बाजारपेठा फुलल्या: पिंपरी । दि. २२ (प्रतिनिधी)
तमाम शहरवासीयांना दसर्याचा मनमुराद आनंद मिळवून देण्यासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. ‘हर्षाचा सण दसरा करा आनंदात साजरा’ असा संदेश देत त्या ग्राहकांना खरेदीसाठी खुणावू लागल्या आहेत. अष्टर, झेंडू यांसारख्या फुलांच्या दरवळाने बाजारपेठांचा परिसर मोहरून गेला आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा मोठा मुहूर्त आहे. अश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी केलेली खरेदी धनसंचयाचा आनंद देते अशी समाजमनाची भावना आहे. म्हणूनच सोने-चांदीचे दागिने, नवीन वास्तू, दुचाकी, अलिशान मोटारींच्या खरेदीसाठी आवर्जून दसर्याची प्रतीक्षा केली जाते. अशा नवनवीन वस्तू घरी घेऊन येण्यासाठी नागरिक आतुरले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अत्याधुनिक मोबाइल यांसारख्या नवनव्या वस्तूंच्या खरेदीचा सुखसोहळा नागरिकांना अनुभवता यावा, यासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. महागाईने होरपळलेल्या ग्राहकांच्या चेहर्यावर थोडे हसू उमलावे यासाठी सवलती, लकी ड्रॉ यांसारख्या योजना देऊन विक्रेते ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.
शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, चिखली, खडकी, सांगवी परिसरांत बाजारपेठा असून तेथे आनंदाचे आणि उल्हासाचे वातावरण पहावयास मिळत आहे. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रोषणाई, आकर्षक योजनांची माहिती देणारी पत्रके व्यवसायाच्या ठिकाणी लावण्यात आली आहेत.
औद्योगिक नगरीत खंडेनवमीच्या निमित्ताने लहान मोठय़ा सर्व कंपन्या, दुकाने आदी ठिकाणी यंत्रसामग्री आणि नित्यपयोगी उपकरणांची पूजा होणार असल्याने पूजेचे साहित्य खरेदीसाठी सोमवारी नागरिकांची गर्दी होती. झेंडूच्या फुलांचीदेखील मोठय़ा प्रमाणावर आवक झाली आहे. बाजारपेठांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा केशरी आणि पिवळ्याधमक फुलांचे ढिगारे दिसू लागले आहेत. आंब्याच्या डहाळ्या, आपट्याची पाने, नारळ, गजरा आणि पूजेचे अन्य साहित्य खरेदीसाठी नागरिकांची पावले बाजारपेठांकडे वळू लागली आहेत. ३0 ते ७0 रुपये किलो याप्रमाणो झेंडूच्या फुलांची तर १५0 ते २00 रुपये किलो दराने अष्टरच्या फुलांची विक्री होत आहे. याखेरीज दसर्याला मोठय़ा प्रमाणावर मिठाईचे वाटप केले जात असल्याने हे विक्रेतेही ग्राहकांच्या स्वागतासाठी सजली आहेत.
No comments:
Post a Comment