'हॉटेल वेस्ट'पासून महापालिका 'पीपीपी'वर बायोगॅस निर्मिती करणार
पिंपरी, 22 नोव्हेंबर
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या हॉटेलिंग बरोबरच 'वेस्ट फूड'चे प्रमाण वाढत आहे. गेल्या पाच वर्षात हॉटेल आणि कॅन्टीनमधील कच-यात दुपटीने वाढ झाली आहे. या कच-याच्या विघटनासाठी सध्या महापालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिकेने 'पीपीपी' तत्वावर बायोगॅस निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची निविदा महापालिकेने प्रसिध्द केली असून मोशी कचरा डेपो याठिकाणी तीन एकर जागेवर हा प्रकल्प उभा राहणार आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment