खाद्यपदार्थांवर घोंघावतात माशा: (प्रवीण बिडवे )
पिंपरी - कळकटलेल्या भिंती, वर्षानुवर्षे साफसफाई होत नाही याची साक्ष देणारी जळमटे, किळस यावी अशी पाणपोईजवळची दुर्गंधी आणि खाद्यपदार्थांभोवतीच नव्हे, तर तेथील माणसांभोवती देखील घोंघावणार्या माशा ही परिस्थिती आहे, वल्लभनगर एसटी आगाराच्या स्नॅक्स बारची. परमेश्वराचे भजन आणि भोजन पडद्याआड करावे, ही आपली संस्कृती. पण येथे स्नॅक्स बारमधील गलिच्छपणा लपविण्यासाठी बसविलेले पडदेही काळेकुट्टपणामुळे मूळ रंग हरवून बसले आहेत. पडद्याआडच्या गलिच्छ वातावरणात बनतात खाद्यपदार्थ आणि स्वत:च्या स्वच्छतेबाबतही तितकेच उदासीन असलेल्या विक्रेत्यांकडून ते खाऊ घातले जातात प्रवाशांना. प्रवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment