पिंपरी- चिंचवडच्या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा कारभार येत्या पंधरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पोलीस आयुक्त, अतिरीक्त पोलीस आयुक्त, तीन उपायुक्त, सात सहायक पोलिस आयुक्त आणि गुन्हे शाखेची वेगवेगळी युनिट या सगळ्यासाठी जागेची शोधा शोध सुरु आहे. तर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त कार्यलायत लागणाऱ्या साहित्याची जुळवा-जुळव करण्यात येत आहे. जागांची शोधा शोध आणि साहित्याची जुळवा जुळव करुन येत्या बुधवार पासून कामकाज सुरु करण्यासाठी सगळीकडे एकच लगबग सुरु आहे.

