पिंपरी : महात्मा फुलेनगर झोपडपट्टीतून ‘हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रोड’ प्रस्तावित आहे. उशिरा जाग आलेल्या एमआयडीसी अधिकार्यांनी २८६ झोपडीधारकांना नोटीस दिली. घरे पाडली जाणार असल्याने ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आलेले झोपडीधारक हवालदिल झाले. त्यातील ८५ झोपडीधारकांनी एमआयडीसीच्या अधिकार्यांकडे रहिवासी पुरावे सादर केले आहेत. उर्वरित झोपडीधारकसुद्धा पुरावे देणार असून पुनर्वसन करावे, अशी त्यांची मागणी आहे.
No comments:
Post a Comment