सारथी संदर्भात आजच्या सकाळमध्ये आलेली बातमी खरंच धक्कादायक आहे! आमच्या माहितीनुसार हे सर्व ऑपरेटर पदवीधारक आहेत, त्यांचे इंग्रजी, मराठी, हिंदी तिन्ही भाषेवर प्रभुत्व आहे आणि पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्व यंत्रणा व विभागांबद्दल ते उत्तम प्रशिक्षित आहेत. पालिकेसाठी व शहरासाठी ते महत्वपूर्ण आहे, ते चांगले काम करत आहेत आणि नक्कीच सारथीच्या यशामध्ये त्यांचाही वाटा आहे. तत्कालीन आयुक्त डॉ श्रीकर परदेशी यांनी ऑपरेटर भरती व प्रशिक्षण यासाठी एक आदर्श व्यवस्था आखून दिली होती परंतु त्यांच्या बदलीनंतर आयटी विभागप्रमुखांनी या सर्व चांगल्या व्यवस्थांना केराची टोपली दाखवली असे दिसते कारण सारथी प्रकल्पाच्या सुरवातीस हे सर्व ऑपरेटर पालिकेच्या थेट वेतनावर होते पण नंतर त्यांना खाजगी कंपनीच्या दावणीला बांधले गेले
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 21 September 2017
अधिका-यांच्या पदोन्नतीची चिंता, सत्ताधारी भाजपाने तहकूब केली सभा; वैद्यकीय अधिका-याच्या निवडीत रस
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा सर्वसाधारण सभा तहकूब केली. विषय पत्रिकेवर आरक्षणे ताब्यात घेणे, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियानाविषयीचे महत्त्वाचे विषय असताना चर्चा न ...
चऱ्होलीतील आवास योजनेला “म्हाडा’ची मंजुरी
दीडशे कोटींचा प्रकल्प : 1 हजार 442 सदनिकांचा समावेश
पिंपरी – आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून चऱ्होली येथे 1 हजार 442 सदनिका बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्प अहवालास राज्य शासनाच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने बुधवारी (दि. 20) मंजुरी दिली, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
Property tax waiver for eco-friendly societies
Pimpri Chinchwad: The standing committee of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has cleared the civic administration's proposal for increasing concession in property tax of housing societies implementing environment conservation measures.
HC directs status quo over health officer's appointment
Pune: The Bombay high court on Wednesday directed a status quo till September 27 over the Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC) move to replace its medical officer of health (MoH) K Anil Roy with another officer from the civic medical ...
आंद्रा, भामा-आसखेड धरणांवरच उद्योगनगरीचे "जीवन'
पिंपरी - आंद्रा किंवा भामा आसखेड धरणांतून येत्या दोन वर्षांत तातडीने पाणी न घेतल्यास पिंपरी- चिंचवड शहराला मोठ्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. मात्र, या कामाला अद्याप फारशी गती मिळालेली नाही. पुनर्वसन झाल्याशिवाय धरणातील पाणी घेण्यास धरणग्रस्तांनी विरोध केल्यामुळे, तेथून पाणी मिळण्यातही अडचणी येण्याची शक्यता आहे.
पिंपरी - पाणीपुरवठ्यासाठी चार निविदा
पिंपरी - शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी "अमृत' योजनेतून 244 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. याबाबत तीन वेळा निविदा काढूनही फक्त एकच ठेकेदार यामध्ये सहभागी होत आहे. त्यामुळे सरकारची मंजुरी घेऊन आता विभागानुसार चार निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
Laxman Jagtap dares Shrirang Barne to ‘win Maval seat, prove mettle’
BJP MLA Laxman Jagtap challenged Shiv Sena MP Shrirang Barne on Tuesday to contest from Maval parliamentary constituency in the next general elections and 'prove his mettle'.
विद्यार्थ्यांनी घेतली महापौरांची शाळा
पिंपरी – निगडी येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी (दि. 20) महापालिकेचा अभ्यास सहल दौरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी शहरातील अनेक समस्यांची गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे महापौर काळजे हे चांगलेच कोंडीत पकडले गेले होते. मात्र, त्यांनी स्वतःला सावरुन घेत विद्यार्थ्यांना उत्तरे दिली. परंतु, महापालिकेची सर्वसाधारण सभा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. तर विरोधी नगरसेवकांची महापौरांना कोंडीत पकडण्याची नामी संधी गेल्याने, तिच संधी मॉडर्न हायस्कूल विद्यार्थ्यांनी भरुन काढत महापौरांची त्यांनी शाळा घेतली.
पोवाड्यातून स्त्री शक्तीचा जागर अन् समाज प्रबोधन
शाहीर शीतल कापशीकर : आधुनिकतेची कास धरून स्वरचित पोवाडे
पिंपरी – “पुराण काळापासून । नारी रूपाला । करिती वंदन । गार्गी, मैत्रेयी उदाहरण । विदुषी होत्या बुद्धिमान । तशाच थोर पंचकन्या । अहिल्या, द्रौपदी नि सीता । तारा नि मंदोदरी तथा । करूया नित्य त्यांचे स्मरण हो जी जी जी…. ।’ कष्टानेच कलेचीही सिद्धी प्राप्त होते. विविध कलागुण असणारे अनेक जण असतात मात्र पोवाड्याची पारंपारिक लोककला जोपासून काहीतरी वेगळं करण्याची जिद्द उराशी बाळगून पोवाड्यातून समाज प्रबोधन, आधुनिकतेची कास धरून, स्त्री शक्तीचा जागर निर्माण करण्याचे काम शाहीर शीतल कापशीकर यांनी गेली दहा वर्ष केले आहे.
महामार्गाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती
पुणे - राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागातील प्रलंबित प्रकल्प, सुरू असलेले प्रकल्प आणि पुढील काळात येऊ घातलेले प्रकल्प मार्गी लागण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प मार्गी लागणार आहे. प्रथमच अशा प्रकारे महामार्गांचे काम गतीने लावण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
‘टॅग’मुळे महामार्गावर वाहने ‘फास्ट’
पुणे - गेल्या काही महिन्यांपासून केवळ चर्चेत असलेली फास्ट टॅग योजना अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून राबविण्यास सुरवात झाली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील (क्र.६५) पाटस व सरडेवाडी, तसेच पुणे-सातारा महामार्गावरील (क्र.४८) खेड-शिवापूर व आनेवाडी पथकर नाक्यावर फास्ट टॅग योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता टोल नाक्यावर जाणाऱ्या वेळेची बचत होणार असून वाहतूक अधिक गतिमान होईल.
सर्व विभागांच्या परीक्षा आता एकाच “महापोर्टल’वर
पुणे, दि. 20 – राज्यातील विद्यार्थ्यांना आता वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळावर माहिती घेत बसावी लागणार नाही, कारण राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शासनाच्या विविध परीक्षांसाठी एकच “ई महा परीक्षा’ पोर्टल असून विद्यार्थ्यांच्या परीक्षेपासून ते निकालापर्यंत सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना याच पोर्टलवर पाहता येणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून या पोर्टलाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार डेंग्यूचे डास ओळखण्याचे प्रशिक्षण
पिंपरी – सर्वत्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके आणि नाल्यात पाणी साचले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांची निर्मिती होत असून रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आपला परिसर डेंग्यू डासमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांना डेंग्यूचे डास ओळखण्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
'वायसीएम'मधील लुटीची चौकशी सुरू, आरोग्य वैद्यकीय अधिका-यांकडून दखल
गरिबांना जीवन देणारे रुग्णालय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय असून, या रुग्णालयातील रुग्णसेवेकडे महापालिकेचे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याचे 'लोकमत'ने स्टिंग आॅपरेशन करून ...
Subscribe to:
Posts (Atom)