी - शहरातील वाहनांच्या सोयीसाठी येत्या वर्षअखेरपर्यंत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) पाच नवीन पंप सुरू करण्याचे निश्‍चित केले आहे. हे पंप सुरू झाल्यानंतर सीएनजी पंपाची संख्या ३० पर्यंत जाऊन पोचणार असल्याचे एमएनजीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सकाळला सांगितले.  हिंजवडी, वाकड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी या भागात हे पंप सुरू होणार आहेत.

पवनेपाठोपाठ मुळा नदीतही राडारोडा

पिंपरी - मुळा नदीमध्ये भराव टाकण्याचा धक्‍कादायक प्रकार पिंपळे निलख येथे उघडकीस आला आहे. मनुष्यबळ नसल्याचे सांगत महापालिकेच्या पर्यावरण विभागानेही कानावर हात ठेवले आहेत, तर दुसरीकडे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनीही आपण नवीनच पदभार घेतल्याचे सांगत कारवाईबाबत असमर्थता दर्शविली आहे. यापूर्वी पवना नदीत भराव टाकण्याचा प्रकार ‘सकाळ’ने वेळोवेळी उघडकीस आणला आणला आहे.

‘आंद्रा, भामा’तील पाणी आरक्षण रद्द

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेला आंद्रा आणि भामा आसखेड धरणांतून पाणी देण्यासाठी ठेवलेले आरक्षण रद्द केल्याचे जलसंपदा विभागाने महापालिकेला कळविले आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या स्थितीला तोंड देणाऱ्या महापालिकेला या दोन धरणांतून २.६६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळणार होते. आरक्षण पुन्हा ठेवण्यासाठी महापालिकेला आता सुधारित फेर प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा लागेल.

राष्ट्रवाद्यांनो, भाजपवर भरोसा नाय काय?

पिंपरी - राष्ट्रवाद्यांनो, तुमचा भाजपवर भरोसा नाय काय..., भाजपची आश्‍वासनं कशी गोल...गोल..., सत्ताधाऱ्यांचं काम कसं फोल...फोल... प्रकल्पांचा झालाय पहा बट्ट्याबोळ... राष्ट्रवाद्यांनो, तुमचा भाजपवर भरोसा नाय काय... असा सवाल आता जनता विचारू लागली आहे. राष्ट्रवादीच्या काळात मंजूर झालेली विकासाची कामे सत्ताधाऱ्यांनी अडवून ठेवली आहेत. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय विकास माझा, असा प्रश्‍न शहरातील नागरिकांना पडला आहे.

'अनधिकृत'वर शास्तीकर; दीड लाख मिळकतधारक रडारवर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता द्या, अनधिकृत बांधकामे नियमित करून शास्तीकर शंभर टक्के माफ करू, असे आश्वासन देणा-या भाजपाने आपला शब्द फिरविला आहे. त्यामुळे सुमारे दीड लाख ...

कारभाराची झाडाझडती, प्रशासनाची तारांबळ, विरोधी पक्षाने पाठविली प्रश्नावली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सपाटून अपयशाला सामोर जावे लागले. महापालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. सत्ताधा-यांच्या कारभाराची झाडाझडती ...

लष्कराच्या रस्त्यांबाबत आमदार, पक्षनेत्यांचे संरक्षणमंत्री सितारमन यांना साकडे

पिंपरी-चिंचवडमधील लष्कराच्या हद्दीत येणाऱ्या विविध रस्त्यांच्या जागांच्या हस्तांतरणाचा प्रलंबित प्रश्न, बोपखेल गावासाठी मुठा नदीवर कायमचा पूल बांधणे आणि पिंपळेसौदागरमधील लष्कराच्या हद्दीतील रस्त्याचा प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप व पक्षनेते एकनाथ पवार यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांची गुरूवारी (दि. २८) दिल्लीत भेट घेऊन निवेदन दिले. येत्या पंधरा दिवसांत पुणे दौऱ्यावर येणार असून, त्यावेळी बोपखेल आणि पिंपळे सौदागर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन संरक्षणमंत्री सितारमन यांनी दिले.

[Video] धमकीच्या पत्राला घाबरून निर्णय बदलणार नाही- तुकाराम मुंढे


शहरातील आठ प्रमुख मार्गांवर प्रत्येक मिनिटाला एक, तर अन्य तीन मार्गांवर दर दोन मिनिटाला एक बस धावेल

सिमला आॅफिस ते हिंजवडी रस्ता, कासारवाडी ते भोसरी रस्ता आणि संगमवाडी येथे विश्रांतवाडी रस्त्यावर दर दोन मिनिटाला बस धावेल. ... स्टेशन-हिंजवडी फेज ३, भेकराईनगर-चिंचवडगाव, वज्र २ वारजे माळवाडी-वाघोली, शेवाळवाडी- पिंपरी पालिका, मनपा भवन-कोंढवा गेट, कात्रज-चिंचवड ...

मध्यवस्तीत धावणार मिडी बस

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात दाखल होऊ घातलेल्या दोनशे मिडी बससाठी पीएमपी प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्याबरोबरच या बस शहराच्या मध्यवस्तीत या बस सोडण्यात येणार असून मार्गांचीही आखणी करण्यात आली आहे.

अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांचा महापालिकेने केला गौरव

पिंपरीपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांनी जुनी सांगवी येथील पुलावरुन नदीत पडलेल्या सागर चंदनशिवे या तरुणाचा जीव वाचवला आहे.

पानाच्या दुकानावर इतर वस्तू विकण्यास मज्जाव

नवी दिल्ली- पानाच्या दुकानातून इतर वस्तू विकू नयेत अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे. त्यामुळे या दुकानातून विकल्या जाणाऱ्या वस्तूच्या उत्पादकावर काही काळ परिणाम होण्याची शक्‍यता आहे. अशा दुकानात एनवेळी लागणाऱ्या वस्तू ठेवल्या जातात. त्यात पेस्ट, ब्रश, चॉकलेट, डासाची अगरबत्ती यांचा समावेश आहे.

पेट्रोलियम पदार्थ लवकरच ई-कॉमर्स वेबसाईट्सवर

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती
चौफेर न्यूज – लवकरच पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध होतील, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. ‘सुरुवातीला जेव्हा मी या संकल्पनेबद्दल बोललो, तेव्हा असे काही होऊ शकते याबद्दल अनेकांना शंका होती. अनेकांनी ही संकल्पना प्रत्यक्षात येईल की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले. मात्र आता ही संकल्पना सत्यात उतरणार आहे,’ असे प्रधान यांनी म्हटले. ते दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते.