Monday, 20 May 2013

दोन महिने पुरेल इतके पाणी

दोन महिने पुरेल इतके पाणी: - पवना धरणात ३३ टक्के साठा
पवनानगर : पवनाधरणात १९ मे रोजी ३३.४३ टक्के इतका पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा साठा ५ टक्केने जास्त आहे.

पिंपरी-चिंचवड, मावळ तालुक्यातील तळेगाव, वडगाव, चिखलसे, पाटण, पवनमावळची ४0 गावे, देहूरोड, सोमाटणे आदी भागाला पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणामध्ये १९ मे २0१२ रोजी २९.२६ टक्के इतका पाणीसाठा होता. या वर्षी तो ५ टक्क्याने जास्त आहे.

धरणामधून दररोज ७ तास १२00 क्युसेसने पवना नदीमध्ये पाणी सोडले जात आहे. यात कुठल्याही प्रकारची घट करण्याचा सध्यातरी विचार नाही. धरणामध्ये पाणीसाठा चांगला असल्याने किमान दोन महिने धरणावर अवलंबून असलेल्या भागास चिंतेचे कारण नाही. (वार्ताहर)

No comments:

Post a Comment