पिंपरी पालिकेमुळे पुण्यात डेंगी!: पुण्यात डेंगीचा उद्रेक होण्यामागे पिंपरी-चिंचवड महापालिका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पवना व मुळा नदीतील जलपर्णी काढण्याऐवजी तेथील अधिकारी ती पुणे महापालिका हद्दीतील मुळा नदीत ढकलत असल्याचे दिसून आले आहे. गुपचूप चालणारी ही घटना पुणे पालिकेच्या अधिकार्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेला खरमरीत पत्र पाठवून त्याची विचारणा केली. आपली चूक मानत पिंपरी-चिंचवड पालिकेने संबंधित अधिकार्यांना सक्त ताकिद दिली आहे.
- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पवना आणि मुळा नदी वाहते. बोपोडीत या दोन्ही नद्यांचा संगम होतो. तेथून पुणे महापालिकेची हद्द सुरू होते. हिवाळ्यात या नद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात जलपर्णी निर्माण होते. सांगवी भागात पवना नदीत आणि बोपोडीत मुळा नदीत ही जलपर्णी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अडविण्यात येते. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात तेथे मोठय़ा प्रमाणात जलपर्णी साठलेली असते. त्यातून डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती होते आणि दापोडी, सांगवी, बोपोडी भागात डासांचा मोठा प्रादुर्भाव होतो.
No comments:
Post a Comment