http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_34597&To=9
नाती अशीच ऋणानुबंधांची
डॉ. श्रीकृष्ण जोशी
देवाने जसा जन्म दिला तसे काही सोबतीही दिले. काळाच्या चक्रात रोज सूर्य नव्याने उगवतो. सूर्यानं आपला प्रकाशाचा पिसारा बंद केला की अंधार पडून दिवस संपून जातो. दिवसामागून दिवस येतात नि जातात. यामध्ये रोज नवीन नवीन माणसं भेटत राहतात. काही ओळखी निर्माण होतात. एकदा भेटलेली माणसं पुन्हा पुन्हा भेटतात. मग ती भेटली नाहीत की मनात कालवाकालव होते. काही माणसं नुसती एकदा भेटूनसुध्दा हृदयाच्या कप्प्यात आपली छाप पक्की करून ठेवतात. थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुध्दा निघून जातात. आठवणींची पिसं जागोजागी पडून राहतात. आयुष्यात काही माणसं काही क्षणच येऊन जातात पण आयुष्याच्या वाटेवरती पाऊलखुणा ठेवून जातात.
No comments:
Post a Comment