संघटनात्मक कार्यात बदल करणार: पिंपरी: संघटनात्मक कार्यपद्धतीत बदलाची अंमलबजावणी करून पक्ष संघटन मजबूत करण्यास प्राधान्य दिले आहे. यापुढे पक्षाने ठरवून दिलेल्या नियोजनानुसार विशिष्ट तारखेलाच जिल्हा आणि तालुका स्तरावरील बैठका होतील. महिन्यातून एकदा बैठक घेण्याचे ठरले असून, बैठकीच्या नियोजनाचा विस्कळीतपणा मोडीत काढला जाणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झाली. त्या निमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कार्यपद्धतीची माहिती दिली. २0१४ च्या विधानसभा, लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून पक्षाने जिल्हा आणि तालुका स्तरावर पक्षबांधणीला वेग दिला आहे. यापुढे नियोजनाप्रमाणे बैठका होतील. तालुका स्तरावर पक्षाच्या उपक्रमांना अधिक प्राधान्य दिले जाईल. युवा संघटनाला महत्त्व दिले जाईल. केवळ ब्लॉक अध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांवर जबाबदारी सोपवली जाणार नाही. सप्टेंबरनंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सभा घेतल्या जातील.
No comments:
Post a Comment