Monday, 18 February 2013

लग्नाचे साहित्य आगीत भस्मसात

लग्नाचे साहित्य आगीत भस्मसात: पिंपरी। दि. १७ (प्रतिनिधी)

पुढच्या आठवड्यात लहान भावाचे लग्न. त्याला हव्या त्या वस्तूंची मोठय़ा भावाने उत्साहाने खरेदी केली. नातलगांसाठी पुण्यातूनच कपडे खरेदी केले. इतकेच नव्हे, तर पाहूणचारात कमतरता राहू नये यासाठी पगारासह कंपनीमालकाकडून ४0 हजार रुपयांची उचलही घेतली. एक दोन दिवसांत गावाकडेच निघायचे होते. परंतु तत्पूर्वीच घरात सिलिंडरमधून गॅस गळती झाली, आणि खरेदी केलेल्या वस्तूंसह रोकडही जळून खाक झाली. भोसरीतील धावडेवस्तीमध्ये रविवारी सकाळी ही घटना घडली.

मुकेश शर्मा यांच्या खोलीत संतोष शंकर सिंग चुलत्यासह भाडेकरू म्हणून राहतात. आंघोळीसाठी पाणी तापविताना गॅस संपला. म्हणून त्यांनी दुसरा सिलिंडर लावला व ते आंघोळीसाठी गेले. तेव्हा गॅसच्या रेग्युलेटरने पेट घेतला आणि साहित्यासह रोकडही भस्मसात झाली.

No comments:

Post a Comment