७३ धोकादायक इमारतींना नोटिसा: पिंपरी : पुरामुळे ज्या इमारतींना धोका आहे. नदी, नाल्यावर भराव टाकून केलेली बांधकामे, अल्पावधीत उभारण्यात आलेल्या इमारती अशा ७३ धोकादायक इमारती आणि बांधकामांना महापालिकेने नोटिसा पाठविल्या आहेत.
आकुर्डीत अशा प्रकारचे एक बांधकाम काही दिवसांपूर्वीच पाडून टाकले आहे. वाकड येथील निसर्ग सोसायटीच्या इमारतीची सीमाभिंत धोकादायक असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. स्थळ पहाणी करून कारवाई करण्याचे आदेश शहर अभियंता एम. टी. कांबळे यांना दिले आहेत. काळेवाडीतील चर्चची सीमाभिंत पडून दुर्घटना घडली असल्याने त्या चर्चचा वापर करू नये, अशी नोटीस त्याठिकाणी लावली आहे. पुण्यासारखे जुने धोकादायक वाडे या भागात कमी आहेत. परंतु, अल्पावधीत आणि भराव टाकून केलेली धोकादायक बांधकामे या परिसरात आहेत, त्यामुळे अशा बांधकामांना नोटीस दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment