Wednesday, 27 March 2013

अनुदानित सिलिंडरवर एजन्सीचालकांचा डोळा

अनुदानित सिलिंडरवर एजन्सीचालकांचा डोळा पुणे - चालू आर्थिक वर्षातील अनुदानित सिलिंडर 31 मार्चपर्यंत उपलब्ध करून देण्याच्या कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फायदा गॅस एजन्सीचालक घेत आहेत. ज्या ग्राहकांनी अद्याप पूर्ण अनुदानित सिलिंडर उचलले नाहीत, त्या ग्राहकांच्या नावावर परस्पर सिलिंडर घेतले असल्याचे एसएमएस ग्राहकांना मिळू लागले आहेत. सहकारनगरसह शहराच्या काही भागात असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे ग्राहकांऐवजीच एजन्सीचालकच अनुदानाचा फायदा उचलत असल्याची शंका व्यक्त होत आहे. 

No comments:

Post a Comment