गणेश मूर्तींवर कलाकुसर सुरू: पिंपरी । दि. २५ (प्रतिनिधी)
विघ्नहर्ता गजाननाचा उत्सव अवघ्या २१ दिवसांवर आला असून मूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात मूर्तिकार मग्न झाले आहेत. तर भक्तांपर्यंत मूर्ती पोहचिण्यासाठी विक्रेतेही सज्ज झाले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडूची माती, रंग महागल्याने तसेच वाहतूकखर्चात वाढ झाल्याने मूर्तीच्या किमती २0 टक्क्यांनी महागणार आहेत. त्यामुळे लाडक्या गणरायासाठी भक्तांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. शाडू मातीचा पुरवठा यंदा कमी असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
असा होतो व्यवसाय..
पिंपरी-चिंचवडमध्ये मूर्ती निर्मितीचे काम कमी प्रमाणावर होते. मात्र, तयार मूर्ती आणून स्टॉल लावून विक्री करण्यावर काही लोक भर देतात. सहा महिनेअगोदरच मूर्तीची नोंदणी कारखान्यात केली जाते. हजार ते पाच हजार असा अँडव्हान्स दिला जातो. कारखान्यात उपलब्ध असणार्या विविध आकारांतील नमुना मूर्तीच्या आधारे कारखाना मालक नोंदणी करून घेतात. त्यानंतर दोन आठवडे अगोदर या मूर्ती विक्रीच्या ठिकाणी आणल्या जातात. तात्पुरत्या भाड्याच्या जागेत त्यांची ग्राहकांसाठी मांडणी केली जाते. या व्यवसायातून ३0 ते ४0 टक्के नफा मिळविता येतो. होलसेल दरात मिळालेल्या मूर्ती, ते स्टॉलपर्यंत आणण्यासाठी वाहतूक खर्च, स्टॉलचे भाडे असा खर्च करावा लागतो. अत्यंत कमी दिवसांत आणि कमी परिश्रमात हंगामी व्यवसाय करून चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्याकडे विक्रेत्यांचा कल अधिक आहे.
No comments:
Post a Comment