मोटारींतील लॅपटॉप, मोबाईल ठरताहेत लक्ष्य: पिंपरी । दि. ८ (प्रतिनिधी)
मोटारीच्या उघड्या काचेतून आत हात घालून किंवा थेट काचच फोडून ऐवज चोरून नेला जात असल्याच्या घटना शहरात दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. असे गुन्हे करणारी टोळीच शहरात सक्रिय झाली. तिने शहरात उच्छाद मांडला आहे. महिनाभरात अशा १५ घटना घडल्या असून त्यामध्ये २३ लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. विशेष म्हणजे अशा गुन्ह्यांच्या नोंदींनी शहरातील पोलीस ठाण्यांतील डायर्यांचे रकाने भरत असताना एकाही गुन्ह्यात चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश येऊ शकलेले नाही.
शहरातील मॉल्स, मल्टिप्लेक्स, महामार्गालगतच्या बॅँकाजवळ उभ्या केल्या जाणार्या मोटारींना चोरटे लक्ष्य बनवित आहेत. बॅँकांतून रोकड अथवा लॉकरमधून दागिने घेऊन बाहेर पडणार्या नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून संधी मिळताच चोरटे आपली कामगिरी फत्ते करीत आहेत. पिंपरी, भोसरी, वाकड, फुगेवाडी, मोहननगर, चिखली अशा भागांमध्ये या घटना घडल्या आहेत.
No comments:
Post a Comment