..तर गोळ्या घालू, घरच्यांना पळवून नेऊ: अतुल कुलकर्णी। दि. १३ (मुंबई)
अतिक्रमण पाडाल तर गोळ्या घालू.. घरच्यांना पळवून नेऊ, अशा धमक्या.. ती पाडली नाहीत तर तुरुंगात पाठवणारा सरकारचा नवा कायदा.. त्यात कोणी उच्च न्यायालयात गेले तर आमचा आधीचा आदेशच का पाळला नाही म्हणून न्यायालय देखील गळा आवळणार.. वरिष्ठ नेते अतिक्रमण पाडा असे सांगताना त्यांचेच चेले चपाटे व १२८ नगरसेवक, लोकप्रतिनिधी धमक्यांची भाषा करतात. लोकप्रतिनिधी विरुध्द अधिकारी असा हा धुमसणारा संघर्ष कोणत्या ‘गँग ऑफ वासेपूर’ सिनेमातला नाही. मुंबईच्या जवळ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सध्या हे कथानक बेरंगी वळणावरुन जातानाचे चित्र आहे.
No comments:
Post a Comment