कामगारांनी धरली गावाकडची वाट पिंपरी - औद्योगिक मंदीच्या झळा दिवसेंदिवस कामगारांना बसत असून, किमान आठ तास काम मिळविण्यासाठी त्यांना झगडावे लागत आहे. काही कंपन्या व लघुउद्योगांनी ब्लॉक क्लोजर व कामगारकपात केली आहे. त्यामुळे अनेक कामगारांना "गड्या आपला गाव बरा...' म्हणत मूळगावाचा रस्ता पकडला आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत लहान-मोठ्या सुमारे हजार कंपन्या आहेत. या ठिकाणी लाखो कामगार रात्रीचा दिवस करून पोटाचा प्रश्न सोडवतात; परंतु जादा कामाच्या माध्यमातून बारा ते पंधरा तास काम करून महागाईच्या काळात जगणे सोपे करणाऱ्या कष्टकरी कामगारांना आता आठ तासापेक्षा जादा काम मिळत नाही. त्यामुळे मंदीच्या या परिणामामुळे अनेकांना गावाचा रस्ता धरावा लागल्याचे टीयूसीसी संलग्न एमआयडीसी कामगार संघटनेचे सरचिटणीस बी. जी. तळेकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 16 December 2012
'रेडझोन'मुळे प्राधिकरणातील बांधकामे ठप्प
'रेडझोन'मुळे प्राधिकरणातील बांधकामे ठप्प पिंपरी - देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या संरक्षित क्षेत्राची (रेडझोन) हद्द निश्चित होईपर्यंत नवीन बांधकाम परवानगी, पूर्णत्व दाखला अथवा मिळकत हस्तांतरासाठी ना हरकत प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सभेने शुक्रवारी (ता. 14) घेतला. त्यामुळे या भागातील विकास आता अनिश्चित काळासाठी ठप्प झाला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यावसायिक, तसेच महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन आणि स्वस्त घरकुल प्रकल्पाला बसणार आहे.
शहराला लवकरच मिळणार 24 तास पाणी
शहराला लवकरच मिळणार 24 तास पाणी पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यानुसार येत्या तीन ते चार वर्षांत टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी (ता. 15) दिली.
७ महिन्यांत १६ बालकांचा करुण अंत
७ महिन्यांत १६ बालकांचा करुण अंत: प्रवीण बिडवे । दि. १५ (पिंपरी)
कधी घरातल्या पाण्याच्या पिंपात बुडून, कधी बाल्कनीतून पडून तर कधी बांधकामासाठी खोदलेल्या खड्डय़ातील पाण्यात गटांगळ्या खाऊन अनेक बालकांनी आपला जीव गमावला आहे. निरागस बालपण फुलण्याआधीच कोमेजत असल्याच्या घटना शहरात वाढत असून, अशा घटनांमुळे शहरवासी अनेकदा हळहळले आहेत. शहरात अशा दुर्दैवी घटनांमध्ये ७ महिन्यांत १६ बालकांचा करुण अंत झाला आहे.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बालकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या सलग तीन घटना घडल्या. २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत घडलेल्या तीन घटनांमुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. इमारतीच्या बाल्कनीतून पडल्याने बालकांचा मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यातील एक घटना काळेवाडीत तर दुसरी चिंचवडमधील दळवीनगरात घडली. काळेवाडीतील घटनेत आदित्य देविदास कराळे (वय ४) तर चिंचवडमधील घटनेत निधी प्रताप कठारे (९ महिने) या बालिकेने आपला जीव गमावला. बांधकामांसाठी खोदलेल्या खड्ड्यांतील पाण्यात बुडाल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर गटारावर झाकण नसल्याने त्यात पडून एका बालकाचा मृत्यू झाला. एम्पायर इस्टेट ते काळेवाडी पुलासाठी महापालिकेने मोठे खड्डे खोदले आहेत. त्यातील एका खड्ड्याने प्रदीप नाथा साळवे (रा. बौद्धनगर, पिंपरी) या बालकाचा जीव घेतला. इमारतीसाठी खोदलेल्या खड्डय़ातील पाण्यात बुडाल्याने लक्ष्मीप्रिया वासुदेव हती (७) या बालिकेचा करुण अंत झाला. पुनावळे येथे घराजवळील खड्ड्यात पडून डोरेश्वरी प्रदीप शाहू (वय ३) या बालिकेला जीव गमवावा लागला. मोरवाडीतील लालटोपीनगरमध्ये साहेब अब्बास शेख (दीड वर्ष) या बालकाचा गटारात पडून मृत्यू झाला.
घरातील मोठय़ा भांड्यांत साठविलेले पाणीही चिमुकल्या जीवांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बालकांची संख्या मोठी आहे. भरलेल्या बादलीत पडून निशा राजू परिहार (वय १) या बालिकेचा मृत्यू झाला. हिंजवडीतील भटवारानगरमध्ये जुलैत ही घटना घडली होती. पिंपरीगावात साई सचिन वाघेरे (वय दीड वर्ष), यमुनानगरात वीणाकुमारी नीतेशकुमार (१४ महिने) या बालिकेचा असाच दुर्दैवी मृत्यू झाला. विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या दोन घटना हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. बांधकाम साईटवर अंघोळ करतेवेळी शॉक लागून नागेंद्रमा साहेबाना कारेल या बालिकेने तर पिंपळे गुरव येथे साहील समीर वाकडे (१३ महिने) याचा जीव गेला. याखेरीज डांगे चौकातील स्फोटात जखमी झालेल्या पीयूष संतोष वाळुंज (वय ६) या बालकाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. तर मोहननगरमध्ये साहील बाबू पिसाळ (वय ६) या विद्यार्थ्याने शाळेच्या परिसरातील विहिरीतच जीव गमावला. भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये पित्याकडून कंपनीचे गेट ओढले जात असताना त्यामध्ये अडकून निरुता भरत ओढ (वय ४) या बालिकेचा जीव गेला.

MSEDCL recovers over Rs 18L in fines
MSEDCL recovers over Rs 18L in fines: The Maharashtra State Electricity Distribution Company Limited disconnected as many as 40 illegal connections in Kothrud and Pimpri divisions in the last two days.
प्राधिकरण नियमाप्रमाणे दंडआकारणी नाही
प्राधिकरण नियमाप्रमाणे दंडआकारणी नाही पिंपरी - बांधकाम करण्यासाठी दिलेल्या तीन वर्षांच्या मुदतीत बांधकाम पूर्ण न झाल्यास प्राधिकरण दर वर्षी पाच टक्के दंड आकारते. दंडाच्या या रकमेत दर वर्षी पाच टक्क्यांनी वाढ होते. मात्र, रेडझोनची हद्द निश्चित न झाल्याने बांधकाम परवाना; तसेच पूर्णत्वाचा दाखला देण्यात येत नाही. यामुळे या बांधकामांना प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे दंड आकारू नये, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्याचा निर्णय प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
राजगुरुनगर विमानतळाला विरोध
राजगुरुनगर विमानतळाला विरोध: राजगुरुनगर येथील प्रस्तावित विमानतळाला पाइट, रौंधळवाडी, धामणे, कोये, आसखेड या पाच गावांनी विरोध केला असून तसा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. या विमानतळामुळे बाराशे कुटुंबे विस्थापित होणार असल्याचा दावा विमानतळ हटाव कृती समितीने केला आहे.
‘YCM’चे सुहास काकडे निलंबित
‘YCM’चे सुहास काकडे निलंबित: नॉन स्ट्रेस टेस्ट (एनएसटी) मशिन खरेदी निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याचा ठपका ठेवून महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शुक्रवारी वायसीएम हॉस्पिटलच्या मध्यवर्ती औषध भांडाराचे व्यवस्थापक सुहास एकनाथ काकडे यांना तडकाफडकी निलंबित केले. प्राथमिक चौकशी होईपर्यंत निलंबनाची कारवाई कायम राहिल. असे आयुक्त परदेशी यांनी सांगितले.
Plans for phased 24*7 water supply
Plans for phased 24*7 water supply: Pimpri : The Pimpri Chinchwad Municipal Corporation has started preparing plans for a phased 24*7 water supply.
विवेक इनामदार यांना 'विघ्नहर्ता पुरस्कार' प्रदान
विवेक इनामदार यांना 'विघ्नहर्ता पुरस्कार' प्रदान
पिंपरी-चिंचवडमधील हनुमाननगर येथील विघ्नहर्ता युवा मित्र मंडळाच्या वतीने 'एमपीसी न्यूज'चे संपादक विवेक इनामदार यांच्यासह पाच जणांना 'विघ्नहर्ता पुरस्कारा'ने गौरविण्यात आले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Subscribe to:
Posts (Atom)