'घर बचाओ कृती समिती'ची स्थापना
पिंपरी, 8 सप्टेंबर
महापालिका व प्राधिकरणाकडून अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना, भाजप, काँग्रेस, मनसे, आरपीआय तसेच नागरी हक्क सुरक्षा समितीसह शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत शनिवारी पिंपरी-चिंचवड घर बचाओ कृती समितीची स्थापना केली. समितीचे उद्घाटन येत्या 12 सप्टेंबर रोजी चिखली येथे ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि मुंबई महापालिकेचे माजी पोलीस उपायुक्त गो. रा. खैरनार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
No comments:
Post a Comment