Wednesday, 19 September 2012

‘सिटी सेंटर’चे सादरीकरण

‘सिटी सेंटर’चे सादरीकरण: पिंपरी । दि. १७ (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर समोरील जागेत बीओटी तत्त्वावर सुमारे ३३.५ एकर जागेत सिटी सेंटर प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रकल्पासाठी आग्रही आहेत. त्यानुसार महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी नियोजित प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

आयुक्त कक्षात झालेल्या सादरीकरणावेळी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती सभापती जगदीश शेट्टी, शहर सुधारणा समिती सभापती शुभांगी बोर्‍हाडे, विधी समिती सभापती प्रसाद शेट्टी, क्रीडा समिती सभापती वनिता थोरात, महिला व बाल कल्याण समिती सभापती भारती फरांदे, शिक्षणमंडळ सभापती विजय लोखंडे, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक अप्पा बारणे, भाऊसाहेब भोईर, अनंत कोर्‍हाळे, सुलभा उबाळे, सीमा सावळे आदी पदाधिकारी व सदस्य, शहर अभियंता एम. टी. कांबळे, नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

क्रिसिलचे संचालक राजेंद्र भंगेरा म्हणाले, ‘‘प्रत्येक मोठय़ा शहरात सिटी सेंटर प्रकल्प आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही मध्यवर्ती ठिकाणी तसेच दळणवळणाच्या दृष्टीनेही सोईस्कर असलेल्या जागी हा प्रकल्प साकारण्याचे नियोजन आहे. या सादरीकरणामध्ये प्रचलित बाजारभावाचा अभ्यास करून दरासंदर्भात आकडेवारी घेण्यात आली आहे. चटई क्षेत्र निर्देशांक, टीडीआर, बांधकामाचा दर, भाडेकरार, डिझाईन्स आदी मुद्दय़ांवर उपस्थितांनी विविध सूचना केल्या.’’

या सूचनांनुसार योग्य ते बदल करून फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी संबंधितांना दिले.

No comments:

Post a Comment