शहरातील 32 स्मशानभूमींच्या देखभालीचे काम 27 ठेकेदारांना पिंपरी - शहरातील 32 स्मशानभूमींची देखरेख करण्यासाठी 27 संस्थांना कामे देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी दिली.
शहरात 39 स्मशानभूमी आहेत. त्यापैकी चार स्मशानभूमी धर्मादाय संस्थांकडे चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. तीन डिझेल दहनवाहिन्यांचे काम महापालिका पाहत आहे. उर्वरित सर्व स्मशानभूमींच्या कामाचा ठेका यापूर्वी एकाच व्यक्तीकडे होता. ठिकठिकाणच्या स्मशानभूमीबाबत आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या. यामुळे आयुक्तांनी काही स्मशानभूमींना अचानक भेट दिली. या भेटीत अनेक गंभीर बाबी आढळल्या. यामुळे स्मशानभूमीच्या देखभालीचा एकाच व्यक्तीकडे असलेला ठेका काढून घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
No comments:
Post a Comment